Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune Crime| पुणे हादरलं! चिमुरडीचं अपहरण, अत्याचार आणि हत्या

भोर मार्गे जाणाऱ्या वरंधा घाट वाहतुकीसाठी बंद असल्याने वेल्हे पोलिसांनी दहा ते बारा किलोमीटरची पायपीट करून रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील नाटे गावामध्ये वीटभट्टीवरून आरोपीला ताब्यात घेतले होते. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन ग्रामीण पोलिसांनी हा खटला जलदगती न्यायालयात चालवण्याची विनंती केली होती.

Pune Crime| पुणे हादरलं! चिमुरडीचं अपहरण, अत्याचार आणि हत्या
न्यायालयाने आरोपीला सुनावली फाशीची शिक्षा Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 01, 2022 | 1:53 PM

पुणे – वेल्हे तालुक्यातील पानशेतजवळील (Panshet)कुरण खुर्द येथून एका अडीच वर्षाच्या चिमुरडीचे अपहरण(Abduction) करून तिच्यावर लैंगिक अत्याचार करत तिचा निर्घृण खून करणाऱ्या नराधमास न्यायालयाने(Court)  फाशीची शिक्षा सुनावली आहे. सत्र न्यायाधीश एस. ये. देशमुख यांनी हा निकाल दिला. संजय बबन काटकर असे फाशी सुनावलेल्या आरोपीचे नाव आहे. कुरण खुर्द येथील एका वस्तीतून 15 फेब्रुवारी 2021 रोजी काटकर याने मुलगी घरासमोर खेळत असताना तिचे अपहरण केले होते. अपहरण बाबत वेल्हे पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत वेल्हे पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली होती. दरम्यान एका रिक्षातून मुलीला पानशेत रस्त्यावरील मालखेड येथे नेले, अशी माहिती पोलिसांना मिळाली. शोध मोहीम केल्यानंतर हवेली तालुक्यातील मालखेड थोपटेवाडी रस्त्यावरील सिमेंटच्या पाईप मध्ये 16 फेब्रुवारी 2021 रोजी मुलीचा मृतदेह सापडला होता.

आरोपीला अशी केली अटक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी संजय बबन काटकर याने घरासमोर मुलगी खेळत असताना तिचे आपण केले. त्यानंतर मुलीवर लैंगिक अत्याचार करून खून केल्याचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवल्यानंतर निष्पन्न झाले होते. दरम्यान संशयित आरोपीचे चित्र सोशल मीडियावर व्हायरल केल्यानंतर तो हा रायगड जिल्ह्यामध्ये पळून गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार वेल्हे पोलिसांचे पथक त्याठिकाणी रवाना झाले. भोर मार्गे जाणाऱ्या वरंधा घाट वाहतुकीसाठी बंद असल्याने वेल्हे पोलिसांनी दहा ते बारा किलोमीटरची पायपीट करून रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील नाटे गावामध्ये वीटभट्टीवरून आरोपीला ताब्यात घेतले होते. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन ग्रामीण पोलिसांनी हा खटला जलदगती न्यायालयात चालवण्याची विनंती केली होती. या गुन्ह्यात शिवाजीनगर सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल झाल्यानंतर वर्षभरात आरोपीस फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. या प्रकरणात एकूण 17 साक्षीदार तपासण्यात आले होते अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी दिली आहे.

VIDEO : रशियाच्या मिसाइल हल्ल्यात शासकीय इमारत उद्ध्वस्त-Russia Ukraine War

जास्त मीठाचं सेवन करताय? आजच आहारातून कमी करा, टक्कल पडण्यासोबतच अनेक दुष्परिणाम…

VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 1PM | 1 March 2022

'मीच अपहरण केलं अन् हत्या..', सरपंच हत्या प्रकरणी आरोपींची मोठी कबुली
'मीच अपहरण केलं अन् हत्या..', सरपंच हत्या प्रकरणी आरोपींची मोठी कबुली.
बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप
बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप.
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य.
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत.
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य.
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्...
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्....
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप.
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज.
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार.