संत तुकाराम महाराज पालखी 1 जुलैला देहूवरुन पंढरपूरकडे निघणार, वाचा 1 ते 19 जुलैचा प्रस्थान कार्यक्रम

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील मानाचा संत तुकाराम महाराज पालखी सोहळा 1 जुलै 2021 रोजी पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. यंदाही गतवर्षीप्रमाणेच आषाढी वारी सरकारच्या वतीने घालून दिलेल्या नियमावलीत पार पडणार आहे.

संत तुकाराम महाराज पालखी 1 जुलैला देहूवरुन पंढरपूरकडे निघणार, वाचा 1 ते 19 जुलैचा प्रस्थान कार्यक्रम
Follow us
| Updated on: Jun 29, 2021 | 11:25 PM

पुणे : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील मानाचा संत तुकाराम महाराज पालखी सोहळा 1 जुलै 2021 रोजी पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. यंदाही गतवर्षीप्रमाणेच आषाढी वारी सरकारच्या वतीने घालून दिलेल्या नियमावलीत पार पडणार आहे. 1 जुलै 2021 ते 19 जुलै 2021 पर्यंत प्रस्थान सोहळा असेल. त्यानंतर पादुका मुख्य मंदिरात राहणार आहेत. पहाटे 4 ते 5 सर्व देवांची महापूजा करण्यात येईल. सकाळी 9 ते 12 सप्ताहाच्या काल्याचे किर्तन देवकर महाराज करतील. दुपारी 2 वाजता प्रस्थान सोहळा कार्यक्रम असेल (Sant Tukaram Maharaj Palakhi Sohala Ashadhi wari program Dehu to Pandharpur).

1 ते 19 जुलै दरम्यान नित्याचे कार्यक्रम

  • पहाटे 4 ते 6 सर्व देवांची नित्य पूजा
  • सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत पालखी सोहळा वाटचालीचे कार्यक्रम
  • सायंकाळी 6 वाजता समाज आरती
  • सायंकाळी 9 ते 11 कीर्तन सेवा
  • सायंकाळी 11 नंतर शेज आरती

19 जुलै रोजी सकाळी 9 वाजता पादुका पंढरपूरकडे शासनाच्या बसने जातील. त्यानंतर 19 जुलै ते 24 जुलैपर्यंत पादुका पंढरपूरमध्ये राहतील. 24 जुलै ते 4 ऑगस्टपर्यंत पालखी पुन्हा मुख्य मंदिरात राहतील.

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी 2 जुलैला आळंदीतून पंढरपूरकडे निघणार

आषाढी वारीसाठी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा 2 जुलैला सायंकाळी 4 वाजता आळंदीतून पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. या सोहळ्याची जय्यत तयारी संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीकडून केली जात आहे. पालखी सोहळ्यापूर्वी संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरात प्रस्थान सप्ताह सुरू आहे. यंदाही गतवर्षीप्रमाणेच आषाढी वारी सरकारच्या वतीने घालून दिलेल्या नियमावलीत पार पडणार आहे. माऊलींच्या चलपादुका विशेष वाहनाने पंढरपूरला नेल्या जाणार आहेत.

प्रस्थान कार्यक्रम 2 ते 24 जुलै वारी सोहळा

पहाटे 4 ते 5.30 : घंटानाद, काकडा, पवमान अभिषेक, पंचामृत पूजा, दुधारती सकाळी 9 ते 11 : वीणा मंडपात कीर्तन दुपारी 12 ते 12.30 : गाभारा स्वच्छ करणे, समाधीस पाणी घालणे व महानैवेद्य सायंकाळी 4 : प्रस्थान सोहळ्याच्या मुख्य कार्यक्रमाला प्रारंभ सायंकाळी 6 : माऊलींचा सोहळा मंदिर प्रदक्षिणा पूर्ण करून आजोळघरी मुक्कामी

  • प्रस्थानानंतर 3 ते 19 जुलै : आजोळघरी माऊलींच्या पादुकांवर परंपरेनुसार सर्व नैमित्तिक उपचार
  • 19 जुलै : माऊलींच्या चलपादुका सकाळी 10 वाजता एसटी बसने पंढरपूरकडे मार्गस्थ
  • 19 ते 24 जुलै : माऊलींच्या पादुका पंढरपूरमध्ये मुक्कामी
  • 24 जुलै : पौर्णिमेला काला समाप्तीनंतर पंढरपूरहून आळंदीकडे एसटी बसने परतीचा प्रवास

हेही वाचा :

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर देहूगाव व आळंदीत 7 दिवस संचारबंदी, सर्व प्रकारची वाहतूक बंद राहणार

आषाढी एकादशी वारी प्रतिकात्मक स्वरुपात करण्याचा प्रस्ताव, पुढच्या आठवड्यात अंतिम निर्णय शक्य

Pandharpur Yatra | यंदाची वारी कशी व्हावी? पंढरपुरातील व्यापाऱ्यांना काय वाटतं?

व्हिडीओ पाहा :

Sant Tukaram Maharaj Palakhi Sohala Ashadhi wari program Dehu to Pandharpur

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.