Monsoon Update : पुणे, साताऱ्यात पाऊस, राज्यात यलो अलर्ट

Monsoon and weather Update : मे महिना संपण्यास दोन दिवस राहिले आहे. जून महिन्यापासून मान्सूनचे वेध सुरु होतात. यंदा देशभरात आणि राज्यात मान्सून सामान्य असणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. राज्यात सोमवारी अन् मंगळवारी अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पाऊस झाला.

Monsoon Update : पुणे, साताऱ्यात पाऊस, राज्यात यलो अलर्ट
Follow us
| Updated on: May 30, 2023 | 11:12 AM

पुणे : मे महिन्याचे दोन दिवस राहिले आहेत. सोमवारी अन् मंगळवारी राज्यात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पाऊस झाला. हा पाऊस म्हणजे वाळवाच्या पावसाला सुरुवात झाल्याचे म्हटले जात आहे. वळवाचा पाऊस मान्सून दाखल होण्यापूर्वी आलेला असतो. यामुळे मान्सूनसाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे. आता भारतीय हवामान विभागाने मान्सून देशभरात कधी पसरणार आहे, याची माहितीच जारी केली आहे. राज्यात १६ जूनपर्यंत मान्सून सर्वत्र दाखल होणार आहे. केरळात मान्सून 4 जूनपर्यंत तर मुंबई अन् कोकणात 8 ते 10 जूनपर्यंत मान्सून दाखल होणार आहे.

पुणे शहरात पाऊस

पुणे शहरात रात्री अनेक ठिकाणी पाऊस झाला. काही ठिकाणी गारपीटसुद्धा झाली. शहरातील अनेक भागात रात्रभर सुरू होता. मंगळवारी शहरात सकाळपासून ढगाळ वातावरण आहे. पुणे जिल्ह्यासह राज्यातील अनेक ठिकाणी यलो अलर्ट जारी केला आहे. मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त केला आहे. सोमवारी झालेल्या पावसामुळे पुणेकरांना उकाड्यापासून दिलासा मिळाला. आज दिवसभर पुणे शहरासह मराठवाडा, विदर्भातील काही भागांमध्ये पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.

हे सुद्धा वाचा

नाशिकमध्ये ऑरेंज अलर्च

हवामान विभागाने नाशिक जिल्ह्याला ऑरेंज अलर्टचा अंदाज वर्तवला आहे. इगतपुरी तालुक्यात विविध ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. पावसाने घोटी, काळुस्ते, माणिकखांब, कांचनगाव परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार आगमन केले असून गेल्या तासभरापासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. अचानक आलेल्या या अवकळी पावसाने नागरिकांची एकच तारांबळ उडाली

महाबळेश्वरला पाऊस

महाराष्ट्राचे मिनी काश्मीर म्हणून ओळख असलेले महाबळेश्वरमध्ये मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली आहे. या भागात दोन दिवसांपासून तुरळक पाऊस कोसळत होता मात्र सोमवारी संध्याकाळच्या सुमारास महाबळेश्वर शहरासह बाजारपेठेत पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. या पावसामुळे महाबळेश्वरमध्ये आल्हादायक वातावरण तयार झाले आहे.

हवामान विभागाचा इशारा

राज्यात पुढील दोन दिवस काही ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मात्र, त्यानंतर पुढील 3 दिवस कमाल तापमान 2-4 अंश सेल्सिअसनं वाढण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. केरळात मान्सून 4 जूनपर्यंत दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान विभागने व्यक्त केला आहे.

हे ही वाचा

Monsoon Update : देशभरात मान्सून कधी पसरणार, IMD कडून आले महत्वाचे अपडेट

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.