Pune Crime News : पुणे शहरात डिलिव्हरी बॉय युवतीच्या घरात घुसला, अन् नको ते घडले
Pune Crime News : पुणे शहरात डिलिव्हरी बॉय एका उच्चभ्रू सोसायटीत डेलिव्हरी करण्यासाठी गेला. त्यावेळी त्याने जे काही केले त्यानंतर प्रकरण पुढे आणखी अवघड झाले. या प्रकारामुळे डिलिव्हरी बॉयसंदर्भात संभ्रम निर्माण होऊ लागला आहे.
पुणे | 7 सप्टेंबर 2023 : सध्या ऑनलाईनचा जमाना आहे. कुठे हॉटेलमध्ये जाऊन खाण्यापेक्षा घरी मागवून खाण्यास प्राधान्य अनेक जण देत आहे. यामुळे झोमॅटो आणि स्विगीच्या माध्यमातून खाद्यपदार्थ मागवले जात आहे. स्विगीसारख्या प्लॅटफार्म अनेक वस्तू मिळू लागल्या आहेत. यामुळे पुणे शहरातील एका युवतीने स्विगीवरुन सॅनिटरी नॅपकिन मागवले खरे पण पुढे जे झाले त्यामुळे चांगलाच ताप झाला. त्या युवतीने तातडीने या प्रकरणाची तक्रार केली. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय घडला प्रकार
पुणे शहरातील वाकडेवाडी या भागातील एका उच्चभ्रू सोसायटीत हा घडला आहे. या भागात राहणारी एक २६ वर्षीय युवतीने स्विगीवरुन काही घरगुती सामान मागवले होते. ते सामान तपासत असताना सॅनिटरी पॅडचे पॅकेट फुटलेले. त्यानंतर तिने यासंदर्भात स्विगीकडे तक्रार केली. काही वेळात नवीन सॅनिटरी नॅपकिन घेऊन डिलिव्हरी बॉय आला. त्यावर डिलिव्हरी बॉयने पैशांची मागणी केली. तरुणीने स्विगीशी बोलून घे, असे त्याला सांगितले.
पुढे जाऊन केली ही मागणी
डिलिव्हेरी बॉयने मोबाईल फोन चार्ज नाही, असे सांगत घरात प्रवेश मिळवला. घरात ती युवती एकटीच असल्याची संधी साधत तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली. त्या युवतीने नकार दिल्यावर तो निघून गेला. मग युवतीने स्विगीच्या डिलिव्हरी बॉय विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल विनयभंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
युवतीच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल
पोलीस निरीक्षक राजेंद्र शहाणे यांनी सांगितले की, युवतीच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय दंड विधान कल 354 (A) नुसार गुन्हा नोंदवला आहे. ही घटना ५ सप्टेंबर रोजी घडली. या प्रकरणाचा तपास सुरु आहे.