नियम तोडून ओळखीने सुटणारेच पुणे वाहतूक पोलिसांच्या रडारवर

पुणे शहरातील वाहनांची संख्या वाढली आहे. यामुळे वाहतूक ठप्प होण्याचे प्रकार वाढत आहेत. त्यात वाहतूक नियमांचे पालन होत नसल्यामुळे अपघातही वाढले आहे. यामुळे वाहतूक पोलीस अलर्ट मोडवर आले आहे. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार आहे.

नियम तोडून ओळखीने सुटणारेच पुणे वाहतूक पोलिसांच्या रडारवर
पुणे वाहतूक पोलीस
Follow us
| Updated on: Apr 05, 2023 | 9:27 AM

अभिजित पोते, पुणे : रस्त्याच्या चुकीच्या बाजूने (Wrong side) आणि एकेरी वाहन चालवणे, नो-एंट्री झोनमध्ये दुचाकी चालवणारे दुचाकीस्वार वाहनचालकांची संख्या पुणे शहरात वाढत आहे. वाहतूक पोलिसांच्या नोंदींमधून (Traffic police Report) ही बाब समोर आली आहे. नियम तोडणाऱ्या सर्वसामान्यांना दंड होतो, मेमो ठोकला जातो. परंतु अनेक जण आपल्या ओळखीने किंवा पदाचा वापर करत सुटतात. परंतु पुणे वाहतूक पोलिसांसमोर तुमची ओळख किंवा पद आता कामात येणार नाही. कारण नियम तोडला म्हणजे तुम्हाला आता दंड होणार आहे.

वाहतूक पोलीस अलर्ट मोडवर

पुणे शहरात वाहतूक पोलीस अलर्ट मोडवर आले आहे. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई सुरु झाली आहे. शहरातील चौका- चौकात पुणे वाहतूक पोलिसांचे पथक तैनात करण्यात आले आहे. अगदी पुणे शहर वाहतूक पोलीस आयुक्त देखील ॲक्टीव्ह मोडवर आले आहेत. यामुळे गेल्या पंधरा दिवसांत पुणे शहरात 795 जणांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे. वाहतुकीच्या नियम मोडणाऱ्या प्रत्येकावर वाहतूक पोलिसांची नजर असणार आहे. वाहतूक पोलिसांच्या रडावर पोलीस कर्मचारी, सरकारी कर्मचारी, वकील आणि पत्रकार देखील आले आहे. हाच गट ओळखीचा फायदा घेऊन वाहतूक नियम तोडल्यावर दंड न भरता सुटतो.

हे सुद्धा वाचा

पंधरा दिवसांत चांगली कारवाई

वाहतूक नियम मोडणाऱ्या सर्वांसाठी पुणे वाहतूक पोलिसांचा सारखाच नियम आहे. गेल्या पंधरा दिवस लाखो रुपयांचा दंड पुणे पोलिसांनी वसूल केला आहे. वाहतूक नियम मोडणाऱ्या सामान्य पुणेकरांसह, शहरातील पीएमपी बसेसवर देखील वाहतूक पोलिसांची कारवाई केली आहे. पुणे शहर वाहतूक पोलिसांचा सर्वांसाठी समान न्याय देणार असल्याचे पुणे पोलीस वाहतूक विभागाचे उपायुक्त विजयकुमार मगर यांनी सांगितले.

ओळख ठरली नाही फायद्याची

जाऊ द्या मी पोलीस दलात, मी पत्रकार आहे, मी वकील आहे, असे कोणतीही ओळख फायद्याची ठरली नाही. कारण या लोकांवर पोलीसांनी कारवाई केली आहे.

  • पोलीस – 392
  • सरकारी कर्मचारी – 160
  • वकील- 151
  • सैन्य दल- 35
  • PMPL -30
  • पत्रकार -27
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.