स्वायत्त महाविद्यालयांसाठी पुणे विद्यापीठाची मार्गदर्शक तत्वे जाहीर! विद्यार्थ्यांवर काय परिणाम? वाचा सविस्तर,

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी (Savitribai Phule Pune University) संलग्नित अनेक महाविद्यालये, मान्यताप्राप्त संस्थांना स्वायत्त दर्जा (Autonomous Collage) मिळत आहे. येत्या काही वर्षात आणखी काही महाविद्यालयांना हा दर्जा मिळण्याची शक्यता आहे. पुणे विद्यापाठीने (Pune University) या महाविद्यालयांसाठी काही मार्गदर्शक तत्वे जाहीर केली आहेत.

स्वायत्त महाविद्यालयांसाठी पुणे विद्यापीठाची मार्गदर्शक तत्वे जाहीर! विद्यार्थ्यांवर काय परिणाम? वाचा सविस्तर,
PUNE UNIVERSITY
Follow us
| Updated on: Aug 28, 2021 | 12:44 PM

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी (Savitribai Phule Pune University) संलग्नित अनेक महाविद्यालये, मान्यताप्राप्त संस्थांना स्वायत्त दर्जा (Autonomous Collage) मिळत आहे. येत्या काही वर्षात आणखी काही महाविद्यालयांना हा दर्जा मिळण्याची शक्यता आहे. त्याअनुषंगाने स्वायत्त दर्जा मिळालेल्या संलग्न महाविद्यालयांच्या समस्या आणि अडचणी लक्षात घेऊन पुणे विद्यापाठीने (Pune University) या महाविद्यालयांसाठी काही मार्गदर्शक तत्वे जाहीर केली आहेत. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम 2016 आणि 2019 एकरूप परिनियम 3 मधल्या तरतुदी लक्षात घेऊन ही मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करण्यात आली आहेत. (Savitribai Phule Pune University announced guidelines for autonomous colleges)

ही नियमावली तयार करण्यासाठी कुलगुरूंनी समिती गठीत केली होती. या समितीचा अहवाल कुलगुरूंनी स्वीकारला आहे आणि त्यातल्या शिफारसीनुसार विद्यापीठाने ही मार्गदर्शक तत्वे जाहीर केली आहेत.

थेट पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम सुरू करता येणार नाही

यापुढे कोणत्याही स्वायत्त महाविद्यालयाला थेट पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम सुरू करता येणार नाही. असा अभ्यासक्रम सुरू करण्यापूर्वी संबंधित विषयातील पदवी अभ्यासक्रमाच्या किमान दोन बॅचेस उत्तीर्ण झालेल्या असणं आवश्यक असणार आहे. यासोबतच स्वायत्त दर्जा मिळालेल्या महाविद्यालयांना नवीन अभ्यासक्रमांची रचना निश्चित करणे आवश्यक असणार आहे.

विद्याविषयक आणि प्रशासकीय बाबतीत पू्र्ण स्वायत्तता

यूजीसीने वेळोवेळी घालून दिलेली मार्गदर्शक तत्वे यांच्या अधीन राहून स्वायत्त दर्जा मिळालेल्या महाविद्यालयांना आणि मान्यताप्राप्त संस्थांना विद्याविषयक आणि प्रशासकीय बाबतीत पू्र्ण स्वायत्तता असेल. अशा संस्था स्वतःचे अभ्यासक्रम तयार करू शकतात. संस्थांना प्रत्येक पदवीपूर्व आणि पदव्युत्तर पाठ्यक्रमांचे किंवा अध्ययनक्रमाचे वास्तव मूल्य ठरवण्यासाठी एक शुल्क निश्चिती समिती असेल.

अभ्यासक्रमांच्या नावात बदल करू नये

स्वायत्त संस्थांनी अभ्यासक्रमांच्या नावात बदल करू नये. नव्याने प्रस्तावित अभ्यासक्रमांचे संपूर्ण नाव आणि संक्षिप्त नाव हे यूजीसीच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणेच असावं. नवीन अभ्यासक्रमांची रचना निश्चित असावी. पुढच्या शैक्षणिक वर्षीपासून सुरू करण्यात येणाऱ्या नव्या अभ्यासक्रमाचा आराखडा आणि नवीन अभ्यासक्रमाच्या संलग्नीकरणाचा अर्ज हा 30 सप्टेंबरपूर्वी विद्यापीठाला सादर करायचा आहे.

विद्यापीठकडून 10 वर्षांत फक्त एकदाच शुल्क

संलग्नीकरणााठी स्वायत्त महाविद्यालये आणि संस्थांसाठी विद्यापीठकडून 10 वर्षांत फक्त एकदाच शुल्क आकारण्यात येईल. या 10 वर्षांच्या कालावधीत नवीन 3.4 अभ्यासक्रम सुरू करण्यासाठीचे हे एकरकमी शुल्क असणार आहे. विद्यार्थी प्रवेशक्षमता, विद्यापीठाच्या प्रचलित नियमाप्रमाणे असणे बंधनकारक आहे. आवश्यक भौतिक सोयी-सुविधा, अध्यापक आणइ प्रशासकीय कर्माचाऱ्यांची उपलब्धता असल्याबाबतचा पुरावा स्वायत्तता दर्जा प्राप्त महाविद्यालयाच्या विद्यापरिषदेच्या मान्यतेने प्रस्तावासोबत सादर करणं आवश्यक आहे.

इतर बातम्या :

राज ठाकरे शेतकऱ्यांना न्याय देतील, सदाभाऊ खोत यांना विश्वास, अमित ठाकरेंची भेट

Sindhudurg | नितेश राणे, निलेश राणेंवर गुन्हा दाखल, जमावबंदीच्या आदेशाचं उल्लंघन केल्याने कारवाई

रडत-रडत सुसाईड VIDEO काढला, छळाची ‘आपबिती’ सांगितली, ठाण्यात महिलेची आत्महत्या

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.