भीमा नदीत रोज एक मृतदेह सापडत होता, सात दिवसांत सात मृतदेह

अमोल ऐकत नसल्याने पुण्यात असलेल्या मोहन पवार यांचा मुलगा राहुलला फोन त्यांनी फोन केला आणि सर्व घटना सांगितली. जर अमोलने आमचे ऐकले नाही, तर आम्ही आमचा जीव देऊ, असे मोहन पवार यांनी राहुलला शेवटच्या क्षणी सांगितले होते.

भीमा नदीत रोज एक मृतदेह सापडत होता, सात दिवसांत सात मृतदेह
Image Credit source: टीव्ही९ नेटवर्क
Follow us
| Updated on: Jan 25, 2023 | 8:25 AM

पुणे : दौंड तालुक्यातील पारगावमधील भीमा नदीच्या पात्रात सात दिवसांत सात मृतदेह सापडले. नदी पात्रात रोज एक मृतदेह सापडत होता. यामुळे हा हत्येचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त होत होता. नदी पात्रात मिळालेले सर्व मृतदेह हे एकाच कुटुंबातील होते. यामध्ये दोन पुरुष, दोन महिला आणि तीन लहान मुलांचा समावेश आहे. भीमा नदीच्या पात्रात 18 जानेवारी रोजी एका महिलेचा, 20 जानेवारी रोजी पुरुषाचा, 21 जानेवारी रोजी महिलेचा, 22 जानेवारी रोजी पुन्हा एक महिलेचा आणि 24 जानेवारी रोजी तीन लहान मुलांचे असे टप्प्याटप्प्याने सात मृतदेह आढळले.

पोलिसांना हत्येचा संशय

निघोज नदीपात्रात सापडलेले या सात मृतदेहांमुळे पोलीस चक्रावले होते. ही हत्या असल्याचा संशयावरुन तपास सुरु केला होता. मोहन पवार त्यांच्या कुटुंबातील सात जणांचे मृतदेह होते. परंतु ही हत्या नाही तर आत्महत्या असल्याचे स्पष्ट झाले. मुलाने नात्यातील विवाहित मुलगी पळवून आणली यामुळे कुटुंबाची बदनामी होईल, या भीतीने या आत्महत्या झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

हे सुद्धा वाचा

मुलाने केला घोळ अन् संपले कुटुंब

मुळचे बीड व उस्मानाबाद असणारी पवार कुटुंब भटकंती करत व्यवसाय करत होते. सध्या ते निघोजमध्ये राहात होते.ह्रदय पिळवटून लावणारी ही घटना मोहन पवार यांचा मुलगा अमोलमुळे घडली. त्याने नात्यातील विवाहित मुलगी पळवून आणली. या बाब मोहन पवार व त्यांच्या कुटुंबियांना मान्य नव्हती. मुलीला परत पाठवून दे, असे ते सातत्याने सांगत होते. मुलीला परत न पाठवल्यास आम्ही आत्महत्या करु, असेही त्यांनी अमोलला सांगितले होते. अमोलने वडिलांचे म्हणणे ऐकले नाही, यामुळे निराश झालेल्या पवार व जावाई फुलवरे यांच्या कुटुंबातील सात जणांनी आपले जीवन संपवले.

मुलाने ऐकले नाही

अमोल ऐकत नसल्याने पुण्यात असलेल्या मोहन पवार यांचा मुलगा राहुलला फोन त्यांनी फोन केला आणि सर्व घटना सांगितली. जर अमोलने आमचे ऐकले नाही, तर आम्ही आमचा जीव देऊ, असे मोहन पवार यांनी राहुलला शेवटच्या क्षणी सांगितले होते. त्यानंतर ते जे गायब झाले, ते कालपर्यंत आढळलेल्या मृतदेहाच्या माध्यमातूनच पुढे आले.

यांनी केली आत्महत्या

मोहन उत्तम पवार (वय 45, मूळ राहणार -खामगाव तालुका गेवराई जि. बीड.) संगीता उर्फ शहाबाई मोहन पवार (वय 45, राहणार -खामगाव तालुका गेवराई जिल्हा बीड) राणी श्याम फलवरे (वय 24, राहणार हातोला तालुका वाशी जिल्हा उस्मानाबाद) (मोहन पवार यांची विवाहित मुलगी) श्याम पंडित फलवरे( वय 28, राहणार हातोला तालुका वाशी जिल्हा उस्मानाबाद)(मोहन पवार यांचे जावई) रितेश उर्फ भैय्या श्याम फलवरे (वय ७, राहणार हातोला तालुका वाशी जिल्हा उस्मानाबाद (नातू) छोटू श्याम फलवरे (वय ५, हातोला तालुका वाशी जिल्हा उस्मानाबाद) (नातू) कृष्णा श्याम फलवरे (वय ३, राहणार हातोला तालुका वाशी जिल्हा उस्मानाबाद) (नातू)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.