”राजतिलक की करो तैयारी, आ रहे हैं भगवाधारी’ , महापौर मुरलीधर मोहळांनी दिल्या योगींना शुभेच्छा
पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी देखील, उत्तर प्रदेशमध्ये भाजप सत्ता स्थापन करेल असा विश्वास व्यक्त करत योगी आदित्यनाथ यांचे अभिनंदन केले आहे. महापौर मोहोळ यांनी आपल्या ट्विटर खात्यावर याबाबत पोस्ट करत ' राजतिलक की करो तैयारी, आ रहे हैं भगवाधारी' असा संदेश दिला आहे. सोबतच त्यांनी योगी आदिथयनाथ यांचा विजयी मुद्रेतील फोटो पोस्ट करून त्यांचे अभिनंदन केले आहे.
पुणे – पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे निकाल आज जाहीर होत आहेत. सकाळी 8 वाजता सुरु झालेली मतमोजणी आता अंतिम टप्प्यात येऊन पोहचली आहे आतापर्यंत हाती आलेल्या कलानुसार 5 पैकी 4 राज्यांमध्ये भाजपने (BJP) बाजी मारत असल्याचे दिसून आले आहे. यामध्ये सर्व देशाचे लक्ष लागून राहिलेल्या उत्तर प्रदेशात(Uttar Pradesh) देखील भाजपचीच आघाडी आहे. उत्तर प्रदेशात भाजप 269 जागांवर आघाडीवर आहे. भाजपला सुरुवातीपासून मिळत असलेल्या आघाडीवरून आता पक्षातील नेत्यांनी भाजप राज्यात पुन्हा एकदा सरकार स्थापन करणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ(Murlidhar Mohal) यांनी देखील, उत्तर प्रदेशमध्ये भाजप सत्ता स्थापन करेल असा विश्वास व्यक्त करत योगी आदित्यनाथ यांचे अभिनंदन केले आहे. महापौर मोहोळ यांनी आपल्या ट्विटर खात्यावर याबाबत पोस्ट करत ‘ राजतिलक की करो तैयारी, आ रहे हैं भगवाधारी’ असा संदेश दिला आहे. सोबतच त्यांनी योगी आदिथयनाथ यांचा विजयी मुद्रेतील फोटो पोस्ट करून त्यांचे अभिनंदन केले आहे.
राजतिलक की करो तैयारी, आ रहे हैं भगवाधारी !#BJP4PMC #योगी @myogiadityanath pic.twitter.com/HUFaaJURTA
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) March 10, 2022
उत्तरप्रदेशातील भाजपच्या यशामुळे उत्तर प्रदेशामधील 1985 पासून चालत आलेली परंपरा खंडित होणार आहे.आतापर्यंत उत्तरप्रदेशच्या जनतेने कोणत्याही पक्षाला सलग जनादेश दिलेला नाही . त्यामुळे ही परंपरा खंडित होणार आहे. पंजाबमध्ये आपने आपला जलवा दाखवता काँग्रेसला भुईसपाट केलं आहे.
Vinayak Raut | ‘गोव्यात शिवसेनेला मिळणाऱ्या मतांचा फक्त अंदाज घ्यायचा होता’