Raj Thackeray : 1 मे रोजी राज ठाकरे यांची तोफ औरंगाबादेत धडाडणार, पुण्यात केली घोषणा
येत्या 1 मे रोजी आपली औरंगबादमध्ये सभा होईल. त्यानंतर 5 जून रोजी आपण अयोध्येला जाणार आहोत, अशी महत्त्वाची घोषणा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांनी केली. त्यांनी पुण्यात (Pune) एक पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते.
पुणेः येत्या 1 मे रोजी आपली औरंगबादमध्ये सभा होईल. त्यानंतर 5 जून रोजी आपण अयोध्येला जाणार आहोत, अशी महत्त्वाची घोषणा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांनी केली. त्यांनी पुण्यात (Pune) एक पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते. येणाऱ्या काळात मुंबई, पुणे, नाशिकसह औरंगाबाद महापालिकेची निवडणूक आहे. मुंबई, पुणे आणि नाशिकमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपला थोडा तरी करिश्मा यापूर्वी दाखवलाय. नाशिक महापालिकेमध्ये मनसेने सत्तासुद्धा उपभोगली आहे. विशेष म्हणजे औरंगाबादमध्ये शिवसेनेचा चांगलाच जोर आहे. आता हिंदुत्वाच्या भूमिकेवर स्वार घेतल्यानंतर राज यांनी औरंगाबादमध्ये सभा घेण्याची घोषणा केलीय. कारण औरंगाबादच्या कोणत्याही निवडणुकीत धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न होतोच. आता राज महाराष्ट्र दिनी औरंगाबादमध्ये सभेची घोषणा केलीय ते तिथे जाऊन काय फटाके फोडणार याची उत्सुकता आहे.
काय म्हणाले राज?
राज ठाकरे म्हणाले की, येत्या 1 मे रोजी आपली औरंगबादमध्ये सभा होईल. त्यानंतर 5 जून रोजी आपण अयोध्येला जाणार आहे. बरेच दिवस प्रवास नाही केला म्हणून जात आहे, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. ते पुढे म्हणाले की, आमच्याकडून मिरवणुका निघतात. त्यावर दगडफेक होत असतील तर आम्ही शांत बसणार नाही. आमचे हात बांधलेले नाहीत. आम्हालाही दगड हातात घेता येतो. समोर जे काही हत्यार असेल, तर ते हत्यार आमच्या हातात देऊ नका, असा इशाराही त्यांनी यावेळी बोलताना दिला.
राज काय बोलणार?
औरंगाबादमधील सभेत राज काय बोलणार याची उत्सुकता आहे. राज यांच्या उत्तर सभेवर महाविकास आघाडीतून जोरदार टीका झाली. विशेषतः शिवसेनेतून संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसमधून स्वतः शरद पवार, जयंत पाटील, छगन भुजबळ आदींनी राज यांच्या आरोपांना उत्तर दिली. आता राज ठाकरे या नेत्यांना काय उत्तर देणार, याची उत्सुकता लागली आहे. राज यांना अनेकांनी भाजपची बी टीम असे संबोधले आहे. यावरही राज काय भूमिका घेतात, हे पाहावे लागेल. इतर बातम्याः