शेतकरी उपाशी, कारखानदार तुपाशी, शेतकरीद्रोही सरकारविरोधात आंदोलन करणार, सदाभाऊ खोत FRP वरुन आक्रमक

एफआरपी दोन टप्प्यात देण्यात येणार असल्यानं शेतकरी उपाशी आणि कारखानदार तुपाशी, अशी स्थिती निर्माण होणार असून त्या विरोधात सदाभाऊ खोत यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

शेतकरी उपाशी, कारखानदार तुपाशी, शेतकरीद्रोही सरकारविरोधात आंदोलन करणार, सदाभाऊ खोत FRP वरुन आक्रमक
सदाभाऊ खोत
Follow us
| Updated on: Feb 22, 2022 | 3:28 PM

पुणे : राज्य सरकारानं ऊस दराच्या एफआरपी (Sugarcane FRP ) संदर्भात काढलेल्या आदेशावरुन स्वाभिमानी शेतकरी संघटेनेचे राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. स्वाभिमानी पाठोपाठ रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) देखील आक्रमक झाले आहेत. एफआरपी दोन टप्प्यात देण्यात येणार असल्यानं शेतकरी उपाशी आणि कारखानदार तुपाशी, अशी स्थिती निर्माण होणार असून त्या विरोधात सदाभाऊ खोत यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. सदाभाऊ खोत यांनी 26 फेब्रुवारीपासून राज्य सरकार विरोधात आंदोलन करणार असल्याचं जाहीर केलं आहे. महाविकास आघाडी सरकारनं एफआरपीच्या नियमांमध्ये बदल करुन ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसला असल्याचा आरोप सदाभाऊ खोत यांनी केलाय. महाविकास आघाडीचं हे सरकार शेतकरीद्रोही असल्याचा गंभीर आरोप खोत यांनी केला आहे. सदाभाऊ खोत शिर्डीतून या आंदोलनाचं रणशिंग फुंकणार आहेत.

शेतकरी उपाशी, कारखानदार तुपाशी

महाविकास आघाडी सरकारने ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसलेला आहे. शुगर केन कंट्रोल अॅक्ट 1966 नुसार शेतकऱ्यांना केंद्र सरकारने जाहीर केलेली FRP ऊस तुटल्यानंतर 14 दिवसाच्या आत एकरकमी मिळाली पाहिजे हा कायदा होता, पण या कायद्याची पायमल्ली करण्याचं काम राज्य सरकार करत आहे. ही FRP आता दोन टप्यामध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार आहे. पहिला टप्पा हा पश्‍चिम महाराष्ट्र, खानदेशासाठी 10% रिकवरीचा आहे. दुसरा कप्पा मराठवाडा विदर्भसाठी 9.5% रिकव्हरी चा आहे. याच्यातुन तोडणी वाहतूक वजा करायची आहे. दुसरा हप्ता साखर कारखान्याचा गाळप हंगाम संपल्यानंतर 15 दिवसांनी द्यायचा आहे आणि कारखान्याने केलेले जे खर्च आहेत, ते सर्व खर्च वजा करून राहिलेले पैसे शेतकऱ्याला द्यायचे आहेत. याचा अर्थ सरळ आहे कि, “साखर कारखानदार तुपाशी अन् माझा शेतकरी उपाशी” अशा पद्धतीचा निर्णय या सरकारने घेतलेला आहे, असं सदाभाऊ खोत म्हणाले आहेत.

शेतकरीद्रोही सरकार राज्यात काम करतंय

हे सरकार शेतकऱ्यांचे नाही तर शेतकऱ्यांना मातीत घालणारं आहे. असं हे शेतकरीद्रोही सरकार या राज्यांमध्ये काम करत आहे आणि या सरकारच्या विरोधामध्ये येत्या 26 फेब्रुवारीला शिर्डी जिल्हा अहमदनगर येथून रयत क्रांती संघटना व भाजप किसान मोर्चा अशी संयुक्तरित्या आंदोलनाची घोषणा करत आहे. या सरकारच्या विरोधामध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे आंदोलन उभे केले जाईल, असा इशारा रयत क्रांती संघटनेचे संस्थापक, माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिला.

इतर बातम्या :

संपामुळे झालेले नुकसान कामगारांकडून वसूल नाही करणार, महामंडळ काय म्हणालं?

VIDEO: नक्षलवाद्यांच्या धमक्या येतात, माझ्यावर परिणाम होत नाही, मी फक्त काम करत राहतो: एकनाथ शिंदे

मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.