PUNE CORONA | पुण्यात निवृत्त शास्त्रज्ञाचा व्हेंटिलेटर न मिळाल्याने मृत्यू

पुण्यात एका निवृत्त शास्त्रज्ञाचा व्हेंटिलेटर न मिळाल्याने मृत्यू झाला (Pune Scientist Died due to Not get ventilators) आहे.

PUNE CORONA | पुण्यात निवृत्त शास्त्रज्ञाचा व्हेंटिलेटर न मिळाल्याने मृत्यू
Follow us
| Updated on: Jul 15, 2020 | 7:43 PM

पुणे : पुण्यात एका निवृत्त शास्त्रज्ञाचा व्हेंटिलेटर न मिळाल्याने मृत्यू झाला आहे. डॉ. पी. लक्ष्मी नरसिंहन (61) असे या शास्त्रज्ञाचे नाव आहे. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या घटनेमुळे पुण्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. (Pune Scientist Died due to Not get ventilators)

पुण्यात सातत्याने कोरोना रुग्णांची वाढ होत आहे. पुण्यातील एका निवृत्त शास्त्रज्ञांना श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र त्या रुग्णालयात व्हेंटिलेटर उपलब्ध नव्हते. त्यामुळे त्यांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले होते. मात्र व्हेंटिलेटर न मिळाल्याने त्या निवृत्त शास्त्रज्ञाचा मृत्यू झाला.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

त्यांच्या मृत्यूनंतर त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. या चाचणीचा  रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

डॉ. पी. लक्ष्मी नरसिंहन असे या निवृत्त शास्त्रज्ञाचे नाव आहे. ते पुण्यातील बॉटनिकल सर्व्हे ऑफ इंडियातून ते वरिष्ठ शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत होते. काही वर्षांपूर्वी ते निवृत्त झाले होते.  त्यांच्यामागे पत्नी आणि एक मुलगी असा परिवार आहे.

पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढतीच

पुणे शहरात काल नव्या 750 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे पुण्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 29 हजार 107 वर पोहोचली आहे. तर 728 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून सध्या 9 हजार 409 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मात्र, अशा परिस्थितीत नागरिक नियमांचं पालन करत नसल्यान लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. मात्र, अशाही परिस्थितीत काही पुणेकर मोकाटपणे फिरत आहेत. त्यामुळे कोरोना प्रादुर्भाव रोखण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर (Pune Scientist Died due to Not get ventilators) आहे.

संबंधित बातम्या :

पुण्याचे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर होम क्वारंटाईन, ड्रायव्हरला कोरोना

Pune Lockdown | पुण्यात लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी हरताळ, 236 वाहनं जप्त

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.