‘आमच्या पाडापाडीत तुम्ही पडू नका, हवा तेज है, अजितराव टोपी उड जाएगी’, संजय राऊतांचा इशारा

"लोकं म्हणतात, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे विकलं ते विकलं, पण त्यांनी काही गोष्टी खरेदी सुद्धा केल्या आहेत. त्यांनी कोर्ट खरेदी केलं. त्यांनी निवडणूक आयोग खरेदी केले. त्यांनी महाराष्ट्रातील आमदार-खासदार खरेदी केले", अशी टीका संजय राऊत यांनी आपल्या भाषणात केली.

'आमच्या पाडापाडीत तुम्ही पडू नका, हवा तेज है, अजितराव टोपी उड जाएगी', संजय राऊतांचा इशारा
Follow us
| Updated on: Dec 30, 2023 | 7:06 PM

योगेश बोरसे, Tv9 मराठी, पुणे | 30 डिसेंबर 2023 : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुण्यात शेतकरी आक्रोश मोर्चाच्या समारोपाच्या कार्यक्रमात भाजप आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. या कार्यक्रमाला महाविकास आघाडीचे नेते उपस्थित होते. संजय राऊत यांनी भाषणाच्या सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची राजकारणातील भीष्मपितामह असा उल्लेख केला. तर खासदार अमोल कोल्हे आणि खासदार सुप्रिया सुळे यांचा निलंबित खासदार असा उल्लेख केला. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिमिक्री करत निशाणा साधला. “आमच्या पाडापाडीत तुम्ही पडू नका, हवा तेज है, अजितराव टोपी उड जाएगी”, असा टोला राऊतांनी लगावला.

“लोकं म्हणतात, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे विकलं ते विकलं, पण त्यांनी काही गोष्टी खरेदी सुद्धा केल्या आहेत. त्यांनी कोर्ट खरेदी केलं. त्यांनी निवडणूक आयोग खरेदी केले. त्यांनी महाराष्ट्रातील आमदार-खासदार खरेदी केले. त्यामुळे हे विसरु नका, काही विकलं तर काही खरेदी केलं आहे. जे खरेदी केलं आहे त्याच्यावर तो राज्य करतोय. हे राज्य आपल्याला उलथवून टाकायचं आहे”, अशी टीका संजय राऊतांनी केली.

संजय राऊतांचा मिश्किल टोला

“शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळायला हवी आणि शेतकऱ्यांच्या मुलांसाठी शैक्षणिक कर्जाचे धोरण लागू करावे, असे पाच-सहा प्रमुख प्रश्न आहेत. हे प्रश्न घेऊन सुप्रिया सुळे किंवा अमोल कोल्हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे गेले असते तर त्यांनी काय सांगितलं असतं, रामलल्ला का दर्शन फ्री कराएँगे. 2 कोटी बेरोजगारांना नोकऱ्या देणार होते. त्यावरही एकच उत्तर रामलल्ला का दर्शन फ्री कराएँगे”, असा मिश्किल टोला संजय राऊतांनी लगावला.

“राम मंदिरासाठी केलेल्या आंदोलनातला मी आरोपी आहे. मी आतापर्यंत 10 वेळा सीबीआयसमोर चौकशीला जाऊन हजर राहिलेलो आहे. एक लक्षात घ्या, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे नसते तर… बाळासाहेब ठाकरे त्यावेळी वाजपेयींना म्हणाले होते… लेकीन अभी मोदी आया तो देश गया”, अशी शाब्दिक फटकेबाजी त्यांनी केली.

‘भाजपची युती फक्त ईव्हीएम बरोबर’

“आपल्याला अत्यंत शहाणपणाने विचार करायचा आहे. ईव्हीएम मशिन नसेल तर भाजप ग्रामपंचायत, नगरपालिकादेखी जिंकणार नाही. ही सगळी ईव्हीएमची ताकद आहे. आमची महाविकास आघाडी आहे. भाजपची युती फक्त ईव्हीएम बरोबर आहे. हा आक्रोश मोर्चा आहे का? माझा आक्रोश शब्दावर आक्षेप आहे. हा महाराष्ट्र लढणार आहे. या महाराष्ट्राचा स्वाभिमान, अस्मिता या सध्याच्या सरकारने दिल्लीच्या वाटेवर पाय पुसण्यासारखी पाडून ठेवली आहे. पाय पुसायचा आणि पुढे जायचं”, असं संजय राऊत म्हणाले.

‘गुजरातला सोन्याने एकदा मढवून टाका’

“एक काळ होता की, आम्ही अभिमानाने सांगायचो की, महाराष्ट्र मेला तर राष्ट्र मेले, मराठाविना महाराष्ट्र गाडा न चाले, खरा वीर वैरी पराधिनतेचा, महाराष्ट्र आधार या भारताचा, महाराष्ट्राची आज काय परिस्थिती आहे? महाराष्ट्र अनेक वर्ष देशाचं पोट भरत होता. पण महाराष्ट्रात येणारा प्रत्येक उद्योग गुजरातला जातोय. गुजरातचा विकास होणं यात काही वाईट नाही. त्याबाबत आमचा काही आक्षेप नाही. देशाचा विकास झाला पाहिजे. पण जे जे महाराष्ट्राच्या वाटेचं, मराठी माणसाच्या भाग्याचं आहे ते सर्व एका राज्यात जातंय, आणखी दोन उद्योग गेले, एक टेस्ला आणि सिंधुदुर्गातील पाणबुडीचा उद्योग गेला. अरे त्यापेक्षा गुजरातला सोन्याने एकदा मढवून टाका”, असा टोला त्यांनी लगावला.

‘बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर’

“तुम्ही काय-काय नेणार आहात? पण मराठी माणासाचं मनगट नेणार नाही. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्य आहे. हिमालयाने साद घातली की महाराष्ट्र धावतो, सह्याद्री धावतो, त्या सह्याद्रीशी अशाप्रकारे खेळण्याचा प्रयत्न करु नका. तुम्हाला गरम पडल्याशिवाय राहणार नाही. हे सर्व्हे बिर्व्हे झूठ आहे. 2024 ला नरेंद्र मोदी पंतप्रधान होत नाहीत हे लक्षात ठेवा. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार येईल आणि केंद्रातही इंडिया आघाडीचं सरकार येतंय. ज्याप्रकारचं वातावरण आम्ही बघतोय ते अत्यंत आशावादी आहे. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड हा सगळा घपला आणि जुमला आहे. आता बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर”, असं संजय राऊत आपल्या भाषणात म्हणाले.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.