AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मैदानातील वादातून आधी मित्राला ढकललं, नंतर जमिनीत गाडलं, पुण्यात 13 वर्षीय तरुण ताब्यात

मित्राला गंभीर दुखापत झाल्यामुळे दोघांचेही कुटुंबीय आपल्याला रागवतील, या भीतीतून आरोपीने आणखी एक दगड त्याच्या डोक्यात घातला (Pune Youth kills friend)

मैदानातील वादातून आधी मित्राला ढकललं, नंतर जमिनीत गाडलं, पुण्यात 13 वर्षीय तरुण ताब्यात
Crime-News
| Updated on: Feb 03, 2021 | 8:29 AM
Share

पुणे : किशोरवयीन मुलांच्या वादावादीचं पर्यवसन हत्येत झाल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. मैदानावर झालेल्या वादानंतर 13 वर्षांच्या मुलाने 11 वर्षांच्या मित्राला जमिनीवर ढकललं. यामध्ये जखमी झालेला मुलगा घरी सांगेल, या भीतीने आरोपीने त्याला जमिनीतच गाडल्याचं समोर आलं आहे. पुण्यातील केळेवाडी परिसरात शुक्रवारी 29 जानेवारीला हा प्रकार घडला होता. (Pune Youth kills teen friend over fight)

11 वर्षीय महेश (नाव बदलले आहे) गेल्या शुक्रवारी खेळायला जातो, असं सांगून संध्याकाळी घराबाहेर पडला. मात्र तो उशिरापर्यंत परत न आल्यामुळे कुटुंबीयांनी शोधाशोध सुरु केली. अखेर कोथरुड पोलिसात धाव घेत महेश बेपत्ता झाल्याची तक्रार कुटुंबीयांनी दिली. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करुन महेशचा शोध सुरु केला.

11 वर्षांच्या युवकाचा दगडाखाली मृतदेह

घरापासून जवळपास पाचशे मीटर अंतरावर महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या मोकळ्या प्लॉटमध्ये दोन दिवसांनी पोलिसांना महेशचा मृतदेह सापडला. दगडाखाली त्याचा मृतदेह झाकून ठेवला होता. त्यानंतर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करुन आरोपीचा शोध सुरु केला.

मैदानातील वादातून धक्काबुक्की

तपास करताना महेशच्या 13 वर्षीय मित्रावर पोलिसांना संशय आला. अधिक चौकशीत त्यानेच ही हत्या केल्याचं समोर आलं. महेश आणि आरोपी अल्पवयीन मुलगा हे मित्र होते. दोघे एकत्रच खेळायचे. शुक्रवारीही दोघांमध्ये वादावादी झाली. आधी आरोपीने महेशचे नाक दाबले. त्यानंतर त्याला धक्का दिला. मात्र महेश विटांवर पडल्यामुळे त्याच्या डोक्याला गंभीर जखम झाली. महेशच्या डोक्यातून रक्त येऊ लागल्यामुळे आरोपी घाबरला.

मृतदेहाभोवती दगड रचून पळ

मित्राला गंभीर दुखापत झाल्यामुळे दोघांचेही कुटुंबीय आपल्याला रागवतील, अशी भीती त्याला वाटली. म्हणून त्याने आणखी एक दगड त्याच्या डोक्यात घातला. महेश कोणाला दिसू नये म्हणून त्याच्याभोवती दगडं रचली. मात्र रक्तस्रावामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे. या प्रकरणी आरोपी तरुणाला ताब्यात घेऊन बाल न्यायालयात हजर केले जाणार आहे.

संबंधित बातम्या :

अवघ्या 400 रुपयांसाठी दोन मित्रांमध्ये हाणामारी, एकाचा मृत्यू, थरार सीसीटीव्हीत कैद

साताऱ्यात 150 फूट खोल दरीत बेपत्ता ट्रकचालकाचा मृतदेह आढळला

(Pune Youth kills teen friend over fight)

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.