Pune SDPI Vs Raj Thackeray : अंगावर आलात तर शिंगावर घेऊ, ‘एसडीपीआय’च्या अझहर तांबोळींचा राज ठाकरेंना इशारा

राज ठाकरेंनी (Raj Thackeray) चिथावणीखोर वक्तव्य केले आहे. राज ठाकरेंना हिंदुत्वाचे (Hindutwa) राजकारण करायचे आहे. हे भाजपाचे राजकारण आहे, अशी टीका सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाने (Social Democratic Party of India) केली आहे.

Pune SDPI Vs Raj Thackeray : अंगावर आलात तर शिंगावर घेऊ, 'एसडीपीआय'च्या अझहर तांबोळींचा राज ठाकरेंना इशारा
मनसे अध्यक्ष राज ठाकरेImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 18, 2022 | 12:42 PM

पुणे : राज ठाकरेंनी (Raj Thackeray) चिथावणीखोर वक्तव्य केले आहे. राज ठाकरेंना हिंदुत्वाचे (Hindutwa) राजकारण करायचे आहे. हे भाजपाचे राजकारण आहे, अशी टीका सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाने (Social Democratic Party of India) केली आहे. अंगावर आलात तर शिंगावर घेऊ, असा इशाराही एसडीपीआयनं राज ठाकरेंना दिला आहे. पुण्यातील पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांच्यावर टीका करण्यात आली आहे. मशिदींवरील भोंग्यांसदर्भात एसडीपीआयचे राज्य सचिव अझहर तांबोळी यांनी राज ठाकरे यांच्या या भूमिकेवर टीका केली आहे. यावेळी त्यांनी संजय राऊत यांच्यावरही निशाणा साधला. संजय राऊत म्हणतात, की ते हिंदू ओवैसी आहेत. तर मग जसे ओवैसींना रोखण्यासाठी प्रयत्न केले, तसे तुम्ही राज ठाकरेंना काय रोखण्यासाठी काय करत आहात, असा सवाल तांबोळी यांनी केला आहे. राज ठाकरेंवर गुन्हा दाखल का होत नाही, असेही तांबोळी यांनी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून विचारले आहे.

‘तुम्ही भोंगे लावा आम्हीही भोंगे वाजवू’

अझहर तांबोळी यांनी यावेळी मशिदींवरील भोंग्यांवरून होणाऱ्या राजकारणावर टीका केली. मशिदींच्या समोर भोंगे तुम्ही लावा, आम्ही भोंगे वाजवू, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. हिंदू ओवैसींना रोखण्यासाठी प्रयत्न करा, असेही ते यावेळी म्हणाले.

‘…तर सोडणार नाही’

अझहर तांबोळी म्हणाले, की आम्ही मुस्लीम समाजाच्या बाजूने आहोत. मुस्लीम समाजाला व्हिक्टीम बनवण्याचा प्रयत्न केला जात आहे. राज ठाकरे जातीय दंगल घडवण्याचा प्रयत्न करत आहेत. जर ते हिंदू ओवैसी आहेत तर त्यांना दाबून ठेवा. सगळे निर्बंध मुस्लीम समाजावर का? आम्ही घटनात्मक मार्गांने उत्तर देणार. पण अंगावर आलात तर सोडणार नाही, असा इशारा एसडीपीआय पार्टीच्या अझहर तांबोळी यांनी दिला आहे.

आणखी वाचा :

Pune Gopichand Padalkar : शरद पवारांना बहुजनांचा इतिहास मोडीत काढायचाय; किल्ल्यांच्या प्रश्नावरून गोपीचंद पडळकर आक्रमक

RPI Sachin Kharat : धर्माच्या नावाखाली राजकारण; राज ठाकरेंच्या औरंगाबाद सभेला परवानगी देऊ नये, पुण्यात सचिन खरातांची मागणी

PMP Bus Day Pune : पुणेकरांच्या आवडत्या PMPचा आज बस डे, महिलांना दिवसभर मोफत प्रवासाची संधी

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.