मस्तच! पुणे सावरलं, कोरोना रिकव्हरी रेट 96 टक्क्यावर; ‘ही’ त्रिसूत्री ठरली वरदान!

राज्यात कोरोनाचे निर्बंध लागण्याआधीच पुण्यातील निर्बंधांना सुरुवात करण्यात आली होती. शिवाय रात्रीचा कर्फ्युही संध्याकाळी सहा वाजताच सुरु होतो. याचेच आता सकारात्मक परिणाम दिसायला लागले आहेत. (Pune recovered, corona recovery rate at 96 per cent; This Trisutri became a boon)

मस्तच! पुणे सावरलं, कोरोना रिकव्हरी रेट 96 टक्क्यावर; 'ही' त्रिसूत्री ठरली वरदान!
मस्तच! पुणे सावरलं, कोरोना रिकव्हरी रेट 96 टक्क्यावर
Follow us
| Updated on: May 25, 2021 | 7:19 PM

पुणे : देशातील कोरोनाचा सर्वात मोठा हॉटस्पॉट असणारं पुणे गेल्या दिवसापासून काहीसं सावरल्याचे चित्र आहे. याचे कारण म्हणजे मे महिन्यात कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. टेस्टिंग, ट्रॅकिंग आणि ट्रीटमेंट ही त्रिसूत्री कोरोना रोखण्यास उपयुक्त ठरल्याने पुण्याचा रिकव्हरी रेट 96 टक्क्यांवर पोहोचला आहे. पुण्यात सलग 14 दिवस कोरोनामु्क्त रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या आता घटत असून, हॉटस्पॉट असलेलं पुणे हायेस्ट रिकव्हरी शहर ठरत आहे. (Pune recovered, corona recovery rate at 96 per cent; This Trisutri became a boon)

कोरोनाचं महाराष्ट्राचं उगमस्थान असलेलं पुणे सध्या दुसऱ्या लाटेत चांगलंच प्रभावित झालं. जेवढी रुग्णसंख्या गेल्या दीड महिन्यात आढळून आली तितकीच रुग्णसंख्या व्हायला वर्ष गेलं होतं. त्यामुळे पुण्यात आरोग्य व्यवस्था कोलमडून जाते की काय? अशी परिस्थिती होत होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून पुण्याचं चित्र बदलायला लागलं आहे. कारण गेल्या 10 दिवसांत जवळपास 15 हजारांनी एक्टिव्ह रुग्णसंख्या घटली आहे. राज्यात कोरोनाचे निर्बंध लागण्याआधीच पुण्यातील निर्बंधांना सुरुवात करण्यात आली होती. शिवाय रात्रीचा कर्फ्युही संध्याकाळी सहा वाजताच सुरु होतो. याचेच आता सकारात्मक परिणाम दिसायला लागले आहेत.

कडक निर्बंधामुळे रिकव्हरी जलद

कोरोनाचे हॉटस्पॉट ठरेलेले पुण्यात टेस्टिंग, ट्रेसिंग आणि ट्रिटमेंट ही त्रिसूत्री वरदान ठरली. याशिवाय कडक शासनाकडून लावण्यात कडक निर्बंध आणि नागरिकांनी दिलेली साथ यामुळे हॉटस्पॉट असलेले पुणे आता रिकव्हरी शहर ठरत आहे. पुण्यात संध्याकाळी 5 वाजताच नाईट कर्फ्यु सुरु होतो. अत्यावश्यक सेवा सकाळी 7 ते 11 या वेळेतच सुरु असतात. तसेच कोरोना रोखण्यासाठी विविध माध्यमातून जनजागृती करण्यासोबतच लसीकरणावरही अधिक भर देण्यात आला. याशिवाय कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना बेड उपलब्ध करुन देण्यासाठीही विशेष मोहिम राबविली आहे. यामुळे पुण्यातील रिकव्हरी रेट जलद वाढण्यास मदत झाली.

सध्या पुण्यात 6 हजारांहून अधिक बेड रिकामे

शहरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मार्च आणि एप्रिलच्या महिन्यात सर्वाधिक गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. रुग्णालयात बेड्स उपलब्ध नव्हते तर काही रुग्णालयात एकाच बेडवर दोन रुग्ण उपचार घेत असल्याचंही आपण पाहिलं. पण सध्या पुणे शहरात ६ हजारांहून अधिक बेड्स रिकामे असल्यानं आरोग्य विभागावरील ताण कमी झाला आहे.

उपाययोजनांना साथ मिळाल्याने पुण्यातील चित्र बदलतेय

असं म्हणतात संसर्गजन्य आजाराची लाट जितकी वेगाने येते, तितक्याच वेगाने ती ओसारतेही. पुण्यातही नेमकं असंच झालंय का? हाही प्रश्न आहे. पुणेकरांनी वेळीच योग्य ती उपाययोजनांसाठी साथ दिल्याने पुण्यातील चित्र बदलत आहे आणि सर्वाधिक बरे होण्याचं प्रमाण पुण्याने नोंदवलं आहे. मात्र हे चित्र इतकही बदललेलं नाही, की वेळ आलीच तर आपल्याला लगेचच बेड उपलब्ध होईल. त्यामुळे पुणेकरांनी जरा आणखी काळजी घेतली पाहिजे. (Pune recovered, corona recovery rate at 96 per cent; This Trisutri became a boon)

इतर बातम्या

कोरोनामुक्तीचं आडाचीवाडी मॉडेल, युवाशक्तीनं करुन दाखवलं; गावातून कोरोना हद्दपार

कोरोना काळात गृहकर्जाचे नो टेन्शन, EMI ‘या’ 3 मार्गांनी करा कमी

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.