पुणेकरांनो घराबाहेर पडण्यापुर्वी वाहतुकीतील हा बदल पाहूनच निघा

पुणे विद्यापीठाचे अधिकारी आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची नुकतीच बैठक झाली होती. त्या बैठकीत पुणे विद्यापीठातून रस्ता देण्याचा निर्णय घेण्यात आला.

पुणेकरांनो घराबाहेर पडण्यापुर्वी वाहतुकीतील हा बदल पाहूनच निघा
Savitribai Phule Pune University student molestedImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: Feb 08, 2023 | 1:58 PM

पुणे : पुणे येथील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक(pune univercity) येथील मेट्रोसाठीच्या उड्डाणपुलाचे काम सुरु होणार आहे.त्यामुळे मेट्रोकडून अतिरिक्त बॅरिकेडिंग केले जाणार आहे. पर्यायाने या चौकात वाहतूक कोंडी झाली असती. यामुळे वाहतूक पोलिसांनी विद्यापीठ चौक व गणेश खिंड रस्ता असा वाहतुकीत बदल केला आहे. पुणे विद्यापीठ चौक, बाणेर रस्ता, पाषाण रस्ता, गणेश खिंड आणि सेनापती बापट रस्ता या भागात बदल करण्यात आला आहे. येत्या दोन ते तीन दिवसांपासून हा बदल प्रायोगिक तत्त्वावर लागू केला जाणार आहे. त्यामुळे पुणेकरांनी हा बदल लक्षात घेऊन घराबाहेर पडावे. पुणे विद्यापीठाचे अधिकारी आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची नुकतीच बैठक झाली होती. त्या बैठकीत पुणे विद्यापीठातून रस्ता देण्याचा निर्णय घेण्यात आला.

कसा असणार बदल

  • बाणेर व औंध रस्त्याने विद्यापीठ चौकात येणारी वाहने विना सिग्नल शिवाजीनगरकडे डाव्या लेनने जातील.  विद्यापीठ चौक येथे पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी वेळ देण्यात येत आहे.
  • गणेशखिंड रस्त्याने सेनापती बापट रस्त्याकडे जाण्यासाठी यापूर्वी कॉसमॉस बँक येथे ‘यू टर्न’ देण्यात आला होता. तो ‘यू-टर्न’ बंद करून सेनापती बापट रस्ता जंक्शन येथून उजवीकडे वळण्यास परवानगी देण्यात येणार आहे.
  • सेनापती बापट रस्त्याने (चतुःश्रृंगी मंदिर) येथून विद्यापीठ चौकाकडे येणारी सर्व वाहतूक सेनापती बापट रस्ता जंक्शन येथून डावीकडे वळून सरळ पाषाण रस्त्याकडे वळविण्यात येणार आहे.

औंधकडे जाण्यासाठी पर्यायी मार्ग

हे सुद्धा वाचा
  • पर्यायी वर्तुळाकार मार्ग 1 : गणेशखिंड व सेनापती बापट रस्त्याकडून पुणे विद्यापीठ, चतुःश्रृंगी पोलिस ठाणे, कस्तुरबा गांधी वसाहतीकडे जाणाऱ्या वाहनांनी पाषाण रस्त्याने सिंहगड गेट (पुणे ग्रामीण पोलिस मुख्यालय) येथून उजवीकडे वळून बाणेर रस्त्याने उजवीकडे वळून सरळ विद्यापीठ चौकातून डावीकडे वळून औंधकडे जावे.
  • पर्यायी मार्ग 1 : पाषाण रस्त्याने अभिमानश्री सोसायटी, पाषाण रस्ता जंक्शन, उजवीकडे वळून अभिमानश्री सोसायटी, बाणेर रस्ता जंक्शन उजवीकडे वळून बाणेर रस्त्याने उजवीकडे वळून सरळ विद्यापीठ चौकातून डावीकडे वळून औंध कडे जाता येईल.
  • पर्यायी मार्ग 3 : सेनापती बापट रस्त्याकडून औंधकडे जाणाऱ्या वाहनांनी पाषाण रस्त्याने अभिमानश्री सोसायटी, पाषाण रस्ता जंक्शन, उजवीकडे वळून अभिमानश्री सोसायटी. बाणेर रस्ता जंक्शन डावीकडे वळून बाणेर फाटा, उजवीकडे वळून सर्जा हॉटेल कॉर्नर डावीकडे वळून क्रोमा मॉल रस्त्याने किंवा बाणेर फाटा उजवीकडे वळून आय. टी. आय. रस्ताने परिहार चौक मार्गे इच्छितस्थळी जावे.

राजीव गांधी पुलाकडून गणेशखिंड रस्त्याकडे येणाऱ्यांना 

  • ब्रेमेन चौकातून डावीकडे वळून स्पायसर कॉलेज रस्ता, आंबेडकर चौक, साई चौक, उजवीकडे वळून खडकी पोस्टे रेल्वे अंडरपास डावीकडे वळून चर्चे चौक, जुना पुणे-मुंबई महामार्गाचा वापर करता येईल.
  • पुणे स्टेशन, कोरेगाव पार्क, मुंढव्याकडून औंधकडे जाणाऱ्या वाहनांनी इंजिनीअरिंग कॉलेज उड्डाणपुलावरून, वाकडेवाडी, पोल्ट्री फार्म चौक, चर्च चौक, डावीकडे वळून खडकी पोलिस ठाणे अंडरपास, डावीकडे वळून मरिआई मंदिर, उजवीकडे वळून गोगादेव चौक, उजवीकडे वळून जे टाइप (फुटबॉल ग्राउंड), उजवीकडे वळून साई चौक, डावीकडे वळून आंबेडकर चौक, स्पायसर चौक, ब्रेमेन चौकातून इच्छितस्थळी जावे.
  • पुणे विद्यापीठ चौकात मेट्रोकडून काम सुरू करण्यात येणार आहे. वाहतूक कोंडी होऊ नये; म्हणून परिसरातील वाहतूक बदल करण्याचे काम सुरू आहे. प्रायोगिक तत्त्वावर दोन ते तीन दिवसांत बदलानुसार वाहतूक सुरू केली जाईल.
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.