“आज बांधलेली वज्रमूठ त्यांनी एकमेकांवर वापरायची वेळ येऊ नये”; मविच्या सभेनंतर भाजप नेत्यानं ठाकरेंना डिवचले

उद्धव ठाकरे अडीच वर्षे घरात बसले होते, त्यानंतर त्यांना लोकांनी फेसबुकवर पाहिले आणि आता त्यांनी वज्रमूठ बांधली आहे असा टोला त्यांनी त्यांना लगावला आहे.

आज बांधलेली वज्रमूठ त्यांनी एकमेकांवर वापरायची वेळ येऊ नये; मविच्या सभेनंतर भाजप नेत्यानं ठाकरेंना डिवचले
Follow us
| Updated on: Apr 02, 2023 | 11:05 PM

पुणे : भाजपच्या हुकुमशाहीविरोधात आम्ही वज्रमूठ बांधली आहे असा इशारा देत छत्रपती संभाजीनगरमध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सभा घेतली. महाविकास आघाडीची ही पहिलीच संयुक्त सभा झाली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला. उद्धव ठाकरे यांनी टीका करताना एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रसरकारवरही त्यांनी सडकून टीका केली. उद्धव ठाकरे यांच्या टीकेनंतर आता सत्ताधाऱ्यांननी त्यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली आहे.

महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना कोरोना काळात घेतलेल्या ऑनलाईन बैठकावरून त्यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. टीका करताना ते म्हणाले की, दोन अडीच वर्षे उद्धव ठाकरे घरात बसले होते. त्यानंतर फेसबूकवर त्यांना लोकांनी पाहिलं आणि त्यांनी आता वज्रमूठ बांधली आहे.

मात्र सध्याच्या काळात त्यांन आता एकमेकांविरोधात त्यांनी ती वापरायची वेळ येऊ नये असा खोचक टोलाही त्यांनी त्यांना लगावला.

उद्धव ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली असली तरी त्यांच्याकडे आता स्वतंत्र अधिकार काही राहिले नाहीत. त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीच्या प्रवाहात त्यांनी येवू नये असा टोलाही त्यांनी त्यांना लगावला आहे. उद्धव ठाकरे यांच्या हातात काही राहिलं नसून त्यांचा रिमोट कंट्रोल वेगळा असल्याचे सांगत त्यांनी त्यांच्या मित्रपक्षावर निशाणा साधला आहे.

ठाकरे गटाच्या नेत्यांकडून सावरकर यांच्यावरूनही भाजपवर टीका केली जात आहे. ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी सांगितले की, स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न देण्याची मागणी आम्हीच पहिल्यांदा केली होती.

मात्र आता भाजपकडून त्यांना भारतरत्न का दिला जात नाही असा सवाल ठाकरे गटाने उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले की, सावरकर यांना भारतरत्न देण्याबाबत आता ठराव झाला असून आता केंद्र सरकार निर्णय घेईल असंही त्यानी यावेळी सांगितले.

शिवसेनेची जी धुळदाण झाली आहे त्याचा आक्रोश आता फक्त उद्धव ठाकरे यांच्या कानात घुमतो आहे मात्र तो आता हिंदूंचा आक्रोश नाही अशी खोचक टीकाही त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर त्यांनी केली आहे.

उद्धव ठाकरे अडीच वर्षे घरात बसले होते, त्यानंतर त्यांना लोकांनी फेसबुकवर पाहिले आणि आता त्यांनी वज्रमूठ बांधली आहे असा टोला त्यांनी त्यांना लगावला आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.