संजय राऊत यांच्या अडचणी वाढणार, पुणे पोलिसांनी जवळच्या व्यक्तीवर केला गुन्हा दाखल
Sanjay Raut Business Partner Sujit Patkar : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या जवळच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे संजय राऊत यांच्या अडचणी वाढणार आहे. कोरोनाकाळात जम्बो कोविड सेंटरचे कंत्राट एका बनावट कंपनीला दिल्याचा आरोप आहे.
पुणे : शिवसेनेचे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या अडचणी वाढणार आहे. संजय राऊत यांच्या जवळच्या व्यक्तीवर पुण्यात गुन्हा दाखल झाला आहे. बनावट कंत्राट घेतल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आरोप केले होते. खासदार संजय राऊत सध्या मनी लाँड्रिंग प्रकरणात जामिनावर बाहेर आले आहेत. ठाकरे गटाची भूमिका जोरदारपणे ते नियमित मांडत आहे. त्याचवेळी सत्ताधाऱ्यांवर जहीर टीकाही ते करत असतात.
Shivajinagar Police Station, Pune yesterday night registered FIR No. 80/2023 IPC Sections 420, 406, 465, 467, 468, 471, 511, 34 against Sujit Patkar (Sanjay Raut's partner).Lifeline Hospital Management Services and other partners Dr Hemant Gupta, Sanjay Shah, Raju Salunkhe
हे सुद्धा वाचा— Kirit Somaiya (@KiritSomaiya) April 21, 2023
कोणावर झाला गुन्हा दाखल
संजय राऊत यांचे व्यावसायिक भागिदार सुजित पाटकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे पोलिसांनी सुजित पाटकर यांच्यावर बनावट कंत्राट घेतल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पुणे पोलिसांनी सुजित पाटकर यांच्याविरुद्ध भादंवि कलम ४२०, ४०६, ४६५, ४६७, ४६८, ४७१, ५११, ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
काय आहे प्रकरण
शिवाजी नगर पुणे जम्बो कोविड सेंटरचा ठेका घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी सुजित पाटकर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. सुजित पाटकर यांच्याशिवाय लाइफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस आणि इतर अनेकांविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला आहे. त्यात हेमंत गुप्ता, संजय शाह, राजू साळुंके यांचा समावेश आहे.
The contract of Shivaji Nagar Pune Jumbo Covid Center was obtained by fraud, 3 covid patients died and many covid patients suffered permanent loss
Pune Metropolitan Region Development Authority PMRDA & Myself (Dr Kirit Somaiya) had filled complaint earlier with Police
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) April 21, 2023
याप्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आरोप केले होते. किरीट सोमय्या यांनीही ट्विट करत याची माहिती दिली आहे. 100 कोटी रुपयांच्या कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी मुंबईत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, वरळी, दहिसर, महालक्ष्मी रेसकोर्स, मुलुंड आणि पुणे येथे उभारल्या जाणाऱ्या जम्बो कोविड सेंटरचे कंत्राट एका बनावट कंपनीला मिळाले होते, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. सुजित पाटकर यांच्यावर यापूर्वी मुंबईतील आझाद मैदान पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हे ही वाचा
दांपत्याने पुण्यातील लोकांना तब्बल १६ कोटींत फसवले, वाचा कसे गंडवले शेकडो पुणेकरांना
पुणे शहरातील डॉक्टरासह नऊ जणांची कोट्यवधीत फसवणूक? काय केले नेमके आरोपीने?
पुणे येथील उच्चशिक्षित २०० तरुणांना ३०० कोटींचा गंडा, पोलीस आयुक्तालयासमोरच कार्यालय उघडून फसवणूक