Pune Prashant Jagtap : महाविकास आघाडीचा एल्गार; पुण्यात घुमणार आवाज, महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला होणार सभा
पुण्यातील अलका टॉकीज चौकात 30 एप्रिलला होणाऱ्या सभेला सद्भावना निर्धार सभा संबोधण्यात आले आहे. इंधन दर (Fuel), महागाई, राज्यात वाढणाऱ्या धर्मांध सत्तेच्या विरोधात ही सभा होणार आहे. पक्षाचे महत्त्वाचे नेते या सभेला उपस्थित राहणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.
पुणे : महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला पुण्यात महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) सभा होणार आहे. महाविकास आघाडी आणि डाव्या तसेच पुरोगामी पक्षांच्या वतीने ही सभा पुण्यात होणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पुणे अध्यक्ष प्रशांत जगताप (Prashant Jagtap) यांनी दिली आहे. पुण्यातील अलका टॉकीज चौकात 30 एप्रिलला होणाऱ्या सभेला सद्भावना निर्धार सभा संबोधण्यात आले आहे. इंधन दर (Fuel), महागाई, राज्यात वाढणाऱ्या धर्मांध सत्तेच्या विरोधात ही सभा होणार आहे. पक्षाचे महत्त्वाचे नेते या सभेला उपस्थित राहणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. भोंग्यावरून राजकीय वातावरण तापले आहे तर दुसरीकडे इंधन दरवाढ हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची ही महत्त्वाची सभा असणार आहे, असे जगताप म्हणाले.
कोणाकोणाच्या सभा?
एकीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 1 मे रोजी औरंगाबादेत जाहीर सभा आयोजित केली आहे. या सभेतून राज ठाकरे महाविकास आघाडीला घेरणार आहेत. तर, दुसरीकडे त्याच दिवशी मुंबईत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत अतिविराट सभा पार पडणार आहे. भाजपने या सभेला बुस्टर डोस सभा असे टायटल दिल आहे. या सभेतून शिवसेनेची आणि महाविकास आघाडीची पोलखोल करण्यात येणार आहे. तर त्याच वेळी महाविकास आघाडीची पुण्यात ही सद्भावना निर्धार सभा होणार आहे.