लालकृष्ण अडवाणींना भारतरत्न जाहीर होताच शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, त्यांची निवड…
Sharad Pawar on Lal Krishna Advani Bharat Ratna : भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. यावरही शरद पवार बोललेत.
प्रदिप कापसे, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, पुणे | 03 जानेवारी 2024 : भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत ट्विट केलं आहे. यावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दोन्ही नावं, त्यांची निवड योग्य आहे. कर्पुरी ठाकुर यांनी आपलं योगदान दिलं आहे. मी मुख्यमंत्री असताना ते बिहारचे मुख्यमंत्री होते. साधे आणि विनम्र होते. त्यांची निवड योग्य आहे. अडवाणी देशाच्या संसदेत अनेक वर्ष होते. एखाद दुसरा सोडला तर त्यांचा पराभव झाला नाही. रथ यात्रा काढल्या नंतर काही घटना घडल्या. मात्र त्याच जीवन हे आदर्श अस व्यक्तिमत्त्व होतं. त्यांची निवड होण्याला उशीर झाला. मात्र मी त्यांचं अभिनंदन करतो, असं शरद पवार म्हणालेत.
अडवाणी यांना भारतरत्न
भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत घोषणा केली आहे. ही बातमी सांगताना मला अतिशय आनंद होत आहे, लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न प्रदान करण्यात येणार आहे. अडवाणीजींना मी फोन केला. त्यांच्याशीही बोललो. हा सन्मान मिळाल्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन केलं, असं ट्विट नरेंद्र मोदी यांन केलं आहे.
कर्पुरी ठाकुर यांनाही भारतरत्न
बिहारचे माजी मुख्यमंत्री, दिवंगत नेते कर्पुरी ठाकुर यांनाही भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे.कर्पुरी ठाकुर यांच्या 100 व्या जयंतीनिमित्त कर्पुरी ठाकुर यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. अडवाणी आणि कर्पुरी ठाकुर यांना भारतरत्न जाहीर झाला आहे. यावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राज्य कोणत्या दिशेने चाललंय?- पवार
भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. यावर शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. कोण बद्दल घडला मला माहिती नाही. पण सध्या सत्तेचा गैरवापर केला जातो आहे. फायरिंग अशा गोष्टी व्हायला लागल्या आणि सरकार जर बघ्याची भूमिका असेल तर राज्य कोणत्या दिशेने चाललं आहे? असा प्रश्न निर्माण होतो, असं शरद पवार म्हणाले.