Mega Bharti : पुणे जिल्हा परिषद भरतीसाठी अर्जांचा पाऊस, ८९९ पदांसाठी किती आले अर्ज?

Pune ZP Mega Bharti News : पुणे जिल्हा परिषदेच्या ८९९ जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु आहे. यासाठी किती जणांनी अर्ज केले आहेत, त्याची माहिती समोर आली आहे. भरती प्रक्रियाचा पुढील टप्पा आता लवकरच सुरु होणार आहे.

Mega Bharti : पुणे जिल्हा परिषद भरतीसाठी अर्जांचा पाऊस, ८९९ पदांसाठी किती आले अर्ज?
Pune Zilla ParishadImage Credit source: tv9 Marathi
Follow us
| Updated on: Aug 31, 2023 | 10:34 AM

पुणे | 31 ऑगस्ट 2023 : पुणे जिल्हा परिषदेसाठी तब्बल ८९९ जागांसाठी भरतीची प्रक्रिया सुरु झाली आहे. पुणे जिल्हा परिषदेमधील ३४ विभागात ही पदे भरली जाणार आहेत. ही भरती प्रक्रियेसाठी २५ ऑगस्टपर्यंत अर्ज स्वीकारण्यात आले. इंस्टीट्यूट ऑफ बँकिंग सिलेक्शन या संस्थेकडून ही प्रक्रिया राबवली जात आहेत. या पदांसाठी किती अर्ज आले, यासंदर्भातील माहिती समोर आली आहे. त्यानुसार मोठ्या संख्येने अर्ज उमेदवारांनी केले आहे. यामुळे या भरतीसाठी चांगलीच स्पर्धा रंगणार आहे.

किती जणांनी केले अर्ज

पुणे जिल्हा परिषदेच्या भरतीसाठी मुदतीअखेर 74 हजार 507 उमेदवारांनी अर्ज मिळाले आहेत. हे सर्व अर्ज ऑनलाइनपद्धतीने मागवण्यात आले होते. भरती प्रक्रियेसाठी सर्वाधिक अर्ज आरोग्यसेवक (पुरुष) पदासाठी सर्वाधिक अर्ज मिळाले आहेत. 124 जागांसाठी 28 हजार 209 उमेदवारांनी अर्ज केले आहेत. तर आरोग्यसेवक महिला 436 जागा आहे. मात्र त्यासाठी केवळ 3 हजार 930 उमेदवारांनी अर्ज केले आहेत.

भरती प्रक्रियेतून किती झाली शुल्क जमा

राज्यातील भरतीसंदर्भात आमदार रोहित पवार यांनी प्रश्न उपस्थित केला होता. या भरतीसाठी घेण्यात येणारे शुल्क कमी करण्याची मागणी त्यांनी केली होती. एकट्या पुणे जिल्हा परिषदेकडे भरती प्रक्रियेसाठी तब्बल 6 कोटी 66 लाख 52 हजार रुपये आले आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गावडे यांनी ही माहिती दिली.

हे सुद्धा वाचा

कोणत्या जागेसाठी किती अर्ज

  • कंत्राटी ग्रामसेवकाच्या 37 जागांसाठी 4 हजार 575 अर्ज
  • आरोग्यसेवक (पुरुष) 128 जागांसाठी 2 हजार 898 अर्ज
  • औषध निर्माण अधिकारी 25 जागांसाठी 5 हजार 573 अर्ज
  • प्रयोगशाळा तंत्रज्ञ चार जागांसाठी 1 हजार 405 अर्ज
  • पशुधन पर्यवेक्षकच्या 30 जागा 463 अर्ज
  • कनिष्ठ आरेखकच्या 2 जागा 68 अर्ज,
  • कनिष्ठ लेखा अधिकारी 3 जागा 213 अर्ज
  • विस्तार अधिकारी (पंचायत) 3 जागा 1 हजार 784 अर्ज
  • विस्तार अधिकारी (सांख्यिकी) 2 जागा 819 अर्ज
  • विस्तार अधिकारी (कृषी) 2 जागा 193 अर्ज,
  • विस्तार अधिकारी (शिक्षण) 2 जागा 144 अर्ज
  • वरिष्ठ सहायक 8 जागा 5 हजार 31 अर्ज

कधी होणार परीक्षा

पुणे जिल्हा परिषदेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता अर्जांची छाननी होणार असून त्यानंतर सप्टेंबरअखेरपर्यंत परीक्षा होण्याची शक्यता आहे. या परीक्षेनंतर निकाल आणि मुलाखती असा क्रम असणार आहे. तलाठी भरती प्रक्रियेनंतर आता जिल्हा परिषदेच्या भरतीला वेग आला आहे.

पुणे जिल्ह्याच्या पुरवठा विभागातील निम्मी पदे रिक्त

राज्य सरकारकडून मंजुरी देण्यात आलेल्या पदांवर देखील पुण्यात पदभरती नाही. पुरवठा विभागात नव्याने भरण्यात 82 पदे येणार होते. मात्र 82 पदांपैकी फक्त 42 पदे भरण्यात आली. इतर महत्त्वाची पदे आजही रिक्त आहेत.

Non Stop LIVE Update
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?.
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला.
'लाडक्या बहिणी'चे भाऊ चीटर, मनसे नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा
'लाडक्या बहिणी'चे भाऊ चीटर, मनसे नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा.
'गुवाहाटीला जाण्याची गरज नाही तर...', संजय शिरसाट नवा प्रदेश शोधणार?
'गुवाहाटीला जाण्याची गरज नाही तर...', संजय शिरसाट नवा प्रदेश शोधणार?.
निकालासाठी 2 दिवस बाकी, एक्झिट पोलनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारी?
निकालासाठी 2 दिवस बाकी, एक्झिट पोलनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारी?.
निकालाआधीच बच्चू कडूंचा मोठा दावा, 'आमच्याशिवाय सत्ता स्थापन....'
निकालाआधीच बच्चू कडूंचा मोठा दावा, 'आमच्याशिवाय सत्ता स्थापन....'.
परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला धुतलं, मुंडेंच्या समर्थकांकडून मारहाण?
परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला धुतलं, मुंडेंच्या समर्थकांकडून मारहाण?.
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?.
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी.
राज्यात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला हक्क?
राज्यात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला हक्क?.