सातारा पोलीस, वनविभाग आणि सह्याद्री देवराई दुर्मिळ वनस्पती पार्क उभारणार: सयाजी शिंदे

अभिनेते सयाजी शिंदे यांच्या सह्याद्री देवराई, सातारा पोलीस, वनविभाग यांच्या पुढाकारानं दुर्मिळ वृक्षांच्या प्रजाती संवर्धनाचा प्रकल्प सुरु केला आहे. (Sayaji Shinde Satara Police)

सातारा पोलीस, वनविभाग आणि सह्याद्री देवराई दुर्मिळ वनस्पती पार्क उभारणार: सयाजी शिंदे
सयाजी शिंदे, अभिनेते
Follow us
| Updated on: Jan 17, 2021 | 7:11 PM

सातारा: अभिनेते सयाजी शिंदे त्यांच्या पर्यावरण आणि वृक्षसंवर्धनाच्या कामासाठी प्रसिद्ध आहेत. साताऱ्यात अभिनेते सयाजी शिंदे यांच्या संकल्पनेतून नव्याने उभारल्या जाणाऱ्या दुर्मिळ झाडांच्या उद्यानात ते श्रमदान करत आहेत. सह्याद्रीच्या पर्वत रांगामधील पश्चिम घाटामध्ये असणाऱ्या दुर्मिळ वनस्पती आणि वृक्ष त्याच बरोबर देशातील इतर राज्यातील 600 च्या वर असलेल्या दुर्मिळ वृक्षांच्या प्रजाती एकाच ठिकाणी लावण्याचा अनोखा प्रयोग साताऱ्यात सुरू करण्यात आला आहे. ( Sayaji Shinde Satara Police, Forest Department came together to develop rare tree conservation park)

30 एकर जागेत दुर्मिळ वृक्षांच्या प्रजातींची लागवड

पुणे-बंगळुरु महामार्गालगत साताऱ्यातील म्हसवे गावाच्या बाजूला हा उपक्रम राबवण्यात येत आहे. महामार्गाजवळील पोलीस गोळीबार मैदानाच्या तब्बल 30 एकर जागेत सह्याद्री देवराई, पोलीस प्रशासन आणि वनविभाग यांच्यावतीने हे अनोखे उद्यान उभारण्यात येत आहे. सिने अभिनेते सयाजी शिंदे यांच्या संकल्पनेतून हे उद्यान उभारले जाणार आहे. त्यासाठी आज स्वतः सयाजी शिंदे यांनी या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. यावेळी स्वतः गवत कापण्याचे मशीन हातात घेऊन त्यांनी या परिसरात श्रमदान केले.हे उद्यान खूप अनोखे आणि लोकांना दुर्मिळ झाडांची माहिती देणारे असल्याचे ते म्हणाले,  यासाठी सर्वानी एकत्र येऊन काम करण्याची गरज त्यांनी व्यक्त केलीय.

वनस्पती शास्त्रज्ञ, पोलीस विभाग, वन विभाग यांच्या सहकार्यानं येथे जैव विविधता पार्क निर्माण करण्यात येणार असल्याची माहिती सयाजी शिंदे यांनी दिली. दुर्मिळ वृक्षांच्या प्रजातींच्या लागवडीच्या उपक्रमासाठी सर्वांचं सहकार्य लाभले. येथे दोन शेततळी उभारली जाणार आहेत. सातारकर नागरिकांनी या पार्कच्या संरक्षण, संवर्धन करण्यासाठी पुढं यावं, असं आवाहन सयाजी शिंदेंनी केलं आहे.

पश्चिम घाटातील 200 प्रजातींचे संवर्धन

पश्चिम घाट हा आपला कणा आहे. जगाच्या पाठीवर दोनशे वनस्पती पश्चिम घाटात सापडतात. त्या वनस्पतींची दोन रोपं या पार्कमध्ये लावण्यात येतील. भारतातील राज्यांतील विविध वनस्पती येथे लावण्यात येतील, असं सह्याद्री देवराई सामाजिक संस्थेचे सुहास वागिनकर यांनी सांगितले.

अभिनेते सयाजी शिंदे यांच्या सह्याद्री देवराई प्रकल्पाच्या माध्यमातून राज्यभरात 40 ठिकाणावर वृक्षलागवडीसह वृक्षसंवर्धनाचे काम केले जात आहे.सातारा जिल्हयातही त्यांनी माण तालुक्यासह कोरेगाव, सातारा तालुक्यात सह्याद्री देवराईच्या माध्यमातून वृक्ष लागवडीचा उपक्रम हाती घेतला असून 2025 पर्यत हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर या उद्यानामुळे साताऱ्याची वेगळी ओळख निर्माण होणार आहे.

संबंधित बातम्या:

सयाजी शिंदेंकडून स्वत: आगीत उतरुन वणवा विझवण्याचा प्रयत्न

साताऱ्यात प्रत्येक शहीद जवानामागे एक झाड, सयाजी शिंदेंची संकल्पना

( Sayaji Shinde Satara Police, Forest Department came together to develop rare tree conservation park)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.