पुणे पोलिसांचा कॅफेवर छापा, अंधार करून कॉलेजचे तरूण-तरूणी… धक्कादायक प्रकार समोर

पुण्यातील अपघात प्रकरण चर्चेत असताना एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यातील पोलिसांनी कॅफेवर छापा टाकल्यावर अंधारात सुरू असलेल्या चुकीच्या गोष्टी उजेडात आल्या आहेत. नेमकं काय घडलं जाणून घ्या.

पुणे पोलिसांचा कॅफेवर छापा, अंधार करून कॉलेजचे तरूण-तरूणी... धक्कादायक प्रकार समोर
Follow us
| Updated on: May 29, 2024 | 7:12 PM

पुणे कोरेगाव पार्क येथील कल्याणीनगरमध्ये घडलेल्या अपघाताची सगळीकडे चर्चा सुरू आहे. या प्रकरणाचा तपास पुणे पोलीस करत आहेत. कोट्यधीश बिल्डरने आपल्या मुलाला अपघातमधून वाचवण्यासाठी व्यवस्थेला कशा प्रकारे खरेदी केलं हे समोर येत आहे. पुण्यातील या घटनेमुळे पुणे ग्रामीण पोलीस अलर्ट झाली असून त्यांनी एका कॅफे आणि लॉजवर छापा टाकल्यावर तेथील भयानक वास्तव समोर आलं आहे. पोलिसांना या छाप्यामध्ये कॉलेजमधील तरुण-तरूणी तिथे नको त्या अवस्थेत दिसले. कॅफेच्या नावाखाली इश्काचा खेळ रंगताना दिसला.

नेमकं काय आहे प्रकरण?

पुण्यातील राजगुरुनगर शहरातील लॉज आणि कॅफेवर राजगुरुनगर पोलीसांनी छापासत्र सुरु केलं. पोलिसांना कॉलेजमधील तरूण-तरूणी अश्लिल प्रकार करणारी जोडपी आढळुन आलीत. यामधील धक्कादायक गोष्ट म्हणजे कॅफेच्या नावाखाली अंधार करुन महाविद्यालयीन तरूण-तरूणींचा हा अश्लिल प्रकार सुरू होता.

सध्या पुणे शहरातील पब, बार प्रकरणांनंतर पुण्याच्या ग्रामीण भागात लॉज आणि कॅफेमध्ये महविद्यायतीन विद्यार्थांना प्रवेश देऊन आश्लिलतेचा घृणास्पद प्रकार होत असल्याचे समोर आलं आहे. त्यानुसार राजगुरुनगर पोलीसांनी राजगुरुनगर नगरपरिषद प्रशासनासोबत संयुक्त कारवाईला सुरूवात केली आहे.

लॉजमध्ये गेल्यावर ओळखपत्र दाखवावं लागत असल्यामुळे आता ही जोडपी कॅफेकडे वळली आहेत. काहींनी हाच व्यवसाय सुरू केला आहे. तिथे कॅफेच्या नावाखाली तरूण तरूणींना प्रवेश दिला जातो. प्रत्येक जोडप्यासाठी विशेष सोय उपलब्ध करून देण्यात येते. ओळखपत्र न दाखवता प्रवेश मिळत असल्याने जोडपी जास्तीचे पैसे देण्याची तयारी दर्शवतात. पण कॅफे चालकांना कारवाईची भीती का नाही? कॅफे चालवण्यासाठी दुसऱ्या कोणाचे खिसे गरम केले जात नाहीत ना? असे अनेक सवाल उपस्थित होत आहेत.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.