पुरंदरे ते प्रबोधनकार, शरद पवार ते संभाजी ब्रिगेड, राज ठाकरेंचे 10 मोठे मुद्दे

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) सध्या पुणे दौऱ्यावर आहेत, यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

पुरंदरे ते प्रबोधनकार, शरद पवार ते संभाजी ब्रिगेड, राज ठाकरेंचे 10 मोठे मुद्दे
Follow us
| Updated on: Aug 20, 2021 | 5:23 PM

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) सध्या पुणे दौऱ्यावर आहेत, यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. माध्यमांच्या प्रतिनिधींनी राज यांना त्यांच्या अलीकडच्या काही विधानांवरुन प्रश्न विचारले. त्यातही सुरुवातीला राष्ट्रवादीच्या नेत्यांनी राज यांना प्रबोधनकार ठाकरे यांची पुस्तकं वाचण्याचा सल्ला दिला आहे, त्याबद्दल विचारणा केली. यावर राज म्हणाले की, मी माझे आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांची सगळी पुस्तकं वाचली आहेत. त्यासोबत यशवंतराव चव्हाणांची पुस्तकंदेखील वाचली आहेत. परंतु मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत केलेल्या वक्तव्याचा आणि माझ्या आजोबांच्या पुस्तकांचा काय संबंध हे मला शरद पवारांनी सांगावं. यावेळी राज यांनी विविध विषयांवर आपली मतं मांडली. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासूनच राज्यात जातींबद्दलचा द्वेष वाढला हेच खरं आहे, या आपल्या वक्तव्याचा राज यांनी आज पुनरुच्चार केला. (Purandare to Prabodhankar, Sharad Pawar to Sambhaji Brigade, Raj Thackeray’s 10 big Statements)

राज ठाकरेंच्या पत्रकार परिषदेतील 10 महत्त्वाचे मुद्दे

1. मी प्रबोधनकार ठाकरे वाचलेत आणि यशवंतराव चव्हाणसुद्धा

मी प्रबोधनकार ठाकरे वाचलेत आणि यशवंतराव चव्हाण पण वाचलेत. मात्र मी जे बोललो त्याचा माझ्या आजोबांच्या पुस्तकांशी काय संबंध? हे शरद पवारांनी मला एकदा समजावून सांगावं

2. राष्ट्रवादीच्या जन्मानंतर दुसऱ्या जातींबद्दल द्वेष वाढला

“राष्ट्रवादीच्या जन्मानंतर लोकांमधील दुसऱ्या जातींबद्दलचा द्वेष वाढला, यापूर्वी जातीजातीत मतदान व्हायचं, हे तिथपर्यंतच होतं, पण राष्ट्रवादीच्या जन्माननंतर दुसऱ्या जातींबद्दल द्वेष वाढला. हे सर्वांना माहिती आहे. बोललो फक्त मी. यावर मला सांगितलं जातं प्रबोधनकारांचं पुस्तक वाचा. मी सर्वांची पुस्तकं वाचली आहेत. प्रबोधनकरांचे संदर्भ त्या त्या काळातले होते. माझ्या आजोबांचं लिखाण आपल्याला हवं तसं घ्यायचं असं चालणार नाही. मी यशवंतरावांचंही लिखाण वाचलं आहे, त्यांचीही मतं काय होती हेही मला माहिती आहे.

3. बाबासाहेब पुरंदरेंकडे इतिहास संशोधक म्हणून जातो, ब्राह्मण म्हणून नाही

मी बाबासाहेब पुरंदरे यांच्याकडे इतिहास संशोधक म्हणून जातो. ब्राह्मण म्हणून जात नाही. शरद पवारांकडे ते मराठा आहेत म्हणून जात नाही.

4. बासाहेबांनी चुकीचा इतिहास लिहिला म्हणता, पण सिद्ध करा ना

इतिहास चुकीचा लिहला गेला असेल तर बरोबर इतिहास सांगा ना. इतके दिवस त्यांना इतिहास कळला नाही. आताच कळला का? मुळात वाचायचं नाही. लोकांची माथी भडकवायची, असं काही सुरु आहे. बाबासाहेबांनी चुकीचा इतिहास लिहिला म्हणता, पण सिद्ध करा ना. 50 साली पहिलं पुस्तक आलं त्यावेळी तुम्हाला चुकीचा इतिहास कळला नाही का? ज्याचं काही आकलन नाही, त्याच्यावर काय बोलायचं? कोण जेम्स लेन? कुठे आहे सध्या? आग लावायला आला, त्याच वेळी का आला? हे सर्व वेल डिझाईन्ड आहे.

