पुणे महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना राष्ट्रवादीचं ठरलं, संजय राऊतांकडून मोठी घोषणा

शिवेसना नेते संजय राऊत (Sanjay Raut on PMC Election) यांनी पुणे महापालिका निवडणुकीबाबत मोठ वक्तव्य केलं आहे.

पुणे महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना राष्ट्रवादीचं ठरलं, संजय राऊतांकडून मोठी घोषणा
संजय राऊत, शिवसेना
Follow us
| Updated on: Feb 20, 2021 | 3:02 PM

पुणे : शिवेसना नेते संजय राऊत (Sanjay Raut on PMC Election) यांनी पुणे महापालिका निवडणुकीबाबत मोठ वक्तव्य केलं आहे. राऊत यांनी पुण्यात शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र लढतील, अशी घोषणा केली आहे. ते पुण्यात बोलत होते. (Sanjay Raut said Shivsena and NCP jointly will contest PMC Election)

राष्ट्रवादी शिवसेना एकत्र लढणार तर काँग्रेसचं काय?

पुणे महापालिकेत सध्या भाजप सत्तेत आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पुणे महापालिका निवडणूक एकत्रितपणे लढणार आहे. तर, काँग्रेसला सोबत घेण्याचा विचार असल्याचंही राऊत यांनी स्पष्ट केलं.

पुण्यात महाविकास आघाडी एकत्र येणार?

एकत्र लढणं हे सत्ता परिवर्तनाच्या दिशेने टाकेलेले पाऊल असंत, असं संजय राऊत म्हणाले. राज्यात महापालिकेच्या निवडणुका एकत्र लढाव्यात, यासाठी महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये प्रयत्न सुरु आहेत. महापालिकेत ज्या पक्षाची ताकद आहे, त्या पक्षाने पुढाकार घेऊन आघाडी करावी असा विचार करण्यात येईल. निवडणुका एकत्र कशा लढता येतील यावर आम्ही अजित पवार यांच्याशी चर्चा करणार आहोत. एकत्र निवडणूक लढली तर नक्कीच त्याचा फायदा होईल. सत्ता काबीज करण्यासाठी मदत होईल, असंही राऊत म्हणाले.

शेतकरी आंदोलनाद्वारे मोदींना उत्तर देतील

कृषी कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या कमी झाली असेल. पण ज्या पद्धतीने टिकैत राजस्थान, हरियाणा सारख्या राज्यात ज्या पद्धतीने महापंचायत घेत आहेत. त्यावरुन शेतकरी आंदोलन कमी होतंय हे म्हणणं चुकीचं आहे. शेतकरी आंदोलनाच्या माध्यमातून मोदींना उत्तर देतील, असंही राऊत म्हणाले. देवेंद्र फडणीवस यांची मुलाखत घेऊ, राजकारणात चर्चा होत असतात. त्यांची मुलाखत नक्कीच घेऊ, असेही ते म्हणाले.

तीन पैलवान एकत्र आले तरी जनता आमच्या सोबत : चंद्रकांत पाटील

“जनता आमच्या सोबत आहे. त्यामुळे आमच्या विरुद्ध तीन तीन पैलवान एकत्र आले, तरी आम्हीच पुण्याची महापालिका जिंकू याबद्दल माझ्या मनात शंका नाही,” असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला. पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी विविध विषयांवर प्रतिक्रिया दिली.

संबंधित बातम्या:

महाविकास आघाडीचं ठरलं ! भाजपला रोखण्यासाठी ग्रामपंचायतही एकत्र लढणार !(Opens in a new browser tab)

राज ठाकरेंचं ‘मिशन पुणे’, ग्रामपंचायतसाठी कंबर कसली, दोन दिवस पुण्यात तळ(Opens in a new browser tab) (Sanjay Raut said Shivsena and NCP jointly will contest PMC Election)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.