MPSC विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी शरद पवार मैदानात; थोड्याच वेळात आंदोलनात सहभागी होणार
Sharad Pawar in Pune MPSC Student Protest : शरद पवार एमपीएससी आंदोलनात सहभागी होण्याची शक्यता आहे. शरद पवारांनी ट्विट करत विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. जर विद्यार्थ्यांना न्याय मिळाला नाही तर आंदोलनात सहभागी होण्याचा शरद पवारांनी इशारा दिलाय. वाचा सविस्तर...
मागच्या तीन दिवसांपासून एमपीएससीचे विद्यार्थी आंदोलन करत आहेत. परवा दिवशी रात्रीपासून हे विद्यार्थी पुण्यातील शास्त्री रोडवर आंदोलन करत आहेत. राज्यसेवा आयोग आणि आयबीपीएसचा परिक्षा एकाच दिवशी असल्याने त्याची तारीख बदलण्यात यावी तसंच कृषी विभागाच्या जागा राज्यसेवा आयोगात समाविष्ट करण्याची मागणी या विद्यार्थ्यांची आहे. पवार दिवशी संध्याकाळच्या सुमारास हे आंदोलन सुरु झालं. मागण्या मान्य होत नाहीत तोवर आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका आंदोलक विद्यार्थ्यांनी घेतली आहे. विद्यार्थ्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर आंदोलनात सहभागी होण्याचा इशारा शरद पवारांनी दिला आहे. ते आज या आंदोलनस्थळी भेट देणार आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार हे या आंदोलनात सहभागी झालेत.
शरद पवार काय म्हणाले?
शरद पवार यांनी ट्विट करत या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनात शरद पवार सहभागी होणार आहेत. पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या आंदोलनासंदर्भात विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करणं सरकारचं कर्तव्य आहे. परंतु सत्ताधारी याला गांभीर्याने घेताना दिसत नाहीत. उद्यापर्यंत यावर सरकारने योग्य भूमिका स्पष्ट केली नाही तर पुण्याच्या आंदोलनस्थळी मी स्वतः आंदोलनात सहभागी होऊन विद्यार्थ्यांना न्याय मिळवण्यासाठी मैदानात उतरणार, असं ट्विट शरद पवारांनी केलं आहे.
एमपीएससी आयोगाची आज बैठक
पुण्यात सुरु असलेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर एमपीएससी आयोगाने आज बैठक बोलावली आहे. आज सकाळी 10 वाजता मुंबईत ही बैठक होणार आहे. एमपीएससी आयोग 25 तारखेची परीक्षा पुढे ढकलणार की वेळेतच परीक्षा होणार हे आज ठरणार आहे. परवा रात्रीपासून पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरु आहे. राजकीय पक्षांचं समर्थन आंदोलनाला मिळतंय. शरद पवारांनीही या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.
विद्यार्थ्यांच्या मागण्या काय आहेत?
एमपीएससी विद्यार्थ्यांचे गेल्या तीन दिवसांपासून आंदोलन सुरु आहे. राज्यसेवा आयोग आणि आयबीपीएसचा एकाच दिवशी पेपर आल्याने यातील एका पेपरची तारीख बदलण्यात यावी अशी आंदोलक विद्यार्थ्यांची मागणी आहे. कृषी विभागाच्या जागा राज्यसेवा आयोगात समाविष्ट करण्याची मागणी या आंदोलनातून करण्यात येत आहे. तर आज याबाबत तोडगा निघाला नाही तर आंदोलनात सहभागी होण्याचा इशारा शरद पवारांनी दिला आहे.