पुणे- शहरात सातत्याने स्थानिक नागरिक व प्राणीप्रेमी यांच्यात भटक्या कुत्र्यांवरून वाद होत असतात. या वादाचे रूपांतर अनेकदा भांडणातही होते. अशी एक घटना पुण्यात घडली आहे. दत्तवाडी परिसरात राणी नावाच्या भटक्या श्वानाची डोक्यात रॉडने हल्ला करत हत्या केल्याची घटना घडली आहे. प्राणींनी प्रेमीनी दिलेल्या तक्रारीनंतर श्वान हत्या प्रकरणी दत्तवाडी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आरोपी अमोल खेडकर (रा. दत्तवाडी) याच्याविरुद्ध कलम 428 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारती अशोक सांळुके (52 वर्षीय महिलेने या प्रकरणी दत्तवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
दत्तवाडी परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून राणीनावाचे कुत्रे वास्तव्यास होते. मागील काही दिवसांपासून ते आजारी असल्याने विव्हळत होते. त्याच्या या विव्हळण्याचा त्रास आरोपीला होत होता. या रागातूनच आरोपीनं तिच्या डोक्यात लोखंडी रॉडने प्रहार केले. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने तिला बावधन येथील ॲनिमल रेस्क्यू फाउंडेशनमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. परंतु उपचार सुरू असताना या कुत्र्याचा मृत्यू झाला. दत्तवाडी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.
दुसरीकडे नागपूरमध्ये भटक्या कुत्र्याच्या शेपटीला वात्रट युवकांनी फटाके बांधल्याचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. याप्रकरणी कोरोडी परिसरातील युवकांच्या विरोधात तक्रार करण्यात आली आहे. या तक्रारीनुसार पोलिसांनी संबंधित युवकांवर गुन्हा दाखल केला आहे. या युवकांनी परिसरातील क्रूरपणे भटक्या कुत्र्यांना पकडून त्यांच्या शेपटीला फटाक्यांची माळ बांधली तसेच ते फटाके काडीपेटीच्या साहाय्याने पेटवण्यात आले. शेपटीला फटाके बांधण्यापूर्वी पळून जावू नये म्हणून कुत्र्याचे पायही बांधले होते.
संबंधित बातम्या :
देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद संपताच दुसऱ्या मिनिटाला नवाब मलिकांचं ट्विट, ‘आ रहा हूँ मैं…!’
देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद संपताच दुसऱ्या मिनिटाला नवाब मलिकांचं ट्विट, ‘आ रहा हूँ मैं…!’