एमपीएससी पास दर्शना पवार हत्या प्रकरणातील आरोपीसंदर्भात काय झाला निर्णय?

Pune Cirme News : पुणे एमपीएससी परीक्षा पास झालेली दर्शना पवार हिच्या हत्याप्रकरणात आरोपी राहुल हंडोरे पोलीस कोठडीत होता. त्याच्यासंदर्भात पुणे जिल्हा न्यायालयाने निर्णय दिला आहे. २२ जून पासून तो पोलीस कोठडीत होता.

एमपीएससी पास दर्शना पवार हत्या प्रकरणातील आरोपीसंदर्भात काय झाला निर्णय?
darshana and rahul
Follow us
| Updated on: Jul 04, 2023 | 9:41 AM

पुणे : MPSC परीक्षा उत्तीर्ण होऊन वनअधिकारी पदावर रुजू होणाऱ्या दर्शना पवार हिची हत्या झाली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षे उत्तीर्ण होऊन वर्ग एक अधिकारी होण्यापूर्वी तिची हत्या झाली. तिचा मित्र असलेल्या राहुल हंडोरे यांनेच तिची हत्या केली. दर्शना पवार याच्या हत्येनंतर राहुल हंडोरे फरार झाला होता. गोवा, पश्चिम बंगालमध्ये तो गेला होता. त्यानंतर २२ जून रोजी तो मुंबईत आला असताना त्याला अटक केली होती. त्यानंतर तो पोलीस कोठडीत आहे. त्याची पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्याला पुणे जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले.

काय दिला निर्णय

दर्शना पवार हत्या प्रकरणातील आरोपी राहुल हांडोरी याची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली आहे. पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर हंडोरे याला पुणे जिल्हा सत्र न्यायालयाकडून न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. पुणे जिल्हा सत्र न्यायालयाकडून हंडोरे याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. 18 जून रोजी दर्शना पवार हिची हत्या झाल्याचे उघड झाले होते. या प्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी राहुल हंडोरे याला अटक केली होती.

काय होते प्रकरण

दर्शना पवार आणि राहुल हंडोरे हे मित्र होते. राहुल याला दर्शना हिच्याशी लग्न करायचे होते. परंतु दर्शना त्यास नकार देत होती. त्यामुळे राहुल हंडोरे याने दर्शना पवार हिला १२ जून रोजी राजगडावर फिरण्यासाठी नेले होते. त्यानंतर लग्नाचा विषय काढला. परंतु दर्शना हिने नकार दिला. त्यामुळे त्याच ठिकाणी तिची हत्या करुन तो फरार झाला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन्ही राजगडावर जाताना दिसत होते. परंतु राहुल एकटाच परत आल्याचे दिसले. त्यानंतर राहुल फरार झाला होता. त्याला २२ जून रोजी मुंबईत अटक केली गेली.

हे सुद्धा वाचा
महाराष्ट्रात राजकीय भूकंप? नीलम गोऱ्हेंचं सूचक वक्तव्य, रोख दादांकडेच?
महाराष्ट्रात राजकीय भूकंप? नीलम गोऱ्हेंचं सूचक वक्तव्य, रोख दादांकडेच?.
साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर
साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर.
अलर्ट राहा, कधीही ब्रेकिंग मिळू शकेल, नीलम गोऱ्हेंचं सूचक वक्तव्य
अलर्ट राहा, कधीही ब्रेकिंग मिळू शकेल, नीलम गोऱ्हेंचं सूचक वक्तव्य.
शिंदेंना धक्का, माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती 'मशाल'
शिंदेंना धक्का, माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती 'मशाल'.
राऊतांचा गुलाबराव पाटलांवर निशाणा, 'रेडे गुवाहाटीलाच मारले, डुक्कर..'
राऊतांचा गुलाबराव पाटलांवर निशाणा, 'रेडे गुवाहाटीलाच मारले, डुक्कर..'.
तुम्ही खुनी; कोणत्या तोंडाने मतं मागणार? सुळेंचा कोणावर हल्लाबोल?
तुम्ही खुनी; कोणत्या तोंडाने मतं मागणार? सुळेंचा कोणावर हल्लाबोल?.
शिवरायांचं स्मारक पाहण्यास मुंबईत संभाजीराजे अन् पोलिसांकडून धरपकड
शिवरायांचं स्मारक पाहण्यास मुंबईत संभाजीराजे अन् पोलिसांकडून धरपकड.
'त्यांची दादागिरी संपली', बच्चू कडू यांचा अजित पवारांवर निशाणा
'त्यांची दादागिरी संपली', बच्चू कडू यांचा अजित पवारांवर निशाणा.
शिंदेंच्या मंत्र्यानं वाटलेल्या साड्यांची संतप्त महिलांनी केली होळी
शिंदेंच्या मंत्र्यानं वाटलेल्या साड्यांची संतप्त महिलांनी केली होळी.
'... तर मी 2 वेळेचं जेवले असते', लाडकी बहीण'चं आशा भोसलेंकडून कौतुक
'... तर मी 2 वेळेचं जेवले असते', लाडकी बहीण'चं आशा भोसलेंकडून कौतुक.