Ramdas Athwale : शिंदेंनी उद्धव ठाकरेंचा तर त्याआधी ठाकरेंनी भाजपाचा केला होता करेक्ट कार्यक्रम, रामदास आठवले यांची टोलेबाजी

उद्धव ठाकरेंचा करेक्ट कार्यक्रम हा एकनाथ शिंदे यांनी केला आहे. तर याआधी उद्धव ठाकरेंनी भाजपाचा करेक्ट कार्यक्रम केला होता, अशी टोलेबाजी रामदास आठवले यांनी केली आहे.

Ramdas Athwale : शिंदेंनी उद्धव ठाकरेंचा तर त्याआधी ठाकरेंनी भाजपाचा केला होता करेक्ट कार्यक्रम, रामदास आठवले यांची टोलेबाजी
रामदास आठवलेImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Sep 06, 2022 | 6:00 PM

पुणे : सध्या देशात नरेंद्र मोदी आणि राज्यात एकनाथ शिंदे (Eknath Shinde), देवेंद्र फडणवीस आणि माझ्या बाजूने वारे आहे. पुढच्या निवडणुका आम्ही एकत्रित लढवू. आमच्या पक्षाला जागा मिळाल्या पाहिजेत, ही आमची मागणी आहे. मात्र भाजपाच्या चिन्हावर आम्ही निवडणूक लढवणार नाही, ही भूमिका आम्ही घेतली आहे, असे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले (Ramdas Athwale) म्हणाले आहेत. ते पुण्यात बोलत होते. राज्यात आगामी निवडणुकांसंदर्भात त्यांनी आपले मत व्यक्त केले. सध्या रामदास आठवले भाजपासोबत असून केंद्रात राज्यमंत्री आहेत. मात्र भाजपाच्या चिन्हावर ते निवडणूक लढले. मात्र आता आम्हाला आमच्या चिन्हावर निवडणूक (Election) लढवायची आहे. आम्ही भाजपाच्या चिन्हावर निवडणूक लढणार नाही, असे ठामपणे आठवले म्हणाले आहेत.

‘मनसेला सोबत घेण्यास आमचा विरोध’

राज्यात त्याचप्रमाणे येणाऱ्या महापालिका निवडणुका लक्षात घेता रामदास आठवले म्हणाले, की मनसेला सोबत घेण्यास आमचा विरोध आहे. मनसेच्या भूमिकेमुळे भाजपाला फटका बसू शकतो, असे ते म्हणाले. उत्तर भारतीयांची मते आहेत, गुजराती मते आहेत, दक्षिण भारतीय नागरिकांची मते आहेत. ही मते आपल्याला मिळणार नाहीत, त्यामुळे आपला तोटा होण्याची शक्यता आहे. पुण्याचा विचार केला तर पुण्यात विधानसभेची आम्हाला जागा नाही. मात्र दिली तरी आम्ही निवडून येऊ शकत नाही, हे आठवलेंनी मान्य केले.

‘शिवसेना ही एकनाथ शिंदे यांचीच’

शिवसेना ही एकनाथ शिंदे यांचीच आहे. सुधीर मुनगंटीवार जरी म्हणाले, की करेक्ट कार्यक्रम आम्ही केला, तरी उद्धव ठाकरेंचा करेक्ट कार्यक्रम हा एकनाथ शिंदे यांनी केला आहे. तर याआधी उद्धव ठाकरेंनी भाजपाचा करेक्ट कार्यक्रम केला होता, अशी टोलेबाजी रामदास आठवले यांनी केली आहे.

हे सुद्धा वाचा

‘114 जागा निवडून येण्यास अडचण नाही’

मागीलवेळी भाजपा आणि आरपीआय एकत्र असताना 82 जागी निवडून आणल्या. त्यामुळे मेजॉरिटीपैकी 114 जागा निवडून आणण्यामध्ये आपल्याला काही अडचणी येणार नाहीत, असे मत त्यांनी व्यक्त केले.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.