लॉटरी काढली, RTE च्या सोडतीत पुणे जिल्ह्याने केला राज्यात विक्रम, काय आहे प्रकार?

शिक्षण हक्क कायद्यानुसार काढण्यात येणाऱ्या प्रवेशाची लॉटरी निघाली आहे. या लॉटरी प्रक्रियेत पुणे जिल्ह्याने वेगळेपण तयार केले आहे. कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातून सर्वात कमी प्रवेश अर्ज आले आहेत. या प्रवेशासंदर्भात एसएमएस पालकांना पाठवले गेले आहेत.

लॉटरी काढली, RTE च्या सोडतीत पुणे जिल्ह्याने केला राज्यात विक्रम, काय आहे प्रकार?
आरटीई लॉटरी
Follow us
| Updated on: Apr 05, 2023 | 3:11 PM

अभिजित पोते, पुणे : शिक्षण हक्क कायदा म्हणजेच RTE च्या २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेची ऑनलाइन सोडत निघाली आहे. या कायद्यानुसार २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशाची ऑनलाइन सोडत बुधवारी काढण्यात आली. यामुळे आरटीई प्रवेश प्रक्रियेतंर्गत आपल्या मुलाच्या प्रवेशासाठी प्रयत्न करणाऱ्या पालकांची प्रतीक्षा संपली आहे. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकारानुसार सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षासाठी ऑनलाइन सोडत निघाली. या सोडतीमध्येही पुणे जिल्ह्याने विक्रम केला.

काय आहे वेगळेपण

राज्यातील शिक्षण विभागाने आरटीई प्रवेशाची सोडत जाहीर केली.याअंतर्गत प्रवेशासाठी पुणे जिल्ह्यात सर्वात जास्त अर्ज आले आहेत. म्हणजे पुणे जिल्ह्यातील पाल्यांनी या योजनेचा सर्वाधिक लाभ घेतला. तर जागेपेक्षाही कमी अर्ज सिंधुदुर्ग जिल्ह्यात आले आहेत.आरटीई प्रवेशासाठी खासगी शाळांमध्ये राखीव २५ टक्के जागांसाठीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील प्रवेशासाठीची लॉटरी काढण्यात आलीय.

यंदा अर्जांची संख्या मोठी

यंदा अर्ज संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. राज्यातील ८ हजार ८२८ शाळांमधील १ लाख १ हजार ९६९ जागांसाठी ३ लाख ६४ हजार ४७० पालकांनी आपल्या मुलांच्या प्रवेशासाठी अर्ज भरले होते. लॉटरीत प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशाची पुढील प्रक्रिया पूर्ण करता येईल. आरटीई अंतर्गत आर्थिक आणि वंचित घटकांतील मुलांचे २०२३-२४ या शैक्षणिक वर्षासाठी ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया प्राथमिक शिक्षण संचालनालयातर्फे राबवण्यात येत असल्याचे प्रधान सचिव रणजित देओल यांनी सांगितले.

प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे

आरटीई अंतर्गत प्रवेश मिळवण्यासाठी रहिवाशी दाखला, जात प्रमाणपत्र, दिव्यांग प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला( खुल्या प्रवर्गासाठी), जन्माचा दाखला, अनाथालयात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील या योजनेअंतर्गत प्रवेश दिला जातो.

पुणे जिल्ह्यातून यंदा सर्वाधिक अर्ज प्राप्त झाले आहे. यामुळे अनेक विद्यार्थ्यांना प्रवेशापासून वंचित राहावं लागणार आहे. प्रवेशास पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना एसएमएसद्वारे माहिती कळवली जाणार आहे.प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी दिलेल्या मुदतीमध्ये पडताळणी समितीकडून कागदपत्रांची तपासणी करून प्रवेश निश्चित करावा, असेही आवाहन संचालनालयाने केले आहे.

Non Stop LIVE Update
'जनतेने निवडून दिल म्हणून लोकांना काठी हातात घेऊन माणस हाकलण्याची वेळ'
'जनतेने निवडून दिल म्हणून लोकांना काठी हातात घेऊन माणस हाकलण्याची वेळ'.
प्रकाश आंबेडकर पुण्यातील रुग्णालयात दाखल, प्रकृती स्थिर मात्र...
प्रकाश आंबेडकर पुण्यातील रुग्णालयात दाखल, प्रकृती स्थिर मात्र....
ऐन दिवाळीत राजकीय फटाके... सत्ताधारी-विरोधकांचे दावे काय?; बघा व्हिडीओ
ऐन दिवाळीत राजकीय फटाके... सत्ताधारी-विरोधकांचे दावे काय?; बघा व्हिडीओ.
मतदानानंतर राज्यात काय घडणार?; मनसे आमदाराच्या सूचक विधानानं उधाण
मतदानानंतर राज्यात काय घडणार?; मनसे आमदाराच्या सूचक विधानानं उधाण.
पण त्याची जाणीव नाही, वळसे पाटलांच्या आंबेगावात जाऊन पवारांचा हल्लाबोल
पण त्याची जाणीव नाही, वळसे पाटलांच्या आंबेगावात जाऊन पवारांचा हल्लाबोल.
...म्हणून रवी राजांचा भाजपात प्रवेश, वर्षा गायकवाडांनी सांगितलं कारण
...म्हणून रवी राजांचा भाजपात प्रवेश, वर्षा गायकवाडांनी सांगितलं कारण.
'शिंदेंनी माझा घात केला नाहीतर...', बेपत्ता असलेले वगना काय म्हणाले?
'शिंदेंनी माझा घात केला नाहीतर...', बेपत्ता असलेले वगना काय म्हणाले?.
'आपला भाऊ पुन्हा...', लाडक्या बहिणींना शिवसेनेच्या बड्या नेत्याच आवाहन
'आपला भाऊ पुन्हा...', लाडक्या बहिणींना शिवसेनेच्या बड्या नेत्याच आवाहन.
शिंदेंसारखं मी पक्ष-चिन्ह ढापलं नाही, म्हणून.., राज ठाकरे काय म्हणाले?
शिंदेंसारखं मी पक्ष-चिन्ह ढापलं नाही, म्हणून.., राज ठाकरे काय म्हणाले?.
मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, 'या' बड्या नेत्याचा भाजपात प्रवेश
मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, 'या' बड्या नेत्याचा भाजपात प्रवेश.