Pune Crime : लष्करातील निवृत्त कर्नलनं पत्नीवर गोळ्या झाडल्या, पत्नीची हत्या करुन स्वतःही जीव दिला

Pune Murder and Suicide: लष्करातून निवृत्त झालेल्या पुण्यातील एका कर्नलने पत्नीची गोळी झाडून हत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर कर्नलने स्वतःही गोळी झाडून घेऊन आत्महत्या केली आहे.

Pune Crime : लष्करातील निवृत्त कर्नलनं पत्नीवर गोळ्या झाडल्या, पत्नीची हत्या करुन स्वतःही जीव दिला
आधी हत्या, मग आत्महत्या...Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Apr 21, 2022 | 7:01 AM

पुणे : पत्नीची हत्या करुन पतीनं आत्महत्या केल्याची घटना पुण्यात घडली. बुधवारी घडलेल्या या घटनेनं पुण्यात एकच खळबळ उडाली. धक्कादायक बाब म्हणजे ही हत्या एका लष्करातील सेवानिवृत्त कर्नलनं केली. लष्करातून सेवानिवृत्त असणाऱ्या पुण्यातील एका कर्नलने (Retired Colonel) पत्नीवर गोळ्या झाडल्या. तिची हत्या केली. नंतर स्वतःवर गोळी झाडून घेऊन आत्महत्या केली. कर्नलने पत्नीला ठार (Wife Murder) करुन आपणही का आत्महत्या केली, याची माहिती अजून स्पष्ट झाली नाही. घटनास्थळी मुंढवा पोलीस (Mundhwa Police) पोहचल्यानंतर घराचे दार तोडून पोलिसांनी आत प्रवेश केल्यानंतर दोघेही मृतावस्थेत आढळून आली. दरम्यान, निवृत्त कर्नलनं इतकं टोकाचं पाऊल का उचललं, हे कळू शकलेलं नाही. पोलिसांकडून याप्रकरणी आता अधिक तपास केला जातो आहे.

घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनुसार, निवृत्त कर्नलचं नाव नारायणसिंग बोरा आहे. ते 75 वर्षांचे होते. तर त्यांच्या पत्नीचं नाव चंपा बोरा असून त्या 63 वर्षांच्या होत्या. घोरपडी येथील बी. टी. कवडे रोडजवळ असलेल्या सिटाडेल सोसायटीमध्ये ते राहत होते. नारायणसिंग बोरा यांनी पत्नीला मारुन आपण आत्महत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

घरी फक्त पती पत्नीच

ही घटना घडून घडल्यानंतर पोलिसांनी सांगितले की, पुण्यात निवृत्त कर्नल बोरा आपल्या पत्नीसह पुण्यात राहत होते. त्यांना तीन मुलं असून त्यांचा एक मुलगा लष्करात आहे. तर दुसरा मुलगा मुंबईत राहतो. तर मुलगी दिल्लीत असून त्यांचा जावईही लष्करातच आहे. ही घटना घडण्याआधी त्यांचा एक मुलगा आपले वडील नारायणसिंग यांना फोन करत होता. मात्र त्यांच्या वडिलांनी आणि आईनेही फोन उचलला नाही नाही म्हणून त्यांनी आपल्या मित्रांना घरी जाऊन बघायला सांगितले.

पोलिसांनी दार तोडले

त्यानंतर त्यांच्या मित्रांनी ते राहत असलेल्या सोसायटीत गेल्यानंतर घराचे दार बंद दिसले, बंद दार उघडत नसल्याने सोसायटीच्या सेक्रेटरीला सांगण्यात आले. त्यानंतर दरवाजा उघडत नसल्याने त्यांनी ही घटना मुंढवा पोलिसांना कळविण्यात आली. त्यानंतर मुंढवा पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केल्यानंतर दोघंही मृतावस्थेत आढळली. या घटनेची पुढील चौकशी मुंढवा पोलीस करत आहेत.

संबंधित बातम्या

Sukanya Samrudhi Scheme : मुली होणार आर्थिक स्वावलंबी; सुकन्या समृद्धीचे बदलले नियम;गुंतवणुकीचा मार्ग बनला सोपा

IPS Krishna Prakash : आयपीएस कृष्ण प्रकाश उर्फ “आर्यनमॅन” यांची बदली, पोलीस दलात मोठी खांदेपालट

Special Report | Dhananjay Munde यांच्याकडून Raj Thackeray यांचा ‘अर्धवटराव’ उल्लेख !-tv9

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.