Pune News | खलिस्तानवाद्यांच्या विरोधात कडवट पुणे, तिरंगा उंचावून म्हणाला, मै रहूँ ना रहूँ…

pune news | पुणे शहरातील सत्यम सुराणा या तरुणाचे कौतूक होत आहे. त्याने धाडसच मोठे केले आहे. सर्व भारतीयांना अभिमान वाटावे असे काम त्याने केले आहे. खलिस्तान आंदोलकांमध्ये घुसून त्याने तिरंगा उचलला. यावेळी खलिस्तानवाद्यांनी त्याला...

Pune News | खलिस्तानवाद्यांच्या विरोधात कडवट पुणे, तिरंगा उंचावून म्हणाला, मै रहूँ ना रहूँ...
satyam suranaImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Oct 07, 2023 | 5:14 PM

पुणे | 7 ऑक्टोंबर 2023 : पुणे शहरातील सत्यम सुराणा हा इंग्लडमध्ये शिक्षण घेत आहे. विद्यार्थी असलेला सत्यम याने सर्व भारतीयांना अभिमान वाटावा, असे काम केले आहे. लंडनमधील भारतीय उच्चायुक्त कार्यालयासमोर खलिस्तानी समर्थकांनी निदर्शने केली. त्यावेळी खलिस्तानवाद्यांनी भारताचा राष्ट्रीय ध्वज तिरंगाचा अवमान करण्याचा प्रयत्न केला. परंतु आक्रमक निदर्शकांसमोर विद्यार्थी असलेला सत्यम पुढे गेला. त्याने सन्मानाने तिरंगा उचलला. त्याचा हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

सत्यम याने अशी केली कामगिरी

इंग्लंडमधील भारतीय उच्चायुक्त कार्यालयासमोर खलिस्तान समर्थक ग्रुप निदर्शने करत होता. UK मध्ये राहणारा खलिस्तान समर्थक गुरचरण सिंग हा नेतृत्व करत होता. यावेळी आंदोलनकर्त्यांनी भारतीय राष्ट्रध्वज तिरंगाचा अवमान केला. त्यावेळी उपस्थित भारतीयांना ते सहन झाले नाही. त्यात किशोरवयीन असलेला सत्यम सुराणा धाडसाने पुढे आला. आक्रमक खलिस्तान समर्थकांमध्ये तो घुसला. तिरंगा सन्माने उचलला.

सत्यमचा धाडसाचा व्हिडिओ व्हायरल

सत्यम सुराणा याने केलेल्या धाडसाचा हा व्हिडिओ सर्वात आधी कटारिया नावाच्या युजरने व्हायरल केला आहे. त्यात त्याने लिहिले की, लंडनमधील स्कूल ऑफ इकोनॉमिक्समध्ये शिकणारा सत्यम याने हे धाडस केले. देशप्रेमासमोर कोणताही उग्रवाद चालणार नाही, हे त्याने दाखवून दिले. सत्यम जेव्हा तिरंगा उचलण्यास गेला तेव्हा त्याच्यावर खलिस्तानवादी भडकले. त्याला शिव्या देऊ लागले. परंतु पोलिसांनी हस्तक्षेप केला. त्याला सुरक्षित बाहेर काढले.

हे सुद्धा वाचा

सत्यम याने व्हिडिओ केला रिट्विट, म्हटले, मैं रहूँ या ना रहूँ

सत्यम सुराणा याने हा व्हिडिओ रिट्विट केला. त्यात त्याने लिहिले की, मी तुमच्या शब्दांनी प्रेरित झाला आहे. मी नेहमी भारतासाठी असणार आहे. मी जेव्हा तिरंगा उचलला तेव्हा मनात एकच विचार होता. तो म्हणजे ‘मैं रहूँ या ना रहूँ भारत ये रहना चाहिए!’ दरम्यान या घटनेनंतर सत्यम याच्या आई-वडिलांना त्याची चिंता वाटत आहे. परंतु त्याच्या धाडसामुळे त्यांना प्रचंड आनंद झाला आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.