Pune Toll | पुणे सातारा महामार्गावर प्रवास महाग, खेड शिवापूर नाक्यावर 8 टक्क्यांनी टोलवाढ
दरवर्षी एप्रिल महिन्यात टोलचे दर बदलले जातात, त्यानुसार यावर्षीही टोलचे दर बदलले असून टोलच्या दरात 8 टक्क्यांनी वाढ झाली आहे. कार, जीप आणि हलक्या वाहनांसाठीच्या टोलच्या दरात 10 रुपयांची वाढ झाली आहे.
पुणे : पुणे सातारा महामार्गावरील (Pune Satara Highway) खेड शिवापूर टोल नाक्यावरील (Khed Shivapur Toll Naka) टोलच्या दरात सुमारे 8 टक्क्यांनी टोलवाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता या मार्गावरुन प्रवास करणाऱ्या सर्वच वाहनांना टोलवाढीचा भुर्दंड सहन करावा लागणार आहे. दरवर्षी एप्रिल महिन्यात टोलचे दर बदलले जातात, त्यानुसार यावर्षीही टोलचे दर बदलले असून टोलच्या दरात तब्बल 8 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. मात्र रस्त्यांची कामं अजून पूर्ण झाली नसल्याने ही टोलवाढ चुकीची असल्याची भूमिका खेड शिवापूर टोल नाका हटाव कृती समितीनी घेतली आहे.
8 टक्क्यांची टोलवाढ
पुणे सातारा महामार्गावरील खेड शिवापूर टोल नाक्यावरील टोलच्या दरात सुमारे 8 टक्क्यांची टोलवाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता या मार्गावरुन प्रवास करणाऱ्या सर्वच वाहनांना दरवाढ सहन करावी लागेल.
कार-जीपच्या दरात 10 रुपयांची वाढ
दरवर्षी एप्रिल महिन्यात टोलचे दर बदलले जातात, त्यानुसार यावर्षीही टोलचे दर बदलले असून टोलच्या दरात 8 टक्क्यांनी वाढ झाली आहे. कार, जीप आणि हलक्या वाहनांसाठीच्या टोलच्या दरात 10 रुपयांची वाढ झाली आहे. नवीन दरानुसार या वाहनांना 110 रुपये टोल द्यावा लागणार आहे.
बस-ट्रकचा टोल 45 रुपयांनी वाढला
हलक्या व्यावसायिक वाहनांच्या टोलच्या दरात 15 रुपयांची वाढ झाली आहे, यांना आता 175 रुपये टोल आकारला जाणार आहे. तर बस आणि ट्रकसाठी पूर्वी 325 रुपये टोल होता, त्यात 45 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे बस आणि ट्रक साठी 370 रुपये टोल दर झाला आहे.
अवजड वाहनांना 710 रुपये मोजावे लागणार
जड वाहनांसाठी पूर्वी 525 रुपये टोल होता, त्यामध्ये 60 रुपयांची वाढ होऊन 525 रुपये टोल द्यावा लागणार आहे. अवजड वाहनांच्या टोल दरात 70 रुपयांची वाढ होऊन, आता त्यासाठी 710 रुपये मोजावे लागणार आहेत.
टोल नाका हटाव कृती समितीचा विरोध
दरम्यान, रस्त्यांची कामं अजून पूर्ण झाली नसल्यानं, ही टोल वाढ चुकीची असल्याचं टोल नाका हटाव कृती समितीने म्हटलं आहे. टोल वाढ नियमानुसार केली जाते, मात्र रस्त्याची कामं नियमानुसार केली जात नाहीत, अशी खोचक टीका कृती समितीचे निमंत्रक माऊली दारवटकरांनी केली आहे.
संबंधित बातम्या :
इंधन दरवाढीनंतर आता ‘टोलधाड’; सर्वसामान्यांच्या खिशावर आर्थिक भार!