सांगली: राज्यातील आघाडी सरकारच्या कारभारावर रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी टीका केली आहे. राज्यातलं आघाडीचं सरकार कोरोनाच्या महालात झोपलेलं भुताटकी सरकार आहे, अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली आहे. (Sadabhau Khot slams maha vikas aghadi over various issues)
सदाभाऊ खोत यांनी मीडियाशी संवाद साधताना ही टीका केली. हे सरकार कोरोनाच्या महालात झोपलेलं भुताटकीचं सरकार आहे. सरकार विरोधात कोणी आंदोलन करणार असेल तर त्याला कोरोनाची भीती दाखवण्याचं काम या भुताटकी सरकारकडून करण्यात येते, अशी टीका खोत यांनी केली.
यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरूनही ठाकरे सरकारवर टीका केली. मराठा आरक्षणाच्या बाबतीत आता केंद्राला साकडे घालण्याचा उद्योग या सरकारकडून करण्यात येत आहे. मग दीड वर्ष तुम्ही झोपा काढत होता का? असा सवाल करतानाच या सरकारने केंद्राऐवजी स्मशानभूमीला साकडे घातले पाहिजे, अशी टीकाही त्यांनी केली.
यंदाच्या पंढरपूरच्या वारीबाबत राज्य सरकारने योग्य ती भूमिका घेऊन परवानगी देणे गरजेचे आहे. कारण राज्यात सगळ्या निवडणुका जर पार पडत असतील तर पंढरीच्या वारीला काय अडचण आहे? असा सवाल त्यांनी केला. वारकरी संप्रदायाने यंदा वारी काढण्याबाबतचा निर्णय घ्यावा. रयत क्रांती संघटना सोबत असेल, असंही ते म्हणाले.
आज महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दुधाला 8 रुपये प्रति लिटर कमी दर मिळत आहे. राज्य सरकारच्या परिपत्रकाला सुद्धा सहकारी आणि खाजगी दूध संस्थांच्याकडून केराची टोपली दाखवण्यात येत आहे. राज्य सरकारच्या आदेशाचा भंग होत असूनही दूध संस्थांवर कारवाई केली जात नाही. खाजगी दूध संस्थांवर कारवाई करण्याचा अधिकार नसल्याचे दुग्ध विकास विभागाकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे हा विभाग बंद केला पाहिजे, असं ते म्हणाले. रयत क्रांती संघटनेकडून 10 जून रोजी दूध दरवाढीच्या मागणीसाठी राज्यभरात चाबूक फोडो आंदोलन करण्यात येणार आहे. तशी माहितीही त्यांनी दिली. (Sadabhau Khot slams maha vikas aghadi over various issues)
100 SuperFast News | सुपरफास्ट 100 न्यूज | 8 AM | 7 June 2021 https://t.co/nHEb3Urx4Y #News #Bulletin
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 7, 2021
संबंधित बातम्या:
भाजपच्या अध्यात्मिक आघाडीकडून हिंदू धर्म बदनाम करण्याचा प्रयत्न: सचिन सावंत
(Sadabhau Khot slams maha vikas aghadi over various issues)