पुणे जिल्हा परिषदेतील विविध विभागांमध्ये मोठी भरती, कशी असणार परीक्षा

Pune Zilla Parishad to recruit : सरकारी नोकरीची अपेक्षा असणाऱ्या उमेदवारांसाठी चांगली बातमी आहे. पुणे जिल्हा परिषद लवकरच मोठी भरती करणार आहे. या परीक्षेसाठी एका संस्थेची नियुक्ती करण्यात आली आहे. परंतु अभ्यासक्रम जिल्हा परिषद करणार आहे.

पुणे जिल्हा परिषदेतील विविध विभागांमध्ये मोठी भरती, कशी असणार परीक्षा
Pune zp
Follow us
| Updated on: Apr 28, 2023 | 2:51 PM

पुणे : पुणे जिल्हा परिषदेसाठी मोठी भरती निघाली आहे. जिल्हा परिषदेतील ३४ विभागात ८९९ पदे भरली जाणार आहे. त्यासाठी भरती प्रक्रिया राबवण्यास सुरुवात झाली आहे. ही भरती प्रक्रिया प्रथमच इंस्टीट्यूट ऑफ बँकिंग सिलेक्शन या संस्थेकडून राबण्यात येणार आहे. या भरतीसाठी अभ्यासक्रम जिल्हा परिषद तयार करणार आहे. ही सर्व प्रक्रिया पारदर्शक होणार असून प्रश्नपत्रिका फुटू नये, यासाठी काळजी घेतली जाणार आहे. अनेक वर्षांपासून रखडलेली ही भरती प्रक्रिया आता सुरु होणार असल्यामुळे अनेक उमेदवारांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

ऑनलाइन होणार परीक्षा

पुणे जिल्हा परिषदेसाठी भरती प्रक्रिया ऑनलाइन होणार आहे. त्यासाठी जिल्हा परिषद एजन्सीला अभ्यासक्रमचा पॅटर्न देणार आहे. त्यानंतर इंस्टीट्यूट ऑफ बँकिंग सिलेक्शन या संस्थेकडून परीक्षा घेतली जाणार आहे. या संस्थेशी यासंदर्भात करार करण्यात आला आहे. जिल्हा परिषदेत ३४ विभागांसाठी ही भरती केली जाणार आहे. त्यासाठी वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाणार आहे.

हे सुद्धा वाचा

अशी घेणार काळजी

भरतीसाठीची प्रश्‍नपत्रिका इंस्टीट्यूट ऑफ बँकिंग सिलेक्शन या एजन्सीद्वारे सेट केले जाणार आहे. मात्र, त्यासाठी त्यांना अभ्यासक्रमाचा पॅटर्न जिल्हा परिषद देणार आहे. त्यानुसार प्रश्‍नपत्रिका तयार होतील. परीक्षेच्या पाच मिनिटांपूर्वी प्रश्‍नत्रिका संबंधित केंद्रावर पोहोचणार आहेत. त्यामुळे प्रश्‍नपत्रिका लिक होणार नाही, असे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले.

एमपीेएससीची भरती

MPSC मार्फत राज्य शासनाच्या पाच विभागाची भरती होणार आहे. त्यासाठी प्रक्रिया राज्य लोकसेवा आयोगातर्फे जाहीर केली आहे. तब्बल पाच विभागातील ६७३ पदांची भरती केली जाणार आहे. या भरतीची पूर्व परीक्षा ४ जून रोजी राज्यातील ३७ जिल्हा केंद्रांवर होणार आहे. MPSC आयोगाने नोटिस काढली असून ट्विटरवर देखील माहिती दिली आहे.

कोणत्या विभागात भरती

  • सामान्य प्रशासन विभाग
  • पाणी पुरवठा आणि स्वच्छता
  • सार्वजनिक बांधकाम विभाग
  • अन्न आणि नागरी पुरवठा
  • वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्ये विभाग
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.