राज ठाकरे कोणतं पुस्तक शोधत असतील?, यावर सोशल मीडियावर भन्नाट प्रतिक्रिया, राज यांची दीड तासांत ५० हजारांची पुस्तक खरेदी
राज ठाकरे यांनी या दुकानातून सुमारे ५० हजारांची पुस्तके विकत घेतल्याची माहिती मिळाली आहे. यात अनेक ऐतिहासिक पुस्तकांचाही समावेश आहे. यात मराठा रियासतीचे आठ खंड, काही आत्मचरित्र अशी सुमारे २०० पुस्तके या ठिकाणाहून स्वताच्या लायब्ररीसाठी घेतली.
पुणे – राज ठाकरे (Raj Thackeray)पुण्याच्या अक्षरधारा पुस्तकालयात गेल्याचे आणि तिथे पुस्तके (Books)पाहतानाचे फोटो समोर आल्यानंतर, राज ठाकरे कोणते पुस्तक शोधत असतील, यावर सोशल मीडियावर (social media)भन्नाट प्रतिक्रिया आल्या आहेत. या प्रतिक्रि्यांमध्ये – एकहाती सत्ता मिळवण्याचे १०१ उपाय, यू टर्न कसा मारावा, भूमिका बदलण्याचे १०१ उपाय, सकाळी लवकर उठण्याचे १०१ जपानी प्रकार, पुण्याच्या सभेची पुराव्यासकट तयारी, अयोध्येला जाण्याचे छुपे मार्ग, वंयगचित्रांचा अभ्यास, मुख्यमंत्री व्हायचा यशस्वी मार्ग, प्रबोधनकारांचे देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे–हे पुस्तक, घरकोंबडा घरातूीन बाहेर कसा काढायचा, नातवासाठी ब़डबडगीतांचे पुस्तक.. अशा काही प्रतिक्रिया सोशल मीडियावर आल्या आहेत.
राज ठाकरेंची दीड तासांत पुस्तक खरेदी
राज ठाकरे मनसे पदाधिकाऱ्यांच्या भेटींसाठी दोन दिवस पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी मंगळवारी रात्री त्यांनी अक्षरधारा पुस्तकालयाला भेट दिली. अक्षरधारात त्यांनी निवांतपणे बसून पुस्कते पाहिली, चाळलीही. सुमारे दीड तास राज ठाकरे या पुस्तकांमध्ये रमले होते.
५० हजारांच्या पुस्तकांची खरेदी
यावेळी निघताना राज ठाकरे यांनी या दुकानातून सुमारे ५० हजारांची पुस्तके विकत घेतल्याची माहिती मिळाली आहे. यात अनेक ऐतिहासिक पुस्तकांचाही समावेश आहे. यात मराठा रियासतीचे आठ खंड, काही आत्मचरित्र अशी सुमारे २०० पुस्तके या ठिकाणाहून स्वताच्या लायब्ररीसाठी घेतली.
मराठी साहित्याला कसा प्रतिसाद मिळतो, याचीही केली विचारणा
राज ठाकरे अक्षरधारा दुकानात मालकांशी आणि वाचकांशीही संवाद साधला. यावेळी त्यांनी पुस्तकांच्या गॅलरीबाबत काही सूचनाही केल्या. राज ठाकरे यांनी अक्षरधारा पुस्तकालयाला भेट देण्याची ही चौथी वेळ असल्याचे संचालक रमेश राठिवडेकर यांनी सांगितले. यावेळी मराठी साहित्याला वाचकांचा कसा प्रतिसाद मिळतो, याचीही विचारणा त्यांनी आवर्जून केली.
पदाधिकाऱ्यांशी चर्चा आणि सभेची तयारी
राज ठाकरे हे दोन दिनस पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. या भेटीत ते मनसे पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. पुण्यात २१ मेला नदी पात्रात राज ठाकरे यांची सभा होणार आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवरही त्यांचा हा दौरा महतत्वाचा मानण्यात येतो आहे.