Raj Thackeray | राज ठाकरेंनी पुण्यात घोषणा केलेले मनसेचे आपत्ती व्यवस्थापन पथक कसे असेल?

पुणे शहरातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांपैकी प्रशिक्षित पुरुष आणि महिला यांचा पथकात समावेश असेल. पुणे शहरात सतत नैसर्गिक आपत्ती कोसळत असते. त्यासाठी 50 जणांचे प्रशिक्षित मनसे रेस्क्यू पथक कार्यरत असेल.

Raj Thackeray | राज ठाकरेंनी पुण्यात घोषणा केलेले मनसेचे आपत्ती व्यवस्थापन पथक कसे असेल?
मनसेचे आपत्ती व्यवस्थापन पथक
Follow us
| Updated on: Jul 20, 2021 | 1:01 PM

पुणे : पुणे महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) पुणे दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राज्यातील पहिल्या आपत्ती व्यवस्थापन पथकाची (Disaster Management Squad) घोषणा केली आहे. पूर, इमारत दुर्घटना यासारख्या संकटकाळात हे आपत्ती व्यवस्थापन पथक प्रशासनाच्या मदतीला येईल. मनसेच्या प्रशिक्षित पुरुष आणि महिला कार्यकर्त्यांचा पथकात समावेश असेल.

कसे असेल मनसेचे आपत्ती व्यवस्थापन पथक?

– मनसेने पुण्यात राज्यातील पहिले आपत्ती व्यवस्थापन पथक स्थापन केले – आपत्ती व्यवस्थापन पथकात 50 मुला-मुलींचा समावेश असेल – शहरातील पूरस्थिती, इमारत दुर्घटना यासारख्या संकटांच्या वेळी मनसेचे आपत्ती व्यवस्थापन पथक प्रशासनाची मदत करणार – आपत्ती व्यवस्थापन पथकातील मुला-मुलींना मनसे प्रशिक्षण देणार

पुणे शहरातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांपैकी प्रशिक्षित पुरुष आणि महिला यांचा पथकात समावेश असेल. पुणे शहरात सतत नैसर्गिक आपत्ती कोसळत असते. त्यासाठी 50 जणांचे प्रशिक्षित मनसे रेस्क्यू पथक कार्यरत असेल. पुणे शहरात वारंवार आपत्ती ओढवत असते. त्या पार्श्वभूमीवर विशेष आपत्ती पथकाची स्थापना करण्यात आली आहे.

राज ठाकरेंच्या मॅरेथॉन बैठका

आगामी पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत. नाशिकनंतर पुण्यात आलेल्या राज ठाकरे यांचा ‘राजसंवाद’ हा दौरा सुरु आहे. दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस असून राज ठाकरे मॅरेथॉन बैठका घेत आहे. मोठ्या उत्साहात राज ठाकरे यांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून स्वागत केलं जात आहे. ठिकठिकाणी फटाक्यांची आतषबाजी आणि घोषणाबाजी केली जात आहे.

राज ठाकरे यांनी आज पांडुरंगाच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करत दर्शन घेत बैठकीला सुरुवात केली होती. उपस्थित वारकऱ्यांनी राज ठाकरे यांना शाल आणि पांडुरंगाची प्रतिमा भेट देऊन स्वागत केले. आज हडपसर आणि कॅन्टोनमेंट विधानसभा मतदार संघाचा आढावा घेतला जात आहे.

मनसे शाखाध्यक्षांसाठी भन्नाट ऑफर

दरम्यान, पुणे महापालिकेत मनसेची चांगली कामगिरी व्हावी म्हणून राज ठाकरे यांनी पक्षाच्या शाखाध्यक्षांसाठी भन्नाट ऑफरही दिली. चांगलं काम करणाऱ्या शाखाध्यक्षांच्या घरी मी जेवायला येईल, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. कार्यकर्त्यांमध्ये उभारी भरण्यासाठी राज यांनी ही ऑफर दिली आहे. सध्या पुण्यता मनसे कार्यकर्त्यांमध्ये या ऑफरची जोरदार चर्चा सुरू आहे.

संबंधित बातम्या:

चांगलं काम करा, तुमच्या घरी जेवायला येतो; राज ठाकरेंची शाखाध्यक्षांना भन्नाट ऑफर

Raj Thackeray | राज ठाकरे पुणे दौऱ्यावर, पदाधिकाऱ्यांसोबत बैठका, मनविसेच्या कार्यकर्त्यांशीही संवाद

(Raj Thackeray announces MNS Disaster Management Squad first in Maharashtra)

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.