5. 74 वर्षांमध्ये राजकारण बदललं नाही

गेल्या 74 वर्षांमध्ये आपण तेच राजकारण करत आलो आहोत. त्याच चिखलात आहोत. आपल्या हातात आलेल्या वस्तू जसे की स्मार्टफोन याला आपण प्रगती माणू नये हाच त्या मुलाखतीचा उद्देश आहे.

6. निवडणुका जवळ आल्या आहेत, त्यामुळे पुण्यात यावं लागतं

कोरोनामुळे मागील दीड वर्षांपासून आपण घरात होतो. पक्षाची बांधणी, नेमणुका करणे गरजेचं होतं. निवडणुका जवळ आल्या आहेत. त्यामुळे या गोष्टी करणं गरजेचं आहे. त्यामुळे मला इकडे पुण्यात यावं लागतं. हिंदुत्वाचं राजकारण पुर्वीच होतं. वातावरण असणं आणि वातावरण निर्माण करणं या गोष्टी वेगळ्या आहेत. सर्वासान्यांना वाटणं आणि वाटायला लावणं या गोष्टी वेगळ्या आहेत. त्यामुळे बाहेर खरंच वातवरण आहे का? वाटायला लावणं हे होतंय का? हे तपासणं गरजेचं आहे.

7. माझा जन्म कडवट मराठी आणि कडवट हिंदुत्वावादी घरात झाला

मनसेचा झेंडा पक्षस्थापनेपासूनच माझ्या मनात होता. तो मला आणायचा होता. तो कधी आणायचा हे सगळं सुरु होतं. त्यानंतर एके दिवशी तो झेंडा आणायचा हे ठरवलं. माझा जन्म हा कडवट मराठी आणि कडवट हिंदुत्वावादी घरात झाला आहे. त्यामुळे माझ्यावर झालेले संस्कार तेच आहेत.

8. ‘..मग काय भूमिका बदलली काय?’

नरेंद्र मोदी हे विकासाच्या मुद्द्यावर पंतप्रधान झाले, जात-धर्माच्या आधारे नाही. लोक विकासाच्या मुद्द्यावरही मतदान करतात हे दिसलं. पण मी मुलाखतीत एका मुद्द्याच्या अनुषंगाने बोललो. आता काय चाललंय तर जातीचं वातावरण तयार करण्यात येतंय. मी शरद पवार साहेबांची मुलाखत घेतली होती. त्यावर पत्रकार म्हणाले, राज ठाकरेंनी भूमिका बदलली. पण त्याचा काय संबंध. मी त्यांच्या वाढदिवसाला भाषण केलं होतं. त्याची सुरुवात होती, आजचा दिवस पाहता काही गोष्टी या राखूनच ठेवल्या पाहिजेत, वाढदिवशी आपण चांगलं बोलतो. मग म्हणजे काय भूमिका बदलली का? असा सवालही राज ठाकरे यांनी यावेळी विचारलाय.

9. पवार भाषणाची सुरुवात छत्रपती शिवरायांच्या नावाने का करत नाहीत?

शरद पवार त्यांच्या भाषणाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने का करत नाहीत? असा प्रश्न मी पवारांना मुलाखतीत विचारला होता. त्यांचा पक्ष फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारांवर चालणारा पक्ष आहे.

10. प्रबोधनकारांचे संदर्भ त्या काळातले

राष्ट्रवादीच्या जन्मानंतर दुसऱ्या जातीबद्दलचा द्वेष वाढला. यापूर्वी जातीजातीत मतदान व्हायचं. पण राष्ट्रवादीच्या जन्माननंतर दुसऱ्या जातीबद्दल द्वेष वाढला. हे सर्वांना माहिती होतं. बोललो फक्त मी. यावर मला सांगितलं जातं प्रबोधनकारांचं पुस्तक वाचा. मी सर्वांची पुस्तकं वाचलीत. प्रबोधनकरांचे संदर्भ त्या त्या काळातले होते. माझ्या आजोबांचं लिखाण आपल्याला हवं तसं घ्यायचं असं चालणार नाही. मी यशवंतरावांचंही वाचलं आहे, त्यांचेही मत काय होतं हेही मला माहिती आहे, असंही ते म्हणाले.

इतर बातम्या

‘मी प्रबोधनकार वाचले तसे यशवंतराव चव्हाणही वाचले आहेत’, राज ठाकरेंचं राष्ट्रवादीच्या नेत्यांना जोरदार प्रत्युत्तर

‘त्याचा’ संबंध काय हे शरद पवारांनी मला एकदा समजावून सांगावं: राज ठाकरे

पत्रकारांनी नारायण राणेंचं नाव काढलं आणि राज ठाकरे म्हणाले, ऐ चल बस्स…

(Purandare to Prabodhankar, Sharad Pawar to Sambhaji Brigade, Raj Thackeray’s 10 big Statements)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.