PUNE UNLOCK | चिअर्स! मद्यविक्रीची दुकाने सातही दिवस सुरु राहणार, रेस्टॉरंट, बारसाठी 11 वाजेपर्यंत परवानगी

कोरोनाची दुसरी लाट आता ओसरत असल्याचं चित्र आहे. त्या पार्श्वभूमीवर पुणेकरांना मोठा दिलासा देण्याचा निर्णय महापालिका प्रशासनानं घेतला आहे.

PUNE UNLOCK | चिअर्स! मद्यविक्रीची दुकाने सातही दिवस सुरु राहणार, रेस्टॉरंट, बारसाठी 11 वाजेपर्यंत परवानगी
Follow us
| Updated on: Jun 13, 2021 | 10:39 PM

पुणे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव ओसरल्यामुळे पुणे जिल्ह्यातील निर्बंध (Pune Unlock) सोमवारपासून उठवण्यात येणार आहेत. यामुळे पुणेकरांना मोठा दिलासा मिळणार आहे. या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेने गाईडलाईन्स जारी (Pune Unlock Guidelines) केल्या आहेत. त्यानुसार पुण्यातील मॉल, अभ्यासिका, ग्रंथालय 50 टक्के क्षमतेने सुरु राहणार आहेत. तर लग्न सभारंभासाठी 50 लोकांना परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान, प्रशासनाने मद्यप्रेमींसाठी चांगली बातमी दिली आहे. कारण पुण्यात मद्यविक्रीची दुकाने आठवड्यातील सर्व दिवस सुरू राहणार आहेत. तसेच रेस्टॉरंट, बारदेखील रात्री 11 वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. (Liquor Shops will be open for Everyday in Pune)

पुण्याच्या शहरी भागात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी असल्याने त्याठिकाणी सरसकट दुकाने उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे. या दुकानांसाठी सकाळी 7 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंतची वेळ ठरवून देण्यात आली आहे. तर पुण्यातील पीएमपी बससेवाही आजपासून 100 टक्के क्षमतेने सुरु होणार आहे. सार्वजनिक बस वाहतूक सुरु झाल्यामुळे पुणेकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.

सोमवारपासून पुण्यात काय सुरु?

  • दुकानं सकाळी 7 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत सुरु राहतील.
  • बसमध्ये 100 टक्‍के आसन क्षमतेने प्रवास, मात्र उभे राहून प्रवास करण्यास मनाई
  • मॉल, अभ्यासिका, ग्रंथालये 50 टक्के क्षमतेने सुरू
  • हॉटेल रात्री 10 वाजेपर्यंत टक्के क्षमतेने सुरू
  • हॉटेलमधील पार्सल सेवा रात्री 11 पर्यंत सुरू राहणार
  • सार्वजनिक मैदाने पहाटे 5 ते सकाळी 9 आणि दुपारी 4 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत खुली राहणार.
  • लग्न सभारंभ कार्यक्रम हे हॉलच्या आसन क्षमतेच्या 50 टक्के क्षमतेने किंवा 50 व्यक्तींच्या उपस्थितीत करण्याची परवानगी राहिल.
  • अंत्यसंस्कार, दशक्रिया आणि संबंधित कार्यक्रम जास्तीत जास्त 20 लोकांच्या उपस्थितत करण्यास परवानगी
  • सामाजिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रम आणि मनोरंजन कार्यक्रमास 50 लोकांच्या उपस्थितीत संध्याकाळी 7 पर्यंत परवानगी
  • विविध बैठका, सभा, स्थानिक संस्था तसेच सहकारी संस्थांच्या मुख्य सभा 50 टक्के उपस्थितीत घेण्यास परवानगी राहिल
  • जिम, सलून, स्पा 50 टक्‍के क्षमतेने सुरू करता येणार
  • शहरात 5 पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास बंदी
  • रात्री 10 नंतर संचारबंदी
  • मद्यविक्रीची दुकाने आठवड्यातील सर्व दिवस सुरू राहणार
  • रेस्टॉरंट, बार, फूड कोर्ट हे रात्री 11 पर्यंत 50 टक्के आसन क्षमतेने सुरु राहतील. पार्सल सेवा/ घरपोच सेवा रात्री 11.00 पर्यंत सुरु राहील

अजित पवार काय म्हणाले?

पुणे शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची घटती संख्या विचारात घेता पुणे शहरातील निर्बध शिथील करण्यात येणार आहे. येत्या सोमवारपासून कोरोना निर्बंध शिथिल करण्यासंदर्भात निर्णय लागू केला जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दुपारी दिली होती. कोरोना संसर्गाचा पॉझिटिव्हीटी दर पाच टक्क्यांच्या आत राहिला, तरच हा निर्णय लागू होईल. मात्र पिंपरी-चिंचवड शहरासह ग्रामीण क्षेत्रात मात्र यापुर्वीचेच निर्बंध कायम राहतील, असेही अजित पवार यांनी सांगितले.

ग्रामीण यंत्रणा अधिक सक्षम होणे गरजेचे

कोरोना रोखण्यासाठी विविध स्तरावर उपचार यंत्रणा निर्माण करण्यात आली. दुसऱ्या लाटेत ग्रामीण भागात बाधितांची संख्या वाढली. त्यामुळे तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता ग्रामीण यंत्रणा अधिक सक्षम होणे गरजेचे आहे. त्यासाठी आवश्यक त्या सुविधा उभारणीवर भर देण्याचे निर्देशही अजित पवार यांनी यंत्रणेला दिले.

संबंधित बातम्या

पुण्यात सोमवारपासून Unlock, काय सुरु, काय बंद? वाचा नव्या गाईडलाईन्स

सोमवारपासून पुणे शहरातील निर्बंध शिथिल करणार, पण लक्षात ठेवा…; अजितदादांनी बजावले

(Liquor Shops will be open for Everyday in Pune)

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.