Monsoon Update : पुढील पाच दिवस पाऊस, कुठे पडणार पाऊस? मान्सून कुठे पोहचला
Monsoon and weather Update : भारतीय हवामान विभागाने चांगली बातमी दिली आहे. मान्सूनची प्रगती होत आहे. त्यामुळे राज्यात मान्सून वेळेवर येण्याची शक्यता आहे. त्याचवेळी पुढील पाच दिवस पावसाचे असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. पुढील पाच दिवस विदर्भात पाऊस पडणार आहे.
पुणे : उन्हाळ्यात यावर्षी वातावरणाचे विविध रंग पाहिले आहेत. यंदाच्या उन्हाळ्यात पाऊस पडला. मार्च महिन्यात अवकाळी पावसाने शेतीचे नुकसान झाले. एप्रिल महिन्याने पावसाचा सर्व उच्चांक मोडला. मे महिन्याच्या सुरुवातीला घरातील कुलर एसी आणि पंखे बंद होते. मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून तापमानात वाढ होऊ लागली. त्यामुळे आता मान्सूनची वाट पाहिली जात आहे. यंदा मान्सून वेळेवर येणार की उशीर होणार? याचे उत्तर आधी तीन दिवस उशिरा होते. परंतु आता मान्सून वेळेवर दाखल होणार असल्याची चिन्ह निर्माण झाली आहे.
आता कुठे आहे मान्सून
नैऋत्य मान्सून आता अंदमान समुद्रात शनिवारीच दाखल झाला. नैऋत्य मान्सूनचे दक्षिण पूर्व बंगालच्या उपसागरात, निकोबार बेटांवर, दक्षिण अंदमान समुद्रात आगमन झाले. आता बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात मान्सून पोहचला आहे. त्यानंतर अंदमान समुद्र, अंदमान निकोबार बेटांवर आणखी पुढे जाण्यासाठी परिस्थिती अनुकूल निर्माण झाली आहे. पुढील ३-४ दिवसांत नैऋत्य मान्सून अंदमान समुद्र,अंदमान निकोबार बेटांवर आणखी पुढे जाणार आहे. मान्सून अंदमानमध्ये 22 मे रोजी दाखल होतो. मात्र यावर्षी तीन दिवस आधीच मान्सून अंदमानमधील पोहचला आहे.
यंदाचा मान्सून 4 जून रोजी केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. मात्र 1 जून रोजीच केरळमध्ये मान्सून दाखल होणार असल्याचे सांगितले जात आहे.
20 May: Light/moderate isolated rainfall with thunderstorm/lightning/gusty winds over #Vidarbha & #Chhattisgarh during next 5 days and over #Madhya Pradesh during 22nd to 24th May.IMD
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) May 20, 2023
पावसाचा इशारा
हवामान विभागाने पुढील पाच दिवस पावसाचा इशारा दिला आहे. देशात आणि राज्यात काही ठिकाणी वादळासह विजांच्या कडकडासह मध्यम ते जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये २२ ते २४ मे दरम्यान पाऊस पडणार आहे. राज्यात विदर्भात पुढील पाच दिवस पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. राज्यात विदर्भ वगळता मध्य महाराष्ट्र, मराठवाडात उष्णतेची लाट असणार आहे.
तापमान वाढणार
जळगाव जिल्ह्यात चार दिवस म्हणजेच 21 ते 24 मेदरम्यान तापमानाचा पारा सतत 45 सेल्सिअस अंशावर जाईल, असा अंदाज व्यक्त केला गेला आहे. यापूर्वी जळगावचे यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वाधिक उच्चांकी तापमान 45 अंश सेल्सिअस एवढे नोंदले गेलेय. जे देशात सर्वाधिक होते. शहरात शुक्रवारीदेखील 42 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आलीय. नागरिकांना उन्हापासून बचाव करण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्याय.
केळीला फटका
उत्तर महाराष्ट्रात केळीची लागवड मोठ्या प्रमाणात केली जात असते, मात्र यावर्षी तापमानाचा पारा ४५ अंश सेल्सिअसपर्यंत गेल्याने नवीन लागवड केलेल्या केळीच्या रोपांमध्ये मरचे प्रमाण अधिक असल्याने शेतकऱ्यांना फटका बसत आहे.