Raj Thackeray : राज ठाकरेंच्या उद्याच्या सभेचे टिझर पे टिझर, पिक्चर अभी बाकी है, सभेला पोलिसांची परवानगी
या सभेसाठी पोलिसांकडून मात्र तब्बल 13 अटी घालण्यात आल्या आहेत. राज ठाकरेंच्या औरंगाबादतल्या सभेलाही अशाच 16 अटी घातल्या होत्या. औरंगाबादतल्या सभेनंतर राज ठाकरे यांच्यावर गुन्हाही दाखल झाला होती. त्यामुळे आता पुण्यात तरी अटींचं पालनं होणार? याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे.
पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची तोफ उद्या पुण्यातून धडाडणार आहे. पुण्यातल्या (Pune MNS) या सभेसाठी मनसे नेत्यांकडून जोरदार तयारी करण्यात आलीय. या सभेसाठी मनसेकडून टीझर पे टीझर येत आहेत. आताच या सभेचा दुसरा टीझर (Raj Thackeray Speech Teaser) बाहेर आला आहे. उद्या सकाळी 10 वाजत ही सभा पार पडणार आहे. राज ठाकरेंचा स्थगित झालेला अयोध्या दौरा, बृजभूषण सिंह यांचा झालेला विरोध आणि गेल्या काही दिवसात घडलेल्या राजकीय घडामोडी, मनसे कार्यकर्त्यांची पोलिसांनी केली धरपकड, या सर्व मुद्द्यावर राज ठाकरे चौफेर बॅटिंग करण्याची शक्यता आहे. राज ठाकरेंच्या सभेला पोलिसांची परवानगीही मिळाली आहे. या सभेसाठी पोलिसांकडून मात्र तब्बल 13 अटी घालण्यात आल्या आहेत. राज ठाकरेंच्या औरंगाबादतल्या सभेलाही अशाच 16 अटी घातल्या होत्या. औरंगाबादतल्या सभेनंतर राज ठाकरे यांच्यावर गुन्हाही दाखल झाला होती. त्यामुळे आता पुण्यात तरी अटींचं पालनं होणार? याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे.
मनसे नेते गजानन काळे यांचं ट्विट
टोमणे सभेचा समाचार आता पुण्यात …
हे सुद्धा वाचाउद्या सकाळी १० वाजता राजगर्जना … pic.twitter.com/9VKIEbg1nf
— Gajanan Kale (@GajananKaleMNS) May 21, 2022
मुख्यमंत्र्यांची सभा राज ठाकरेंच्या टार्गेटवर
मनसे नेते गजानन काळे यांनी या सभेचा टीझर ट्विट करत शिवसेनेला सूचक इशारा दिला आहे. टोमणे सभेचा समाचार आता पुण्यात …उद्या सकाळी १० वाजता राजगर्जना, असे म्हणत मुख्यमंत्र्यांची सभा राज ठाकरेंच्या टार्गेटवर असणार आहे, असे सूचक ट्विट काळे यांनी केलं आहे. मुख्यमंंत्र्यांनी बीकेसीत मुन्नाभाई फिरत आहेत आजकाल, त्यांना बाळासाहेब झाल्यासारखं वाटतंय, असे म्हणत राज ठाकरेंचा समाचार घेतला होता. तर आता राज ठाकरे मुख्यमंत्र्यांना जोरदार प्रत्युत्तर देणार हे स्पष्ट झालंय.
अयोध्या दौऱ्याबाबत काय बोलणार?
गेल्या काही दिवसांपूर्वी राज ठाकरेंनी पुण्यातून त्यांच्या अयोध्या दौऱ्याची घोषणा केली होती. मात्र हा दौरा स्थगित करत असल्याचे राज ठाकरे यांनी शुक्रवारी जाहीर केले. या दौऱ्याला भाजप खासदार बृजभूषण सिंह यांचाही जोरदार विरोध झाला होता. राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांनी माफी मागावी अन्यथा त्यांना अयोध्येत पाय ठेऊ देणार नाही अशी भूमिका बृजभूषण सिंह यांनी घेतली होती. त्यावर अद्याप मनसेकडून कोणतीही ठोस प्रतिक्रिया आली नव्हती. त्यामुळे राज ठाकरे त्यावरही बोलण्याची दाट शक्यता आहे. उद्या टार्गेटवर कोण असणार? हा सस्पेन्स लवकरच संपणार आहे.