Pune Accident | सोमवार की अपघातवार; पुण्यात एकापाठोपाठ चार अपघात
पुण्यात अपघातांचं सत्र सुरुच आहे. आज सकाळपासून पुण्यात चार अपघात झाले आहेत.
पुणे : पुण्यात अपघातांचं सत्र सुरुच आहे. आज सकाळपासून पुण्यात चार अपघात झाले आहेत (Series Of Accidents In Pune). या चार अपघातात एकूण दोघांचा मृत्यू झाला आहे. तर 10 जण जखमी झाले आहेत. यामध्ये घटनास्थळाची पाहणी करणाऱ्यासाठी जाणाऱ्या पोलिसांच्या दोन वाहनालाही अपघात झाला. यामध्ये चार पोलीस कर्मचारीही जखमी झाले आहेत (Series Of Accidents In Pune).
>> पहिला अपघात
पुणे बंगळुरू महामार्गावर कात्रज बोगद्याकडून नऱ्हेच्या दिशेने जाताना भूमकर पुलावर आज पहाटे दोन ट्रकचा भीषण अपघात झाला. दारुची वाहतूक करणाऱ्या ट्रकला भरधाव ट्रकने धडक दिल्याने ट्रकने जोरदार धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की ट्रकच्या समोरील कॅबिनेटचा चेंदामेंदा झाला आणि यात दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर, 1 जण गंभीर जखमी झाला. तर 2 जण किरकोळ जखमी झाले आहे. यादरम्यान, मृतदेह ट्रकमध्ये अडकून पडले होते. पोलीस अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी अडकलेले मृतदेह बाहेर काढले. तसेच जखमींना तातडीने उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आलं. अद्याप मृत व्यक्तींची ओळख पटली नसून त्यांचा नाव, पत्ता घेण्याचे काम सुरु आहे.
>> दुसरा अपघात
याच अपघातापासून काही अंतरावर स्पेअर पार्ट घेऊन जात असलेला एक आयशरला दुसऱ्या एक वाहन घासून गेल्याने उलटा झाला. या अपघात दोघे किरकोळ जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. त्यामुळे पोलिसांनी तक्रार दाखल झाली नसल्याचे सांगितले. अपघातग्रस्त ट्रक क्रेनच्या सहाय्याने बाजूला करण्यात आला असून वाहतूक सुरळीत करण्यात आली.
>> तिसरा अपघात
नऱ्हे येथील अपघाताची पाहणी करण्यासाठी घटनास्थळी जात असताना भरधाव कंटनेरने सिंहगड पोलिसांच्या गाडीला उडविले. यामध्ये पोलिसांच्या गाडीचा चक्काचूर झाला असून ग्रामीण पोलीस दलातील दोन कर्मचारी गंभीर जखमी झाले (Series Of Accidents In Pune).
>> चौथा अपघात
नवीन कात्रज बोगदा दरी पुलाकडून साताऱ्याहून-मुंबईकडे जाणाऱ्या आणखी एका कंटेनरने 4 वाहनांना उडवले. यामध्ये एका रिक्षा आणि पोलिसांच्या गाडीचा चुराडा झाला. या अपघातात सहा महिन्यांच्या बाळासह तीन जण जखमी झालेत. जखमींमध्ये दोन पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
पोलादपूरमधील ‘तो’ टेम्पो दरीत कोसळण्याचं कारण काय? वाचा प्रत्यक्षदर्शीने कथन केलेला अपघाताचा थरारhttps://t.co/y6eHicP9tu#Accident | #raigad
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 9, 2021
Series Of Accidents In Pune
संबंधित बातम्या :
पोलादपूर अपघातातील 3 मृत आणि 43 जखमींची नावं Tv9 कडे; संपूर्ण यादी
धक्कादायक! पोलादपूरमधल्या ‘या’ ठिकाणीच घडला अपघात, 2 जणांचा मृत्यू, 34 गंभीर जखमी
हरिद्वारमध्ये मोठा रेल्वे अपघात, ट्रायल दरम्यान रेल्वेखाली चिरडून चोघांचा मृत्यू
यमुना द्रुतगती महामार्गावर भीषण अपघात; गाडीमधल्या आगीत होरपळून पाच जणांचा मृत्यू