Pune: गणेशोत्सव पुढच्या वर्षी जम्मू-काश्मीरमध्ये, श्रीनगरच्या लाल चौकासह आठ ठिकाणी स्थापणार गणेशमूर्ती

या सार्वजनिक गणेशोत्सवासाठी पुण्यातून गणरायांची मूर्ती जम्मू काश्मीरमध्ये पाठवण्यात येणार आहे. दीड दिवसाचा गणेशोत्सव जम्मू-काश्मीरमध्ये साजरा करण्याची योजना आहे. पाकिस्तान आणि दहशतवाद्यांच्या विरोधात लढा देण्यासाठी काश्मिरी लोकांना बळ मिळावं म्हणुन हा उपक्रम राबवण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.

Pune: गणेशोत्सव पुढच्या वर्षी जम्मू-काश्मीरमध्ये, श्रीनगरच्या लाल चौकासह आठ ठिकाणी स्थापणार गणेशमूर्ती
काश्मिरात गणेशोत्सव साजरा होणार Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Aug 27, 2022 | 5:16 PM

पुणे – लोकमान्य टिळकांनी राष्ट्रप्रेम वाढावे यासाठी पुण्यात सार्वजनिक गणेशोत्सवाची (Ganeshotsav)सुरुवात केली. त्यानंतर गणेशोत्सव राष्ट्रीय स्वरुपात साजरा करण्यात येऊ लागला. समाजात जागृती निर्माण करणे आणि सामाजिक बांधिलकी हा गणेशोत्सवाचा मुख्य उद्देश होता. आता पुण्यातील स्रावजनिक गणेशोत्सव मंडळांनी हाच धागा पकडत, जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu Kashmir)गणेशोत्सव साजरा करण्याचे ठरवलेले आहे. पुढच्या वर्षी पुण्यातील 8 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे जम्मू-काश्मिरात आठ ठिकाणी गणेशोत्सव साजरा करणार आहेत. यात श्रीनगरच्या (Srinagar)लाल चौकासह राज्यात आठ ठिकाणी गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. याबाबत पुण्यात या आठही गणेशोत्सव मंडळांनी पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली.

दीड दिवसांचा गणेशोत्सव

या सार्वजनिक गणेशोत्सवासाठी पुण्यातून गणरायांची मूर्ती जम्मू काश्मीरमध्ये पाठवण्यात येणार आहे. दीड दिवसाचा गणेशोत्सव जम्मू-काश्मीरमध्ये साजरा करण्याची योजना आहे. पाकिस्तान आणि दहशतवाद्यांच्या विरोधात लढा देण्यासाठी काश्मिरी लोकांना बळ मिळावं म्हणुन हा उपक्रम राबवण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.

काश्मिरात कुठे होणार गणेशोत्सव साजरा?

पुण्यातील आठ गणेश मंडळ जम्मू काश्मीरमधील आठ ठिकाणी गणेशाची मूर्ती स्थापन करणार आहेत. यात श्रीनगर, लाल चौक, पुलवामा, कुपवडा, बारामुल्ला, अनंतनाग, खुरआमा, सोफियाम याठिकाणी होणार गणेश मूर्तींची स्थापना करण्यात येणार आहे.

हे सुद्धा वाचा

कार्यकर्त्यांना रोजगार देण्याचा प्रयत्न

याशिवाय आठही गणेश मंडळ मिळून पुण्यात मोरया कार्यकर्ता मंच स्थापन करणार आहेत. ज्यामध्ये कार्यकर्त्यांना रोजगार देण्यासाठी मंडळ प्रयत्न करणार आहेत. त्यासोबतच मंडळाच्या कार्यकर्त्यांना तीन ते पाच लाखापर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. शहरातील सगळ्या मंडळांनी गणेशोत्सव पारंपारिक पद्धतीने साजरा करावा असं अहवान करण्यात आले असून, अशा मंडळांचा गौरव सगळे मिळून करू असंही या आठ गणेश मंडळांनी सांगितले आहे.

वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.