Kishore Aware Murder : किशोर आवारे खून प्रकरणास धक्कादायक वळण, आरोपींनी चोरल्या मोटारसायकली

Pune Talegaon Kishore Aware Murder Case : पुणे शहरातील तळेगावात सामाजिक कार्यकर्ते किशोर आवारे यांची काल भरदिवसा हत्या झाली होती. या हत्या प्रकरणाच्या तपासाला पोलिसांनी वेग दिला आहे. या प्रकरणी काही महत्वाचे पुरावे मिळाले आहे.

Kishore Aware Murder : किशोर आवारे खून प्रकरणास धक्कादायक वळण, आरोपींनी चोरल्या मोटारसायकली
Kishore Aware
Follow us
| Updated on: May 13, 2023 | 11:23 AM

पुणे : पुणे शहरात भरदिवसा सामाजिक कार्यकर्ते किशोर आवारे यांच्यांवर शुक्रवारी प्राणघातक हल्ला झाला होता. आधी पिस्तूलने गोळ्या झाडल्या. त्यानंतर कोयत्याने वार करुन गंभीर जखमी केले होते. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले होते. परंतु उपचार सुरु असताना त्यांचे निधन झाले. या प्रकारानंतर पुणे शहरात खळबळ माजली आहे. हा हल्ला कोणी केली आणि त्याचे कारण काय? याचा तपास सुरु असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराचे नाव या घटनेत आले आहे. दरम्यान हल्ला केल्यानंतर आरोपींनी दोन मोटारसायकलींची चोरी केली आहे.

थेट आमदारावर आरोप

किशोर आवारे यांच्या आईने थेट राष्ट्रवादीच्या आमदारावरच हत्येप्रकरणी आरोप केल्याने खळबळ उडाली आहे.या हत्येचा कट मावळमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळकेंनी रचल्याचा आरोप आवारे यांच्या आईने केला आहे. एफआयआरमध्ये आमदार सुनील शेळके, त्यांचे भाऊ सुधाकर शेळके, संदीप गराडे, श्याम निगडकरसह अन्य तीन अनोळखी इसमांचा उल्लेख आहे.

हे सुद्धा वाचा

मोटारसायकली चोरल्या

किशोर आवारे खून प्रकरणातील हल्लेखोरांनी खून केल्यानंतर घटनास्थळावरून पळून जाण्यासाठी दोन मोटारसायकली चोरल्या. याप्रकरणी मोटारसायकलच्या ३८ वर्षीय मालकाने पोलिसांत याबाबत गुन्हा दाखल केला आहे. तळेगाव दाभाडे पोलिसात नोंदवलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात आरोपीने घटनास्थळावरून फिर्यादीला पिस्तुलाचा धाक दाखवून त्यांची दुचाकी घेऊन पळ काढला. घटनास्थळावरून पळून जाण्यासाठी आरोपींनी आणखी एक दुचाकी चोरली.

पैसे काढत असताना चोरली गाडी

फिर्यादी तळेगाव दाभाडे येथील बाजारात गेले होते. घटनेच्या वेळी ते एटीएममधून पैसे काढून बाहेर पडत होते. त्यावेळी पिस्तूलने आरोपींनी त्यांना धमकावले आणि त्याची दुचाकी घेऊन पळ काढला. आरोपींनी त्याच परिसरात मालकाला शस्त्राचा धाक दाखवून दुसरी दुचाकी चोरल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

सीसीटीव्ही फुटेज ताब्यात

पोलिसांनी या प्रकरणी चार अनोळखी आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे या चार मारेकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे समजते. परंतु आरोपीला ताब्यात घेतल्याचा वृत्ताला दुजोरा मिळालेला नाही. पोलीस हल्लेखोरांच्या मोबाईलच संभाषण (सीडीआर) काढून तपास करतील. त्यात आ.शेळके यांचे नाव आले तर त्यांच्या अडचणी वाढणार आहे.

दीड महिन्यापूर्वी झाला होता खून

दीड महिन्यापूर्वी शिरगावचे सरपंच प्रवीण गोपाळे यांची हत्या झाली होती. यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. यापूर्वीही मावळात असे खून झाले आहेत. पुन्हा हे खूनसत्र सुरु झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.