‘शरद पवारांवर केलेला आरोप आम्हाला मान्य नाही’, रामदास आठवले यांची भूमिका

राज ठाकरे यांच्याकडून सातत्याने शरद पवार यांच्याकडून राज्यात जातीपातीचं राजकारण होत आल्याचा आरोप केला जातो. त्यावर रामदास आठवले यांनी शरद पवारांकडून तसं होत नसल्याचं म्हटलं आहे.

'शरद पवारांवर केलेला आरोप आम्हाला मान्य नाही', रामदास आठवले यांची भूमिका
रामदास आठवले आणि शरद पवार
Follow us
| Updated on: Nov 13, 2024 | 8:44 PM

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी रामदास आठवले यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्याबाबत केलेल्या आरोपांबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर रामदास आठवले यांनी शरद पवार यांची बाजू घेतली. शरद पवार हे जातीपातीचे राजकारण करत नाहीत, अशी भूमिका रामदास आठवले यांनी मांडली आहे. राज ठाकरे यांच्याकडून सातत्याने शरद पवार यांच्याकडून राज्यात जातीपातीचं राजकारण होत आल्याचा आरोप केला जातो. त्यावर रामदास आठवले यांनी शरद पवारांकडून तसं होत नसल्याचं म्हटलं आहे. निवडणुकीच्या काळात उमेदवार देताना जातीचा विचार केला जातो, असंही रामदास आठवले म्हणाले.

“शरद पवार जातीपातीचे राजकारण करतात असं मला वाटत नाही. आम्ही त्यांच्यासोबत राहिलेलो आहे. प्रत्येक पक्ष उमेदवार देताना जातीचा विचार करतो. शरद पवारांवर करण्यात आलेला आरोप आम्हाला मान्य नाही. मात्र काँग्रेसने जातीवाद संपवलेला नाही. तो संपुष्टात यावा अशी आमची अपेक्षा आहे”, अशी रोखठोक भूमिका रामदास आठवले यांनी मांडली आहे.

‘अशा गोष्टींना आपण समोर गेलं पाहिजे’

“मी आज संगोल्याला गेलो. दोन दिवसांपूर्वी लातूरला गेलो. दोन्ही ठिकाणी माझे हेलिकॉप्टर चेक केले. बॅग चेक केली. हा विषय निवडणूक आयोगाचा आहे. सरकारचा अजिबात नाही. उद्धव ठाकरे यांचं हेलिकॉप्टर चेक केले असे नाही. त्यामुळे या विषयाचा राजकीय बाऊ करू नये. अशा गोष्टींना आपण समोर गेलं पाहिजे”, अशी भूमिका रामदास आठवले यांनी मांडली.

हे सुद्धा वाचा

‘आमच्यावर अन्याय होऊ नये’

“माझ्या पक्षाला दोन जागा मिळाल्या आहेत. 4 किंवा 5 जागा मिळाव्यात अशी अपेक्षा होती. काही कार्यकर्ते नाराज होते. आपल्याला सत्तेत सहभाग मिळणार आहे, असं मी त्यांना सांगितलं. ते कामाला लागलेले आहेत. जे लागलेले नाहीत त्यांनी महायुतीचे काम सुरू करावं”, असं आवाहन रामदास आठवले यांनी केलं. “कुठेतरी आमच्यावर अन्याय होऊ नये. याबाबत मी पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी बोलणार आहे”, असंही रामदास आठवले यांनी सांगितलं.

रामदास आठवलेंची राहुल गांधींवर टीका

“राहुल गांधींना बाहेर गेले की वेगळे विषय सुचतात. वेळ आल्यानंतर आम्ही आरक्षण रद्द करू, असं त्यांनी अमेरिकेत सांगितलं होतं. नरेंद्र मोदी किंवा एनडीए कदापि आरक्षण रद्द करणार नाही. राहुल गांधी म्हणाले त्याप्रमाणे ते आरक्षण रद्द करायला निघाले तर आम्ही त्याला विरोध करू”, असंदेखील रामदास आठवले म्हणाले.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.