विरोधकांकडून आरोपांची मालिका कशासाठी?; रोहित पवारांचं सूचक ट्विट
रोहित पवार यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी काल दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेवेळी घडलेल्या गोष्टींबाबतचं निरीक्षणही नोंदवलं आहे. (rohit pawar reaction on oppositions allegations )
नगर: अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून आजपर्यंतच्या घडामोडी आणि सरकारवरील आरोपांची मालिका बघता नेमकं काय होतंय, कशासाठी होतंय आणि कोण करतंय याचा अंदाज प्रत्येकाला नक्कीच आला असेल, असं सूचक ट्विट राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केलं आहे. कोणत्याही परिस्थितीत राज्यात सत्ता आणण्यासाठी भाजपची धडपड सुरू असल्याचं पवार यांना या ट्विटमधून सूचित करायचं आहे. (rohit pawar reaction on oppositions allegations )
रोहित पवार यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी काल दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेवेळी घडलेल्या गोष्टींबाबतचं निरीक्षणही नोंदवलं आहे. या पत्रकार परिषदेत शरद पवारांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याबाबतची माहिती मीडियाला दिली. मात्र, त्याचवेळी पवारांना अडचणीत आणणारे प्रश्न विचारण्यात आले. पुरावे म्हणून देशमुखांचे व्हिडीओही दाखवण्यात आले. पत्रकारांकडे हे सर्व मुद्दे आले कुठून?, त्यांना कोण माहिती पुरवत होतं? असा प्रश्न विचारला जात आहे. त्यावर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. पवारांची पीसी सुरू होताच भाजपचे सर्व नेते सोशल मीडियावर सक्रिय झाले होते. पवारांच्या मुद्द्यांवर सोशल मीडियातून प्रतिक्रिया देत होते. तसेच बरीच माहितीही पुरवत होते. यामागे भाजपचा मोठा प्लान दिसतोय, असं पवार म्हणाले.
सरकार पाच वर्षे टिकणार
विरोधकांकडून सातत्याने खोटी माहिती देऊन संभ्रम निर्माण केला जात आहे. केंद्र सरकारकडे अनेक प्रश्न पडले आहेत. त्यावर कोणी बोलताना दिसत नाही. परंतु असे काही विषय आल्यावर हे लोक बोलायला लागतात. याचं वाईट वाटतं, असं सांगतानाच सुशांत सिंग प्रकरणात देखील विरोधकांनी राजकारण केलं. आता देखील दोन महिने हे प्रकरण तापवतील. त्यानंतर सत्य बाहेर येईल, असं त्यांनी सांगितलं. सरकारच्या अडचणी खरोखरच वाढल्या आहेत की विरोधक तसा भास निर्माण करतंय, हे समजून घेतलं पाहिजे. पण विरोधकांनी कितीही काहीही केलं तरी हे सरकार पाच वर्षे टिकेल, असा दावाही त्यांनी केला.
राजकीय ताकद मिळाली का?
मुंबईच्या माजी पोलीस आयुक्तांनी पत्रात ज्या गोष्टी नमूद केल्या आहेत, त्यातील तारखांचा मेळ लागत नाही. पदावर असताना त्या अधिकाऱ्याने कोणाला काहीच सांगितलं नाही. पद गेल्यावरच इतक्या आत्मविश्वासाने हा विषय मांडला. त्यामुळे त्यांना राजकीय ताकद मिळाली की काय असा संशय लोकांमध्ये निर्माण झालाी आहे. यात मोठ्या प्रमाणात राजकारण केले जात आहे. तसेच या गोष्टीमुळे राजकीय युती होते की काय? असा संशय घेण्यासही वाव आहे, असंही ते म्हणाले. (rohit pawar reaction on oppositions allegations )
अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून आजपर्यंतच्या घडामोडी, सरकारवरील आरोपांची मालिका बघता नेमकं काय होतंय, कशासाठी होतंय आणि कोण करतंय याचा अंदाज प्रत्येकाला नक्कीच आला असेल. pic.twitter.com/8r9KT1jzou
— Rohit Pawar (@RRPSpeaks) March 22, 2021
संबंधित बातम्या:
देशमुखांबद्दलचे पवारांचे एक एक दावे, फडणवीसांनी पुराव्यानिशी खोडले, वाचा प्रेसमध्ये काय काय बोलले?
मुख्यमंत्र्यांना दिलेल्या ‘त्या’ अहवालाची सीबीआय चौकशी करा; फडणवीस आज केंद्रीय गृहसचिवांना भेटणार
रश्मी शुक्ला भाजपच्या एजंट, बेकायदेशीरपणे विरोधकांचे फोन टॅप करायच्या; राष्ट्रवादी काँग्रेसचा पलटवार
(rohit pawar reaction on oppositions allegations )