Pune: काळीज चर्रर्रर्र…..! सख्खे बहीण-भाऊ सायकलवर खेळता खेळता कॅनलमध्ये पडले, जागीच मृत्यू

Pune canal: बेबी कालवा पार करुन ही दोघंही जण आत्याकडे जाण्यासाठी निघाले. तेव्हा कॅनलच्या रस्त्यावर त्यांची सायकल घसरली. सायकलसकट दोघंही ही कॅनलमध्ये पडले आणि त्यांचा मृत्यू झालाय.

Pune: काळीज चर्रर्रर्र.....! सख्खे बहीण-भाऊ सायकलवर खेळता खेळता कॅनलमध्ये पडले, जागीच मृत्यू
निरागस चिमुरड्यांचा अकाली मृत्यूImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Apr 19, 2022 | 10:31 AM

पुणे : सख्खे बहीण-भाऊ (Sister-Brother) सायकवर खेळत होते. खेळता खेळता आत्याकडे जाण्यासाठी निघाले. वाटेत कॅनलचा रस्ता ओलांडायचा होता. मोठी बहीण पुढे सायकल (cycle) चालवत होती. छोटा भाऊ सायकलच्या मागच्या सीटवर बसलेला. पण वाटेतच मृत्यू आहे, याची पुसटीशी कल्पना दोन्ही चिमुरड्यांना नव्हती. कॅनलच्या रस्त्यावरुन जात असताना सायकल अचानक घसरली. सायकलसटक दोन्हीही चिमुरडी मुलं कॅनलमध्ये पडली. बराच वेळ मुलं कुठे दिसून आली नाहीत. त्यानंतर शोधाशोध सुरु झाली. आत्याच्या घरी जाण्यासाठी निघालेल्या मुलांच्या बेपत्ता होण्यानं पालकही कासावीस झाले. अखेर तरुणांकडून कालव्यात उतरून शोध घेतला गेला. रात्रीच्या सुमारास कालव्याच्या दोन ते तीन किलोमीटर आतमध्ये दोन्हीही चिमुरडी मुलं जलपर्णीत अडकलेल्या आढळून आलंय. या दोघाही सख्ख्या भाऊ-बहिणींच्या मृत्यूनं सगळ्यांनाच मोठा धक्का (Shocking incident) बसलाय.

कुठं घडली घटना?

ही धक्कादायक घटना घडली सोरतापवाडी ग्रामपंचाय हद्दीतमध्ये. हवेली तालुक्यात असलेल्या या गावात दोघं सख्खे बहीण-भाऊ सायकवर खेळत होते. सोमवारी रात्रीच्या सुमारास सायकवर खेळत असताना ते कॅनलमध्ये पडले आणि त्यांचा जीव गेलाय.

कुटुंबावर शोककळा

जागृती ढवळे आणि शिवराज ढवळे अशी दोन्ही मृत मुलांची नावं आहेत. ही दोघेही मूळचे उस्मानाबाद जिल्ह्यातील देऊळगावचे राहणार आहेत. जागृती सहा तर शिवराज अवघ्या तीन वर्षांचा होता. संध्याकाळी जागृती आणि शिवराज सायकलवर खेळत होते. जागृती सायकल चालवत होती. तर शिवराज सायकरच्या मागच्या सीटवर बसलेला.

बेबी कालवा पार करुन ही दोघंही जण आत्याकडे जाण्यासाठी निघाले. तेव्हा कॅनलच्या रस्त्यावर त्यांची सायकल घसरली. सायकलसकट दोघंही ही कॅनलमध्ये पडले आणि त्यांचा मृत्यू झालाय.

कळलं कसं?

सहा वाजता निघाललेली मुलं आठ वाजले तरी परत कशी आली नाही, म्हणून पालकांना चिंता वाटू लागली. मग शोधाशोध सुरु झाली. कासावीस झालेल्या पालकांनी अखेर मुलांचा शोध घेण्यास सुरुवात केलीये. मुलांचा शोध घेत असताना मुलांची सायकल आणि चप्पल जुन्या बेबी कॅनलच्या जवळ आढलून आली. म्हणून मग कालव्यात काही तरुणांनी मुलांचा शोध घेण्यास सुरुवात केली.

दरम्यान, रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास ही दोन्ही मुलं जलपर्णी अडकलेल्या अवस्थेत आढळून आली. या मुलांना तत्काळ बाहेर काढण्यात आलं. त्यानंतर त्यांना तत्काळ रुग्णालयातही दाखल करण्यात आलं. पण डॉक्टरांनी उपचारापूर्वी त्यांना मृत घोषित केलं. जागृती आणि शिवराज यांच्या अचानक झालेल्या मृत्यूनं ढवळे कुटुंब पूर्णपणे बिथरलंय. त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण गावावरही शोककळा पसरली आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.