एकावर दोन थाळी फ्री मिळवण्याच्या नादात गंडा, पुण्यातील खवय्याची 31 हजारांना फसवणूक

फ्री थाळीच्या नावाखाली आरोपीने तब्बल 31 हजार 137 रुपये ऑनलाईन वळते केल्याचा प्रकार उघड झाला आहे. (Pune Thali Offer Online Fraud)

एकावर दोन थाळी फ्री मिळवण्याच्या नादात गंडा, पुण्यातील खवय्याची 31 हजारांना फसवणूक
एकावर दोन फ्री थाळीच्या नादात ग्राहकाची लूट
Follow us
| Updated on: Mar 31, 2021 | 7:34 AM

पुणे : पुणे शहरातील प्रसिद्ध थाळीची ऑफर घेण्याच्या नादात खवय्याला तब्बल 31 हजार रुपयांचा गंडा पडला. जेवणाच्या एका थाळीवर दोन थाळ्या मोफत असल्याचे सांगून भामट्याने ऑनलाईन फसवणूक केली. या प्रकरणी पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Thali Buy One Get Two Free Offer costs Customer worth 31 thousand in Online Fraud)

पुण्याचे रहिवासी दीपक जगदाळे यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. मोहम्मद इराफात सैद आलम नियाजी (रा. वैगनाबाद, नालंदा, बिहार) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने तब्बल 31 हजार 137 रुपये ऑनलाईन वळते केल्याचा प्रकार उघड झाला आहे. सायबर पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर गुन्ह्यात चौकशी होऊन सहकारनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

दीपक जगदाळे पुण्यातील संबंधित थाळीविषयी सोशल मीडियावर सर्च करत होते. त्यावेळी आरोपी मोहम्मदने 250 रुपयांची थाळी घेतल्यास दोन थाळ्या मोफत मिळतील, अशी बतावणी केली. त्यावर विश्वास ठेवत जगदाळेंनी भामट्याने पाठवलेली मोबाईल लिंक क्लिक केली आणि माहिती भरली.

चोराने या माध्यमातून दीपक जगदाळे यांच्या खात्यातून तब्बल 31 हजार 137 रुपये काढून घेतले. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच जगदाळेंनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. सायबर पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर गुन्ह्यात चौकशी होऊन पुण्यातील सहकारनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

मुंबईत सायबर चोरांचं रॅकेट उद्ध्वस्त

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक ग्राहक बाजारात जाऊन वस्तू खरेदी करण्याऐवजी ऑनलाईन शॉपिंगला प्राधान्य देत आहेत. याशिवाय ऑनलाईन वेबसाईट्सकडून अनेक आकर्षक फेस्टिव्ह ऑफर सुरु करुन मोठी सूट दिल्याच्या जाहिरातीही पाहायला मिळतात. मात्र, याच सूटीच्या नावाखाली अनेकदा सर्वसामान्य ग्राहकांची मोठी फसवणूक झाल्याच्याही घटना घडतात.

मुंबई पोलिसांच्या सायबर विभागाने अशाच प्रकारे फसवणूक करणारं एक मोठं रॅकेटच जानेवारीत उघड केलं होतं. तसेच या प्रकरणातील मुख्य आरोपीच्या मुसक्या आवळल्या. या प्रकरणाच्या तपासत केवळ संबंधित वेबसाईटच नाही, तर इंटरनेटवर अशा अनेक वेबसाईट फसवणूक करत असल्याचं समोर आलं.

संबंधित बातम्या 

ऑनलाईन शॉपिंग करताय, मग सावधान, मुंबई पोलिसांकडून फसवणूक करणाऱ्या वेबसाईट्सची यादी जाहीर

Zomato कडून फसवणूक झाल्यास काय कराल? जाणून घ्या तक्रार करण्याची पूर्ण प्रोसेस

(Pune Thali Buy One Get Two Free Offer costs Customer worth 31 thousand in Online Fraud)

पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.