Pune Bhide wada : ऐतिहासिक भिडे वाडा की दारूचा अड्डा? पुण्यातल्या भिडे वाड्याची दुरवस्था, ढुंकूनही पाहायला तयार नाहीत लोकप्रतिनिधी!

भिडे वाड्यात स्वच्छता तर राहिली नाहीच, उलट याठिकाणी मोठ्या प्रमाणावर आक्षेपार्ह बाबी दिसून आल्या. त्या पाहता येथे कोणी राहत आहे का, अशी शंका उपस्थित होत आहे. कारण प्रशासनाचे या वाड्याकडे पूर्णत: दुर्लक्ष झाले आहे.

Pune Bhide wada : ऐतिहासिक भिडे वाडा की दारूचा अड्डा? पुण्यातल्या भिडे वाड्याची दुरवस्था, ढुंकूनही पाहायला तयार नाहीत लोकप्रतिनिधी!
भिडे वाडा (संग्रहित छायाचित्र)Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 10, 2022 | 12:34 PM

पुणे : देशातील पहिली मुलींची शाळा असलेल्या भिडे वाड्याची (Pune Bhide wada) दिवसेंदिवस अतिशय दुरवस्था होऊ लागली आहे. मुलींची पहिली शाळा म्हणजेच पुण्यातील भिडे वाडा सध्या दारूचा अड्डा बनवला आहे. येथे पाहणी केल्यानंतर अनेक धक्कादायक आणि संतापजनक बाबी उघडकीस आल्या आहेत. दारूच्या बाटल्या (Liquor bottles), वेफर्सची पाकिटे, सिगारेटची थोटके अशा वस्तूंचा खच वाड्यात पाहायला मिळत आहे. हे कमी की काय अक्षरश: बिछानाही याठिकाणी दिसून आला आहे. तर दोरीवर वाळत घातलेले कपडेही निदर्शनास आले आहेत. त्यामुळे शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारा हा का तो ऐतिहासिक (Historical) भिडे वाडा, असा सवाल आपल्या मनात आल्याशिवाय राहत नाही. पुणे महानगरपालिकेचेदेखील याकडे दुर्लक्ष झाले आहे. तेव्हा याकडे लक्ष देण्याची इतिहासप्रेमी मागणी करत आहेत.

स्थायी समिती अध्यक्षांच्या वॉर्डातच…

भिडे वाड्यात स्वच्छता तर राहिली नाहीच, उलट याठिकाणी मोठ्या प्रमाणावर आक्षेपार्ह बाबी दिसून आल्या. त्या पाहता येथे कोणी राहत आहे का, अशी शंका उपस्थित होत आहे. कारण प्रशासनाचे या वाड्याकडे पूर्णत: दुर्लक्ष झाले आहे. माध्यमांनी यासंबंधी वारंवार वार्तांकन केले मात्र प्रशासन, पुणे महानगरपालिका यावर ठोस काही करताना दिसून येत नाही. भिडे वाडा असलेल्या ठिकाणच्या वॉर्डात स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने राहतात. मात्र त्यांचे तर दुर्लक्ष झाले आहेच, मात्र इतर लोकप्रतिनिधींनाही याकडे लक्ष द्यायला वेळ नाही.

राज्य महिला आयोगाकडून दखल

भिडे वाड्याच्या या अवस्थेबाबत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनीही ट्विट केले होते. राज्य महिला आयोगाने याबाबतची दखल घेतली असून यासंदर्भात या ठिकाणची सुरक्षितता राखली जावी, याबाबतीत योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश पुणे मनपा आयुक्तांना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले होते.

उरला केवळ जयंती-पुण्यतिथीपुरता!

याठिकाणी केवळ महात्मा फुले तसेच सावित्रीबाई फुले यांच्या जयंती तसेच पुण्यतिथीला त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला जातो. त्याव्यतिरिक्त इथे ना कोणी लोकप्रतिनिधी फिरकतो, ना कोणी सरकारी अधिकारी. तर समाजसेवक आणि फुले विचारांचे अभ्यासकही यावर काहीही बोलत नाहीत. त्यामुळे ऐतिहासिक अशा या वाड्याचे पावित्र्य राखले जावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.