Rajya Sabha Election Results 2022 : …हीच लक्ष्मण जगतापांच्या कामाची पोचपावती; बंधू शंकर जगतापांची पुण्यात प्रतिक्रिया

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आमदार जगताप अॅम्ब्युलन्समधून मुंबईला गेले आणि त्यांनी मतदानाचा हक्क बजावला. ही बाब आमच्यासाठी सार्थ अभिमानाची आहे, असे विरोधीपक्ष नेते फडणवीस यांनी विजयानंतर म्हणाले होते.

Rajya Sabha Election Results 2022 : ...हीच लक्ष्मण जगतापांच्या कामाची पोचपावती; बंधू शंकर जगतापांची पुण्यात प्रतिक्रिया
राज्यसभा निवडणुकीतील भाजपाच्या विजयानंतर प्रतिक्रिया देताना शंकर जगतापImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 11, 2022 | 3:28 PM

पिंपरी चिंचवड : राज्यसभा निवडणुकीत (Rajya Sabha Election) भाजपाचा झालेला विजय जगताप कुटुंब आणि पिंपरी चिंचवड शहरासाठी अभिमानास्पद असल्याची भावना शंकर जगताप (Shankar Jagtap) यांनी व्यक्त केली आहे. ते पुण्यात बोलत होते. शंकर जगताप हे भाजपा आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू आहेत. काल राज्यसभेसाठी मतदान पार पडले. यावेळी सुरुवातील लक्ष्मण जगताप मतदान करू शकतील की नाही, विषयी साशंकता होती. मात्र नंतर ते अॅम्ब्युलन्समधून मुंबईत पोहोचले. रात्री भाजपाचा विजय झाल्याचे घोषित झाले. भाजपाचे (BJP) तिन्ही उमेदवार निवडून आले. या विजयाचे श्रेय देवेंद्र फडणवीस यांनी भाजपा आमदार लक्ष्मण जगताप यांना दिले. त्या पार्श्वभूमीवर शंकर जगताप बोलत होते. यावेळी त्यांनी सर्व भाजपा कार्यकर्त्यांचे आभार मानले.

‘सर्व कार्यकर्त्यांचा विजय’

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आमदार जगताप अॅम्ब्युलन्समधून मुंबईला गेले आणि त्यांनी मतदानाचा हक्क बजावला. ही बाब आमच्यासाठी सार्थ अभिमानाची आहे, असे विरोधीपक्ष नेते फडणवीस यांनी विजयानंतर म्हणाले होते. तसेच हा विजय जगतापांना समर्पित करत असल्याचेदेखील नमूद केले होते. त्यावर शंकर जगताप म्हणाले, की हा केवळ लक्ष्मण जगताप यांचा विजय नसून सर्व कायकर्त्यांचा विजय आहे. पक्षाचा प्रथम विचार करून लक्ष्मण जगताप मतदानासाठी गेले. आम्ही त्यांच्या कुटुंबातील सदस्य आहोत, याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो, असे शंकर जगताप म्हणाले.

हे सुद्धा वाचा

‘कामाचा गौरवच’

गेली 45 वर्षे ते राजकारण आणि समाजकारणात आहेत. त्यांच्या कामाचा गौरवच फडणवीसांनी केला. त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकली, हे पक्षाच्या कार्यकर्त्यांना चैतन्य देणारे असेल. तसेच पिंपरी चिंडवडे नागरिक, कार्यकर्ते आणि जगताप कुटुंबीय सर्वांसाठीच हा आनंदाचा क्षण आहे, असे शंकर पाटील म्हणाले. दरम्यान, काल लक्ष्मण जगताप अॅम्ब्युलन्समधून मुंबईत मतदानास पोहोचले. पक्षाला आपली गरज आहे, त्यामुळे मतदान करत असल्याचे काल लक्ष्मण जगताप म्हणाले होते. तर पुण्यातीलच कसबा पेठ आमदार मुक्ता टिळक यादेखील कर्करोगाशी झुंज देत असतानाही काल मुंबईत अॅम्ब्युलन्समधून मतदानासाठी आल्या होत्या.

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.