Pune crime : चांगल्या परताव्याचं आमिष दाखवत डॉक्टरला 35 लाख रुपयांनी फसवलं; वाकड पोलिसांत गुन्हा दाखल

डॉक्टरांनी सुरुवातीला ठराविक रक्कम गुंतवली. याचा सुरुवातीला चांगला परतावादेखील त्यांना मिळाला. या योजनेवर विश्वास बसल्यानंतर डॉक्टरांनी आरोपीच्या खात्यात 35 लाख ट्रान्सफर केले.

Pune crime : चांगल्या परताव्याचं आमिष दाखवत डॉक्टरला 35 लाख रुपयांनी फसवलं; वाकड पोलिसांत गुन्हा दाखल
गृहकर्ज मंजुर करुन घेत बँकेला गंडाImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jul 14, 2022 | 10:10 PM

पुणे : एका पशुवैद्यकीय डॉक्टरची 35 लाख रुपयांची फसवणूक (Duped) करण्यात आल्याचा प्रकार पुण्यात घडला आहे. संबंधित डॉक्टर काळेवाडी येथील आहे. त्याने पोलिसांत फिर्याद दिली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, डॉक्टरला त्याच्या एका रुग्णाने फसवले, ज्याने त्यांना चिटफंड योजनेत (Chit fund scheme) गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आणि मासिक 2% परतावा देण्याचे आश्वासन दिले. वाकड पोलिसांनी आरोपी अनिल सोमशेखरन नायर (53) आणि प्रीता अनिल नायर (42, रा. नवी सांगवी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. वाकड पोलिसांनी (Wakad police) दिलेल्या माहितीनुसार, डॉ. अशोक कृष्णा भोंडवे (62) यांच्या क्लिनिकमध्ये आरोपी आले होते 22 मार्च 2019 रोजी आपल्या कुत्र्याच्या उपचारासाठी त्यांनी भोंडवे यांच्या क्लिनिकला भेट दिली होती. यानिमित्ताने आपल्या चीटफंड योजनेची माहिती त्यांनी डॉक्टरला दिली आणि आपल्या जाळ्यात ओढले.

विश्वास ठेवून गुंतवले पैसे

क्लिनिकमधील विविध भेटी दरम्यान, आरोपीने डॉक्टरांना त्याच्या चिट फंडमध्ये गुंतवणूक करण्याची विनंती केली आणि त्याला 2% मासिक परतावा देण्याचे आश्वासन दिले. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून डॉक्टरांनी सुरुवातीला ठराविक रक्कम गुंतवली. याचा सुरुवातीला चांगला परतावादेखील त्यांना मिळाला. या योजनेवर विश्वास बसल्यानंतर डॉक्टरांनी आरोपीच्या खात्यात 35 लाख ट्रान्सफर केले.

हे सुद्धा वाचा

बाजारातील घसरणीचे कारण देऊन फसवणूक

बाजारातील घसरणीचे कारण सांगून नायरने मूळ रक्कम किंवा व्याज दिले नाही. यामुळे वैतागलेल्या डॉक्टरांनी तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात धाव घेतली. वाकड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यवान माने यांनी सांगितले, की आरोपींनी इतर अनेकांना लुटले असावे, अशी शक्यता आहे. त्यादृष्टीने तपास सुरू आहे. वाकड पोलिसांनी भारतीय दंड संहिता (IPC)च्या कलम 420 (फसवणूक), 409 (विश्वासाचा भंग), चीटफंड आणि पैशांचे वितरण यावर बंदी घालण्यासाठीच्या कायद्याच्या (1978) कलम 3 आणि 4 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.